सुहास पाटील
शासकीय तंत्रनिकेतन पुणे (महाराष्ट्र शासनाची एक स्वायत्त संस्था) आणि मर्सिडिज बेन्झ इंडिया प्रा. लि. यांच्या सहयोगाने १ वर्ष कालावधीचा स्किल बेस्ड आणि जॉब ओरिएंटेड ‘Advanced Diploma in Automotive Mechatronics’ साठी प्रवेश.
पात्रता : मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रिकल /E&TC/ मेकॅट्रॉनिक्स आणि समतुल्य ब्रँचमधील इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री
किंवा ऑटोमोबाईल/ इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि समतुल्य ब्रँचमधील बॅचलर ऑफ व्होकेशनल.
कोर्सचा कालावधी : १ वर्ष (५ मॉड्युल्स (१) मेकॅनिकल मॉड्युल, (२) इलेक्ट्रॉनिक्स मॉड्युल, (३) अॅडव्हान्स्ड् ऑटोमोटिव्ह सिस्टीम्स, (४) सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, (५) वर्कशॉप अॅटॅचमेंट मॉड्युल (कालावधी १ महिला)).
कोर्स फी ट्युशन फी : रु. १ लाख. (दोन हप्त्यांत भरता येईल. पहिला हप्ता रु. ५०,०००/- अॅडमिशनच्या वेळी)
प्रवेश क्षमता : २०.
कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर ‘अॅडव्हान्स्ड् डिप्लोमा इन ऑटोमोटिव्ह मेकॅट्रॉनिक्स’ सर्टिफिकेट दिले जाईल.
प्रवेश प्रक्रिया : इन्ट्रन्स टेस्ट, प्रॅक्टिकल टेस्ट आणि पर्सोनल इंटरव्ह्यू.
हेही वाचा >>> पहिली नोकरी करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
लेखी प्रवेश परीक्षा एकूण १२५ गुण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे ( MCQ) प्रश्न (बेसिक ऑटोमोटिव्ह ५० गुण; बेसिक फिजिक्स २५ गुण; अॅनालायटिकल रिझनिंग २५ गुण; न्यूमरिकल अॅबिलिटी १५ गुण; इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन टेस्ट १० गुण) स्किल टेस्ट – २५ गुण, एकूण १५० गुण.
प्रवेश परीक्षा शुल्क : रु. २००/-.
अर्जाचा विहीत नमुना http://www.gppune.ac.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करावा. डाऊनलोड केलेला पूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट सोबत इंजिनिअरींग डिग्री/डिप्लोमा मार्कशीट्स आणि सर्टिफिकेट यांच्या साक्षांकीत प्रती रु. २००/- चा डी.डी. ( Principal Government Polytechnic, Pune यांचे नावे पुणे येथे देय) ‘Principal, Government Polytechnic, Savitribai Phule University Road, Pune 411 016’ यांचेकडे प्रवेश परीक्षेच्या वेळी किंवा पोस्टाने तत्पूर्वी पोहोचवावे. उमेदवार अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह स्कॅन करून adamgpp@gppune.ac.in यावर मेल करू शकतात. उमेदवारांनी https://formsgle/C4 wBuAXmgKUBLIMES या गुगल लिंकवर फॉर्म भरावा
कागदपत्रांसह स्कॅन करून adamgpp@gppune.ac.in यावर मेल करू शकता.
https://forms.gle/C4wBuAXmqKuRLLMrS या गुगल लिंकवर फॉर्म भरावा.
प्रवेश परीक्षा आणि प्रॅक्टिकल टेस्ट शुक्रवार, दि. २३ ऑगस्ट २०२४ (दुपारी १२.०० वाजेपासून). गुणवत्ता यादी दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध केली जाईल.
प्रवेश निश्चित करण्यासाठी हजर होण्याचा दिनांक ६ सप्टेंबर २०२४ पर्यंत.
कोर्स सुरू होण्याचा दिनांक १९ सप्टेंबर २०२४ (गुरुवार). उमेदवारांना रु. १५,०००/- भरून हॉस्टेल अकोमोडेशन दिले जाईल.