राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी) (NIN) पुणे (आयुष मंत्रालय, भारत सरकार), बापू भवन, मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड (ताडीवाला रोड), पुणे – ४११ ००१ संस्थेमार्फत १ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ मोफत प्रॅक्टिकल आणि करिअर ओरिएंटेड ट्रेनिंग कोर्स ‘निसर्गोपचार व योग उपचार सहाय्यक प्रशिक्षण’ (Treatment Assistant Training Course (TATC)) निसर्गोपचार हॉस्पिटल्स, वेलनेस सेंटर्स आणि स्पा इंडस्ट्रीसाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी चालविले जाते.
प्रवेश क्षमता : ८०+४० जागा आदिवासी उमेदवारांसाठी. (आजपर्यंत ३२ बॅचेस TATC च्या पूर्ण झाल्या आहेत. TATC हा निशुल्क कोर्स आहे.)
निवडलेल्या उमेदवारांना दरमहा रु. ८,०००/- स्टायपेंड ट्रेनिंग दरम्यान दिले जाईल.
पात्रता : १० वी उत्तीर्ण. (१२ वी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिले जाईल.)
किमान वयोमर्यादा : १८ ते ३० वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)
अर्जाचे शुल्क : अर्जाचा विहीत नमुना आणि प्रॉस्पेक्ट्स NIN च्या https:// ninpune. ayush. gov. in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून पूर्ण भरलेला अर्ज ‘ The Director, National Institute of Naturopathy’ यांचे नावे पुणे येथे देय असलेला रु. ५०/- च्या डिमांड ड्राफ्टसह पाठवावेत. डीडी ऐवजी पुढील अकाऊंटमध्ये रु. ५०/- ट्रान्सफर करून पाठविता येतील. Bank of Baroda – Wadia College Branch. Name of A/c. Holder – The Director, National Institute of Naturopathy. A/c. No. – ०९०८०१००००११६६. IFSC Code – BARB0 WADPOO (5th caracter is zero.)
निवड पद्धती : ६ नोव्हेंबर रोजी लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये आणि NIN च्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाली आहे. उमेदवारांची दि. २ आणि ३ डिसेंबर २०२४ रोजी (सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० दरम्यान) प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल व कोर्स सुरू होण्याची तारीख निवडलेल्या उमेदवारांना NIN च्या वेबसाईटवर सूचित केली जाईल.
स्टायपेंड : उमेदवाराने कोर्स पूर्ण करण्यापूर्वी सोडल्यास त्यांना मिळालेले स्टायपेंड १२ दंडात्मक व्याजासह ७ दिवसांच्या आत भरावे लागतील.
प्रवेश घेते वेळी उमेदवारांना रु. ५,०००/- संस्थेकडे अनामत रक्कम ‘ Director, National Institute of Naturopathy’ यांच्या नावे काढलेला डीडी (जो पुणे येथे देय असेल) भरावी लागेल. कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यास अनामत रक्कम परत केली जाईल.
ट्रेनीजची १०० उपस्थिती कोर्स दरम्यान अपेक्षित आहे. (आजारपणाचे कारण व कोर्स को-ऑर्डिनेटरने मंजूर केलेल्या रजा वगळता)
निवडलेल्या उमेदवारांना NIN चे ओळखपत्र (ID Card) आणि अॅप्रॉन दिले जाईल. जे त्यांनी NIN कँपसमध्ये घालणे अनिवार्य आहे.
दैनंदिनी (Daily Diary), प्रॅक्टिकल रेकॉर्ड्स, लॉग बुक्स, त्यांची सामान्य वागणूक आणि कामगिरीवर आधारित ट्रेनीजचे इंटर्नल असेसमेंट केले जाईल. ज्याचा रिपोर्ट दर दोन महिन्यांनी विद्यार्थ्यांसाठीच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केला जाईल.
ट्रेनीजना आठवड्याच्या ६ दिवस दोन शिफ्ट्समध्ये चालणाऱ्या प्रॅक्टिकल सेशन्सला उपस्थित राहणे अनिवार्य आहे. (१ ली शिफ्ट सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत किंवा २ री शिफ्ट दुपारी १ ते रात्री ९ वाजेपर्यंत) ठराविक कालावधीनंतर प्रशिक्षणार्थींना शिफ्ट आणि डिपार्टमेंट बदलून दिले जाईल.
TATC कोर्समध्ये प्रात्यक्षिकांवर अधिक भर असेल व थियरी फक्त २० च असेल.
मुलाखत (Viva) आणि प्रात्यक्षिक परीक्षा प्रत्येक विषयासाठीची कोर्सच्या शेवटाला घेतली जाईल. कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यास ट्रेनीजना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल आणि ते योगा आणि नेचरोपॅथिक ट्रिटमेंट असिस्टंटचे काम करू शकतील.
निसर्गोपचारासाठी ‘उपचार सहाय्यक’ घडविण्याचे काम NIN मध्ये केले जाते. TATC कोर्सचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे – (१) फिलॉसॉफी ऑफ नेचर क्युअर, (२) मसाज (प्रॅक्टिकल व थिअरी), (३) अॅनाटॉमि अँड फिजिऑलॉजी, (४) योगा थेरपी आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग, (५) हायड्रोथेरपी, (६) मड थेरपी, (७) डाएट अँड न्यूट्रिशन, (८) फास्टींग (उपवास), (९) मॅग्नेटो थेरपी, (१०) क्रोमो थेरपी, (११) अॅक्युप्रेशर, (१२) फिजिओथेरपी, (१३) क्लिनिकल ट्रेनिंग अँड नर्सिंग केअर, (१४) इंग्लिश कम्युनिकेशन स्किल.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे : (१) एस्एस्सी प्रमाणपत्र, (२) १२ वी प्रमाणपत्र, (३) वयाचा पुरावा, (४) आधारकार्ड/ रेशन कार्ड इ. ओळखपत्र, (५) अॅड्रेस प्रुफ – आधारकार्ड/रेशनकार्ड इ., (६) जातीचा दाखला (लागू असल्यास).
विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेला अर्ज स्कॅन करून आवश्यक त्या स्कॅन केलेल्या कागदपत्रांसह tatc. admission@gmail. com या ई-मेलवर दि. ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत पाठवावेत किंवा पुढील पत्त्यावर समक्ष पोहोचवावेत.
‘ National Instiutte of Naturopathy, Ministry of AYUSH, Govt. of India, Bapu Bhavan, Matoshree Ramabai Ambedkar Road (Tadiwala Road), Pune – 411001.’
मुलाखतीची तारीख दि. २ आणि ३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायं ५ वाजेपर्यंत.
अधिक माहिती https:// ninpune. ayush. gov. in या संकेतस्थळावर (Courses gt; Treatment Assistant Training Course) उपलब्ध आहे. फोन नं. ०२०-२६०५९६८२/३/४/५. ई-मेल – tact. admission@gmail. com