इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागासवर्ग (SBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJ- NT) च्या नॉन-क्रिमी लेयर गटाच्या युवक-युवतींसाठी पूर्ण वेळ, निवासी, निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम – महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (Mahajyoti), नागपूर (महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था) व एमएसएमई टेक्नॉलॉजी सेंटर, इंडोजर्मन टूल रुम (IGTR), औरंगाबाद (भारत सरकारची संस्था, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्याम मंत्रालय) यांच्याद्वारे पुढील ट्रेनिंग प्रोग्राम्ससाठी एकूण ६२६ प्रवेश.
(I) NSQF लेव्हल-३, ३.५, ४ वरील किमान १० वी पात्रतेवरील कोर्सेस –
(१) सर्टिफिकेट कोर्स इन CNC Turning Milling – कालावधी १२ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५.
(२) ज्यु. टेक्निशियन टूल अँड डाय मेकर (कंडेन्स्ड कोर्स इन टूल अँड डाय मेकिंग) – कालावधी १२ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २६.
(३) असिस्टंट ऑपरेटर CNC टर्निंग-टूल रुम (सर्टिफिकेट कोर्स इन सीएन्सी टर्निंग) – कालावधी ६ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५.
(४) असिस्टंट ऑपरेटर CNC मिलिंग-टूल रुम (सर्टिफिकेट कोर्स इन सीएन्सी मिलिंग) – कालावधी ६ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५.
(II) NSQF लेव्हल-५ वरील किमान आयटीआय पात्रतेवरील कोर्सेस –
(५) अॅडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स इन सीएन्सी मशिनिंग (टर्नर/ फिटर/ मशिनिस्ट ग्राईंडर/ टूल अँड डाय मेकर) – कालावधी १२ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५.
(६) अॅडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स इन मशिन मेंटेनन्स (फिटर/ इलेक्ट्रिशियन/ MMTM/ MMTR/ इलेक्ट्रिकल/ वायरमन) – कालावधी १२ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५.
(III) NSQF लेव्हल-६ वरील किमान डिग्री (मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग) पात्रतेवरील कोर्सेस –
(७) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टूल डिझाईन अँड CAD/ CAM – कालावधी १८ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५, पुणे – २५, नागपूर – २५, कोल्हापूर – २५.
(IV) NSQF लेव्हल-६ वरील किमान मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग पदवी/ पदविका पात्रतेवरील कोर्सेस –
(८) पोस्ट डिप्लोमा इन टूल डिझाईन अँड CAD/ CAM – कालावधी – १२ महिने. प्रवेश क्षमता – १२५ (औरंगाबाद – २५, पुणे – २५, कोल्हापूर – २५, नागपूर – २५, वाळुंज – २५).
(९) पोस्ट डिप्लोमा इन टूल अँड डाय मॅन्युफॅक्चरिंग – कालावधी 12 महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५.
(१०) ज्युनियर डिझायनर – टूल मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन (टूल डिझाईन) – कालावधी ६ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५, पुणे – २५.
(११) टेक्निकल सुपरवायझर कॉम्प्युटर एडेड इंजिनीअरिंग (मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर एडेड टूल इंजिनीअरिंग डिग्री/डिप्लोमा) – कालावधी . प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५, पुणे – २५, नागपूर – २५, वाळुंज – २५, कोल्हापूर – २५.
(V) NSQF लेव्हल-६, ४.५ वरील डिग्री/डिप्लोमा (मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनिअरींग) पात्रतेवरील कोर्सेस –
(१२) पोस्ट डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स (NSQF लेव्हल-६) – कालावधी १२ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५.
(१३) सिनियर टेक्निशियन मेंटेनन्स अँड ऑटोमेशन (अॅडव्हान्स डिप्लोमा इन मशिन मेंटेनन्स अँड ऑटोमेशन) (NSQF लेव्हल-४.५) – कालावधी ६ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५.
वयोमर्यादा : १८ ते ३५ वर्षे. प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख – १७ सप्टेंबर २०२४.
निवड पद्धती : प्राप्त अर्जांमधून निकषांच्या आधारे अर्जांची छाननी करून निवडक उमेदवारांना पात्रता प्रवेश परीक्षा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल. पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर (https:// www. igtr- aur. org) प्रसिद्ध करण्यात येईल.
पात्रता प्रवेश परीक्षा इंग्रजी, गणित व सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित असेल. पात्रता प्रवेश परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी व मुलाखत दि. ११ सप्टेंबर २०२४ रोजी IGTR च्या औरंगाबाद अथवा ज्या उपकेंद्रां (एक्स्टेंशन सेंटर्स) साठी अर्ज केला आहे, त्या केंद्रांवर होईल. उपरोक्त कौशल्य विकास प्रशिक्षण हे निशुल्क, निवासी (Residential) असून सदर प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च (प्रशिक्षण, राहणे व जेवण) महाज्योती, नागपूर मार्फत करण्यात येईल. उपरोक्त कौशल्य विकास प्रशिक्षण हे पूर्णकालीन असून ते आय्जीर्टीआ, औरंगाबाद या राष्ट्रीय पातळीवरील भारत सरकारच्या संस्थेद्वारे देण्यात येईल.
प्रशिक्षण ठिकाण : इंडो जर्मन टूल रुम, औरंगाबाद, पी-31, एमआयडीसी, चिकलठाणा इंडस्ट्रियल एरिया, औरंगाबाद – 431 006 आणि ITGR ची पुढील एक्स्टेंशन सेंटर्स.
(उर्वरीत उद्याच्या अंकात)
© The Indian Express (P) Ltd