भारत सरकार, मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट, डायरेक्टोरेट जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट (DGE) (देशभरातील एकूण २५ नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर्स (NCSC) फॉर एससी/ एसटी नोकरीच्या शोधात असणाऱ्या अजा/अजच्या उमेदवारांना पुढील १ वर्ष कालावधीच्या विनाशुल्क (मोफत) स्टायपेंडिअरी स्पेशल कोचिंग/ट्रेनिंगसाठी प्रवेश. (कोर्सेस १ जुलै २०२४ पासून सुरू होणार.))

(१) स्पेशल कोचिंग स्कीम.

11 thousand 500 students passed ca final examination conducted in November 2024 Mumbai
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
mpsc students loksatta news
राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त
Promotion Kalyan Dombivli Municipal corporation,
कल्याण डोंबिवली पालिकेतील ३४३ कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती
pune state government relaxed age limit for MPSC exams by one year as exception
वयाधिक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी… एमपीएससीच्या दोन परीक्षांसाठी अर्ज भरण्याची संधी !
Will BJP win in Delhi this year Is the election challenging for AAP
दिल्लीत यंदा भाजपची बाजी? ‘आप’साठी निवडणूक आव्हानात्मक का?

(२) NIELIT मार्फत 1 वर्ष कालावधीचे ‘ओ’ लेव्हल कॉम्प्युटर ट्रेनिंग.

(३) NIELIT मार्फत ‘ओ’ लेव्हल कॉम्प्युटर हार्डवेअर मेंटेनन्स ट्रेनिंग.

(४) NIELIT मार्फत ऑफिस ऑटोमेशन, अकाऊंटिंग आणि पब्लिशिंग असिस्टंट ट्रेनिंग.

(५) NIELIT मार्फत ‘कॉम्प्युटर अॅप्लिकेशन अँड बिझनेस अकाऊंटींग असोसिएट ट्रेनिंग’.

(६) NIELIT मार्फत ‘सायबर सिक्युअर्ड वेब डेव्हलपमेंट असोसिएट ट्रेनिंग’.

सर्व कोर्सेससाठी पात्रता : १२ वी उत्तीर्ण. (उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ३ लाखांपेक्षा कमी असावे.)

वयोमर्यादा : दि. १ जुलै २०२४ रोजी कोर्स क्र. १ साठी १८-२७ वर्षे, इतर कोर्सेससाठी १८-३० वर्षे. सर्व कोर्सेससाठी उमेदवारांना 1 वर्षाच्या ट्रेनिंग दरम्यान दरमहा रु. १,०००/- स्टायपेंड दिले जाईल.

अजा/ अजसाठी नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर्स (NCSC) फॉर एससी/ एसटी सेंटरचे नाव पत्ता :

हेही वाचा >>> यूपीएससी सूत्र : रेझिस्टन्स फ्रंट दहशतवादी संघटना अन् केंद्रीय मंत्र्याचे अधिकार-कर्तव्य, वाचा सविस्तर…

(१) सब-रिजनल एम्प्लॉयमेंट ऑफिसर (इनचार्ज), नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर फॉर एससी/ एसटी, न्यू अॅडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डींग नं. १, ५ वा मजला, जिल्हा परिषद आवार, सिव्हील लाईन्स, नागपूर – ४४० ००१. फोन नं. : 0712-2521468, मो.नं. : 9516044525, ई-मेल : cgc. ngp- dget@nic. in

(२) Assistant Director Employment ( I/ C), National Career Service Centre for SC/ ST, Govt. I. T. I. Campus, Dairy Circle, Bhannerughatta Road, Bengaluru – 560 029, Karnataka. फोन नं. : 080-29756192, मो.नं. : 9620933988, ई-मेल : cgcempbg@nic. in

(३) Sub- regional Employment Officer, NCSC for SC/ STs, Room No. 21-22, PSM College Campus (In front of Collectorate), Jabalpur – 482 001, Madhya Pradesh. Sh. Jayeta Gupta. फोन नं. : 0761-2673987, मो.नं. : 9893463755, ई-मेल : cgcjbp-mp@gov.in

(४) Assistant Director Employment ( I/ C), National Career Service Centre for SC/ STs, NSTI Campus, Shivam Road, Opp. Shivam Temple, Vidya Nagar, Hyderabad – 500 007, Telangana. Sh. Bhookhya Kasim फोन नं. : 040-27408555, मो.नं. : 7905988309, ई-मेल : cgchyd@nic. in

(५) Sub- regional Employment Officer, National Career Service Centre for SC/ STs, I. T. I. Campus, Majura Gate, Surat – 395 002, Gujarat. Dr. Amandeep Singh. फोन नं. : 0261-2654699, 0261-2964699, मो.नं. : 8968241313, ई-मेल : amandeep.singh46@gov.in,cgcseo. surat-gj@gov.in व इतर २० NCSCs.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या अजा/ अजच्या उमेदवारांनी http://www.ncs.gov.in किंवा http://www.dce.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या जाहिरातीसोबत जोडलेल्या अर्जाच्या विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर फॉर एससी/एसटी यांचेकडे दि. १५ जून २०२४ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. उमेदवारांना फक्त एकाच कोर्ससाठी निवडले जाईल. उमेदवार अर्जामध्ये कोर्सेससाठीचा आपला पसंतीक्रम नोंदवू शकतात.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील संधी

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), बंगलोर. इंटर डिसिप्लिनरी ४ वर्षं कालावधीच्या मॅथेमॅटिक्स आणि कॉम्प्युटिंगमधील बी.टेक. प्रोग्रामसाठी प्रवेश सूचना. आवश्यक ते CGPA, कोर्स क्रेडिट्स आणि प्रोजेक्ट रिक्वायरमेंट्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणखीन एक वर्ष पूर्ण केल्यास त्यांना एम.टेक. पदवी मिळविता येईल. प्रोग्रामचे उद्दिष्ट – संशोधन, डेव्हलपमेंट आणि भविष्यवादी विद्याशाखा आणि नविनतम नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजीस ज्यामध्ये मॅथेमॅटिक्स, कॉम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्स यांचा सखोल उपयोग केला जातो, यात आघाडीवर काम करणारे लिडर्स निर्माण करणे.

पात्रता : १२ वी किंवा समतूल्य (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, लँग्वेज आणि या चारपेक्षा इतर कोणत्याही विषयांसह) JEE अॅडव्हान्स्ड् २०२४ रँकनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.

उठून दिसणारी वैशिष्ट्ये (Standout Features) – मॅथेमॅटिक्स आणि कॉम्प्युटींग कोअर (Core) मध्ये मजबूत पाया बनविला जातो. मल्टि डिसिप्लिनरी आणि इंडस्ट्री प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून ग्लोबल आयटी मेजर्स (Majors) डेटा अॅनालायटिक्स आणि Fintech Firms मध्ये प्लेसमेंटची उत्कृष्ट संधी.

Core कोर्सेस : मॅथेमॅटिक्स, कॉम्प्युटींग, EECS, ब्रेड्थ, सॉफ्टवेअर, ह्युमॅनिटीज.

स्टडी ट्रक : विद्यार्थी आपल्या आवडीचा स्टडी ट्रक यातून निवडू शकतात. AI & ML, कॉम्प्युटेशनल सायन्स, थिअरॉटिकल कॉम्प्युटर सायन्स, क्वांटम कॉम्प्युटींग, कॉम्प्युटेशनल बायोलॉजी, सिग्नल प्रोसेसिंग, मॅथेमॅटिकल फिनान्स इ.

प्रोग्राम फी : रु. २ लाख प्रतीवर्ष ट्यूशन फी डिपॉझिट्स (फक्त पहिल्या वर्षी) रु. १५,०००/-, इतर फी वार्षिक रु. ५,२००/-, मेस आणि रुम फीस रु. ८०,०००/-, एकूण रु. ३,००,२००/- (खुला / इमाव/ ईडब्ल्यूएससाठी).

अजा/ अज यांना ट्युशन फी माफ आहे, त्यांचेसाठी इतर फी एकूण रु. १,००,२००/-.

प्रोग्राम फी ठरवून दिलेल्या -हप्त्या हप्त्याने भरता येईल.

अजाचे शुल्क : रु. ५००/- (खुला/ इमाव/ ईडब्ल्यूएस), रु. २५०/- (अजा/ अज/ दिव्यांग).

ईडब्ल्यूएस आणि इमाव (www.ncbc.nic.in वर उपलब्ध असलेल्या OBC सेंट्रल लिस्टप्रमाणे) यांचेकडे ग्राह्य दाखला दि. १ एप्रिल २०२४ ते १५ जून २०२४ दरम्यान सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेला असावा.

प्रोग्राम वेबसाईट https://btech-ug.iisc.ac.in/MathandComputing/

ऑनलाइन अर्ज https://admissions.iisc.ac.in/ या IISc अॅडमिशन पोर्टलवर दि. १७ जून २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत. अॅडमिशन काऊन्सिलिंग दि. ५ जुलै २०२४ रोजी.

Story img Loader