ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळवून संशोधन करण्यासाठी दरमहा रु. ४७,०००/- ची स्टायपेंड मिळवून Ph. D. करावयाची आहे किंवा असिस्टंट प्रोफेसर व्हावयाचे आहे? भारतीय विद्यापीठ आणि कॉलेजेसमध्ये कॅटेगरी-१ ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप व असिस्टंट प्रोफेसर’ पद भरतीकरिता, कॅटेगरी-२ ‘असिस्टंट प्रोफेसर’ पदावर नियुक्ती आणि कॅटेगरी-३ Ph.D. साठी प्रवेश आणि फक्त Ph.D. प्रवेशाकरिता पात्रता निश्चित करण्यासाठी ८५ विषयांमध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन ( UGC) – नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट ( NET December २०२४) परीक्षा नॅशनल टेस्टींग एजन्सीद्वारे घेतली जाणार आहे. UGC- NET परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. (जून आणि डिसेंबर)

पात्रता : ह्युमॅनिटिज आणि सोशल सायन्स (लँग्वेजेससह), कॉम्प्युटर सायन्स आणि अॅप्लिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक सायन्स इ. (Appendix- II आणि Appendix- IV मध्ये नमूद केलेल्या) विषयांतील पदव्युत्तर पदवी किमान ५५ङ्घ गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग/ तृतीय पंथी उमेदवारांना ५० गुण आवश्यक.) ४ वर्षं कालावधीची पदवी परीक्षा किमान ७५ गुणांसह उत्तीर्ण उमेदवार JRF आणि Ph.D. प्रवेशासाठी पात्र असतील (अजा/ अज/ इमाव/ ईडब्ल्यूएस्/ दिव्यांग उमेदवारांना ७० गुण आवश्यक.)

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
Important information regarding Group-B Non-Gazetted and Group-C cadre posts outside MPSC purview
स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती! गट ब (अराजपत्रित), गट क संवर्गातील पदे एमपीएससीच्या कक्षेत आणण्यासाठी एक पाऊल पुढे…
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
pralhad iyengar mit suspended
एमआयटीने निबंधावरून भारतीय विद्यार्थ्याला केले निलंबित; नेमकं प्रकरण काय? कोण आहे प्रल्हाद अय्यंगार?
anoushka kale cambridge
ऐतिहासिक केंब्रिज युनियनच्या अध्यक्षपदी भारतीय विद्यार्थिनीची निवड; कोण आहेत अनुष्का काळे?

पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षाचे उमेदवार NET परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना NET २०२४ चा निकाल जाहीर होणाऱया दिनांकापासून दोन वर्षांच्या आत पात्रता परीक्षा आवश्यक त्या गुणांसह उत्तीर्ण करणे आवश्यक. उमेदवारांनी ज्या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्या विषयासाठीची NET परीक्षा लिहिणे आवश्यक. जर पदव्युत्तर पदवीचा विषय NET विषयांच्या यादीत नसल्यास त्या विषयाशी संबंधित विषय NET परीक्षेसाठी निवडावा.

वयोमर्यादा : (दि. १ जानेवारी २०२५ रोजी) ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी ३० वर्षेपर्यंत. (इमाव (केंद्रीय यादीत असलेल्या जातींसाठी)/ अजा/ अज/ दिव्यांग/ तृतीय पंथी आणि महिला उमेदवारांसाठी – ३५ वर्षेपर्यंत)

असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी आणि Ph.D. प्रवेशासाठी अर्ज करण्याकरिता – कोणतीही कमाल वयोमर्यादा नाही.

आरक्षण : १५ टक्के जागा अजासाठी, ७.५ टक्के जागा अजसाठी, २७ टक्के जागा इमावसाठी, १० टक्के जागा जनरल इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स (General EWS) साठी, ५ टक्के जागा दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव आहेत.

परीक्षा पद्धती : लेखी परीक्षा (ऑनलाइन मोड CBT) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न – दोन पेपर्स.

पेपर-१ – ५० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास २ गुण असे एकूण १०० गुण (टीचिंग/ रिसर्च अॅप्टिट्यूड जाणून घेण्यासाठी टेस्ट ऑफ रिझनिंग अॅबिलिटी, रिडींग कॉम्प्रिहेन्शन, डायव्हर्जंट थिंकींग आणि जनरल अवेअरनेस विषयांवर आधारित).

पेपर-२ – १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास २ गुण असे एकूण २०० गुण निवडलेल्या विषयावर आधारित डोमेन नॉलेज तपासण्यासाठी.

CBT विषयी माहिती Appendix- VII मध्ये उपलब्ध आहे. मॉक टेस्ट https:// www. nta. ac. in/ Quiz वर उपलब्ध आहे.

परीक्षेचा कालावधी ३ तास (१८० मिनिटे). सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. UGC Dec. २०२४ साठीची विषयांची यादी आणि त्यांचे कोड नंबर जाहिरातीच्या Appendix- II मध्ये उपलब्ध आहेत. परीक्षेचा अभ्यासक्रम https:// www. ugcnetonline. in/ syllabus- new. php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रश्नपत्रिकेचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी असेल. (भाषा (लँग्वेजेस वगळता))

ऑनलाइन अर्जात निवडलेल्या माध्यमातूनच प्रश्न विचारले जातील.

कॅटेगरी २ व ३ ‘असिस्टंट प्रोफेसर’ किंवा ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर’ पदांसाठी पात्रता उमेदवारांच्या UGC NET परीक्षेतील दोन्ही पेपर्समधील गुणांना ७० टक्के वेटेज आणि इंटरह्यूमधील गुणांना ३० टक्के वेटेज देऊन निश्चित केली जाईल. चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जाणार नाहीत. जे उमेदवार फक्त ‘असिस्टंट प्रोफेसर’ पदासाठी पात्र ठरलेले आहेत, त्यांना JRF पुरस्कारासाठी (award) विचारात घेतले जाणार नाहीत.

जे उमेदवार JRF पुरस्कारासाठी पात्र ठरतील त्यांना त्यांच्या पदव्युत्तर पदवीच्या विषयात किंवा संबंधित विषयात रिसर्च संशोधन करता येईल. तसेच ते ‘असिस्टंट प्रोफेसर’ पदासाठी पात्र ठरतील.

JRF साठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांची Ph.D. साठी प्रवेश इंटरव्ह्यूमधील गुणवत्तेवर आधारित केले जातील.

परीक्षा केंद्र : उमेदवारांनी आपल्या पसंतीची ४ परीक्षा केंद्रे निवडावीत. (Appendix- VII) मध्ये सिटी कोड नंबर उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे – अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई/नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ.

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – रु. १,१५०/-; जनरल ईडब्ल्यूएस्/ इमाव – रु. ६००/-; अजा/ अज/ दिव्यांग/ तृतीय पंथी – रु. ३२५/- परीक्षा शुल्क दि. ११ डिसेंबर २०२४ (२३.५० वाजे)पर्यंत भरता येईल.

पीएच्.डी. फेलोशिप स्टायपेंड JRF साठी (३७,००० + २७ टक्के एचआरए) रु. ४६,९९०/- दरमहा. २ वर्षांनंतर SRF साठी (रु. ४२,०००/- + २७ टक्के एचआरए) रु. ५३,३४०/- दरमहा दिले जाते.

UGC- NET Dec. २०२४ परीक्षा १ जानेवारी ते १९ जानेवारी २०२४ दरम्यान घेतली जाईल.

शंकासमाधानासाठी www. nta. ac. in किंवा ugcnet. nta. ac. in किंवा फोन नंबर ०११-४०७५९००० वर संपर्क साधा.

NTA वेबसाईटवरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याची तारीख नंतर जाहीर केली जाईल.

ऑनलाइन फॉर्ममध्ये काही सुधारणा/ बदल करावयाच्या असल्यास दि. १२ व १३ डिसेंबर २०२४ (२३.५० वाजे)पर्यंत करेक्शन विंडो उपलब्ध असेल.

ऑनलाइन अर्ज https:// ugcnet. nta. ac. in/; https:// ugcnet. ntaonline. in या संकेतस्थळावर दि. १० डिसेंबर २०२४ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत. ( Registration gt; Application Form gt; Payment of Fees)

Story img Loader