युवक-युवतींसाठी (इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागासवर्ग (SBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJ- NT) च्या नॉन-क्रिमी लेयर गटाच्या) पूर्णवेळ, निवासी/अनिवासी, निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम – (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (Mahajyoti), नागपूर) (महाराष्ट्र शासनाची इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था) व एमएसएमई टेक्नॉलॉजी सेंटर, इंडोजर्मन टूल रुम (IGTR), औरंगाबाद (भारत सरकारची संस्था, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्याम मंत्रालय) यांच्याद्वारे पुढील ट्रेनिंग प्रोग्राम्ससाठी एकूण ३२५ प्र

(I) NSQF लेव्हल-३, ३.५, ४ वरील किमान १० वी पात्रतेवरील कोर्सेस –

Shani gochar 2025
पुढचे १४३ दिवस शनी देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती मिळवणार प्रत्येक कामात यश
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Tata Technologies recruitment 2024: Tata Technologies starts recruitment drive to fill over 100 vacancies
तरुणांसाठी खुशखबर! TATA कंपनीत नोकरीची संधी; पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
28th October Rashi Bhavishya In Marathi
आजचे राशिभविष्य, २८ ऑक्टोबर : रमा एकादशीला कोणत्या राशीच्या जीवनात येणार सुख, समृद्धी, प्रेम; वाचा तुमचा सोमवार कसा असेल?
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates : अमेरिकेच्या निवडणुकीत सहा भारतीयांची एन्ट्री; श्री ठाणेदार मिशिगनमधून विजयी!
Image Of Supreme Court.
Alimony Case : “कठोर कायदे महिलांच्या हितासाठी, पतीची पिळवणूक करण्यासाठी नाही”, सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
Punekar Dont Need Helmet While Riding Bike Women Shocking Answer Pune funny Video goes Viral
“पुणेकरांचा नाद नाय” हेल्मेट सक्तीवर पुणेकर महिलेनं दिलं अजब उत्तर; VIDEO पाहून पोट धरुन हसाल एवढं नक्की
Girls are lucky for their husband
नवऱ्याला श्रीमंत बनवतात ‘या’ पाच राशींच्या मुली; पद, सन्मान, यशासह मिळतो अपार पैसा अन् धन

(१) सर्टिफिकेट कोर्स इन CNC Turning Milling – कालावधी १२ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५.

(२) ज्यु. टेक्निशियन टूल अँड डाय मेकर (कंडेन्स्ड् कोर्स इन टूल अँड डाय मेकींग) – कालावधी १२ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५.

(३) असिस्टंट ऑपरेटर CNC टर्निंग-टूल रुम (सर्टिफिकेट कोर्स इन सीएन्सी टर्निंग) – कालावधी ६ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५, वाळुंज – २५.

(४) असिस्टंट ऑपरेटर CNC मिलिंग-टूल रुम (सर्टिफिकेट कोर्स इन सीएन्सी मिलिंग) – कालावधी ६ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५, वाळुंज – २५.

(II) NSQF लेव्हल-५, ४ वरील किमान आयटीआय पात्रतेवरील कोर्सेस –

(५) अॅडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स इन सीएन्सी मशिनिंग (टर्नर/ फिटर/ मशिनिस्ट ग्राईंडर/ टूल अँड डाय मेकर) कालावधी १२ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५.

(६) अॅडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स इन मशिन मेंटेनन्स (फिटर/इलेक्ट्रिशियन/ MMTM/ MMTR/ इलेक्ट्रिकल/ वायरमन) – कालावधी १२ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५.

(III) NSQF लेव्हल-६ वरील किमान डिग्री (मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग) पात्रतेवरील कोर्सेस –

(७) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टूल डिझाईन अँड CAD/ CAM – कालावधी १८ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५, पुणे – २५, नागपूर – २५, कोल्हापूर – २५.

(IV) NSQF लेव्हल-६ वरील किमान मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग पदवी/ पदविका पात्रतेवरील कोर्सेस –

(८) पोस्ट डिप्लोमा इन टूल डिझाईन अँड CAD/ CAM – कालावधी – १२ महिने. प्रवेश क्षमता – १२५ (औरंगाबाद – २५, पुणे – २५, कोल्हापूर – २५, नागपूर – २५, वाळुंज – २५).

(९) पोस्ट डिप्लोमा इन टूल अँड डाय मॅन्युफॅक्चरिंग – कालावधी १२ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५.

(१०) ज्युनियर डिझायनर – टूल (मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन टूल डिझाईन) कालावधी ६ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५, पुणे – २५, वाळुंज – २५.

(११) टेक्निकल सुपरवायझर कॉम्प्युटर एडेड इंजिनिअरींग (मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर एडेड टूल इंजिनीअरिंग) कालावधी – ६ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५, पुणे – २५, नागपूर – २५, वाळुंज – २५, कोल्हापूर – २५.

(V) NSQF लेव्हल-६, ४.५ वरील डिग्री/ डिप्लोमा (मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंग) पात्रतेवरील कोर्सेस –

(१२) पोस्ट डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स (NSQF लेव्हल-६) – कालावधी १२ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५.

(१३) सिनियर टेक्निशियन मेंटेनन्स अँड ऑटोमेशन (अॅडव्हान्स डिप्लोमा इन मशिन मेंटेनन्स अँड ऑटोमेशन) (NSQF लेव्हल-४.५) – कालावधी ६ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५.

वयोमर्यादा : १८ ते ३५ वर्षे. प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख – ६ जानेवारी २०२५.

निवड पद्धती : प्राप्त अर्जांमधून निकषांच्या आधारे अर्जांची छाननी करून निवडक उमेदवारांना पात्रता प्रवेश परीक्षा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल. पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर (https:// www. igtr- aur. org) प्रसिद्ध करण्यात येईल.

पात्रता प्रवेश परीक्षा इंग्रजी, गणित व सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित असेल. पात्रता प्रवेश परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी व मुलाखत दि. १ जानेवारी २०२५ रोजी IGTR च्या औरंगाबाद अथवा ज्या उपकेंद्रां (एक्स्टेंशन सेंटर्स) साठी अर्ज केला आहे, त्या केंद्रांवर होईल.

उपरोक्त कौशल्य विकास प्रशिक्षण हे निशुल्क, निवासी (Residential) असून सदर प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च (प्रशिक्षण, राहणे व जेवण) महाज्योती, नागपूर मार्फत करण्यात येईल. उपरोक्त कौशल्य विकास प्रशिक्षण हे पूर्णकालीन असून ते आयजीटीआर, औरंगाबाद या राष्ट्रीय पातळीवरील भारत सरकारच्या संस्थेद्वारे देण्यात येईल.

प्रशिक्षण ठिकाण : इंडो जर्मन टूल रुम, औरंगाबाद, पी-३१, एमआयडीसी, चिकलठाणा इंडस्ट्रियल एरिया, औरंगाबाद – ४३१ ००६ आणि ITGR ची पुणे, नागपूर, वाळुज उपकेंद्रे.

संबंधित उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह स्व-खर्चाने उपस्थित रहावे. उमेदवारांनी नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

अर्जासोबत अपलोड करावयाची कागदपत्रे : (१) विहीत नमुन्यातील व फोटोसहीज परिपूर्ण अर्ज, (२) प्रशिक्षणानुसार आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्र (१० वी, १२ वी, आय्टीआय्, डिप्लोमा, डिग्री इ.), (३) जातीचे प्रमाणपत्र, (४) शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला (टीसी/एल्सी), (५) चालू वर्षाचे नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र, (६) जन्मदाखला, (७) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र, (८) आधारकार्ड, (९) स्वत:चा फोटो, (१०) स्वतची सही, (११) मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट.

ऑनलाइन अर्ज IGTR ची वेबसाईट www. igtr- aur. org वर किंवा जाहिरातीमध्ये दिलेला QR कोड स्कॅन करून अथवा दिलेल्या लिंकवरून दि. २८ डिसेंबर २०२४ पर्यंत करावेत.

Story img Loader