सुहास पाटील – suhassitaram@yahoo.com

एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल (EMRS) देशातील १६ राज्यांमधील EMRS करिता शिक्षक कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी पदांच्या भरतीसाठी (नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स (NESTS) एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल स्टाफ सिलेक्शन एक्झाम २०२३ (ESSS2023) घेणार आहे. (परीक्षेची तारीख नंतर ठएरळर च्या वेबसाईटवर जाहीर केली जाईल.)

rte registration process starting from Tuesday January 14
आरटीई प्रवेशांसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून, किती जागा उपलब्ध?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
ESIC Recruitment 2025
ESIC Recruitment 2025 : परीक्षेशिवाय ESICमध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळू शकतो १,३१,०६७ रुपयांपर्यंत पगार, जाणून कोण करू शकते अर्ज?
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?
RRB Ministerial and Isolated Categories Recruitment 2025
Indian Railway Recruitment 2025: RRBमध्ये १०३६ पदांसाठी होणार भरती! लवकर करा अर्ज, जाणून घ्या शेवटची तारीख
Railway Opens 4,232 Apprentice Vacancies For 10th Pass Students, No Written Exam Required
रेल्वेमध्ये १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षा न देता मिळणार नोकरी; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
BEL Recruitment 2025 Opportunity to get job without examination on apprenticeship posts in Bharat Electronics Limited, interview will be held on these dates
Walk-In-Interview : BELमध्ये अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, मुलाखतीला हजर राहा अन् नोकरी मिळवा, जाणून घ्या कोण करू शकते अर्ज?
SBI SCO Recruitment 2025
SBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १५० जागांची भरती जाहीर; कसा अन् कुठे कराल अर्ज? जाणून घ्या

एकूण रिक्त पदे – ६,३२६ (ट्रेण्ड ग्रॅज्युएट टिचर (टीजीटी) – ५,६६०, हॉस्टेल वॉर्डन (पुरुष) – ३३५, हॉस्टेल वॉर्डन (महिला) – ३३४).

(क) ट्रेण्ड ग्रॅज्युएट टिचर (टीजीटी) ग्रुप-बी – एकूण ३,३११ पदे.

(१) टीजीटी हिंदी – ६०६ (२४ पदे दिव्यांग (कॅटेगरी OH, VI, HI, others साठी प्रत्येकी ६) साठी राखीव).

(२) टीजीटी इंग्लिश – ६७१ (२७ पदे दिव्यांग (कॅटेगरी OH – ६; VI, HI, others साठी प्रत्येकी ७ पदे) साठी राखीव).

पात्रता : दि. १८ ऑगस्ट २०२३ रोजी टीजीटी हिंदी, टीजीटी इंग्लिश पदांसाठी संबंधित विषय पदवीच्या तीनही वर्षी अभ्यासलेला असावा.

(३) टीजीटी मॅथ्स – ६८६ (२८ पदे दिव्यांग (कॅटेगरी OH, VI, HI, others साठी प्रत्येकी ७ पदे) साठी राखीव).

पात्रता : टीजीटी मॅथ्स – बी.एस्सी. (मॅथेमॅटिक्स) फिजिक्स विषयासह (केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, स्टॅटिस्टिक्स) यापैकी एक विषय पदवी स्तरावर अभ्यासलेला असावा.

किंवा बी.एस्सी.च्या अंतिम वर्षी मॅथ्स आणि फिजिक्स विषय आणि पहिल्या व दुसऱ्या वर्षी मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ स्टॅटिस्टिक्स यापैकी तीन विषय अभ्यासलेले असावेत.

किंवा बी.एस्सी. (हॉनर्स इन मॅथ्स) (फिजिक्स आणि केमिस्ट्री/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ स्टॅटिस्टिक्स विषय पदवीच्या कोणत्याही २ वर्षी अभ्यासलेले असावेत.)

(४) टीजीटी सोशल स्टडीज – ६७० (२६ पदे दिव्यांग कॅटेगरी OH – ७, VI – ६, HI – ६, others – ७ साठी राखीव).

पात्रता : (i) पुढील विषयांच्या समूहा (combination)) मधून पदवी स्तरावर दोन विषय अभ्यासलेले असावेत.

(ए) हिस्ट्री (जीओग्राफी/ इकॉनॉमिक्स/ पॉलिटिकल सायन्स यापैकी २ विषयांसह).

(बी) जीओग्राफी (हिस्ट्री/ इकॉनॉमिक्स/ पॉलिटिकल सायन्स यापैकी २ विषयांसह).

(ii) पदवी स्तरावर तीनही वर्षे हिस्ट्री/ जीओग्राफी विषय अभ्यासलेले असावेत.

(५) टीजीटी सायन्स – ६७८ (२८ पदे दिव्यांग कॅटेगरी OH, VI, HI, others साठी प्रत्येकी ७ पदे राखीव).

पात्रता : बी.एस्सी. (i) पदवीच्या तीनही वर्षी बॉटनी, झूऑलॉजी आणि केमिस्ट्री विषय अभ्यासलेले असावेत. (ii) पदवीच्या शेवटच्या वर्षी बॉटनी, झूऑलॉजी आणि केमिस्ट्री यापैकी दोन विषय आणि पहिल्या व दुसरम्या वर्षी बॉटनी, झूऑलॉजी आणि केमिस्ट्री हे तीनही विषय अभ्यासलेले असावेत. (iii) बॉटनी, झूऑलॉजी आणि केमिस्ट्री या विषयापैकी एका विषयात बी.एस्सी. (हॉनर्स) पदवी असल्यास उमेदवारांनी पदवीच्या कोणत्याही २ वर्षी इतर दोन विषय अभ्यासलेले असावेत.

(II) ट्रेण्ड ग्रॅज्युएट टिचर (थर्ड लँग्वेज) ग्रुप-बी – एकूण ६५२ पदे.

(१) मराठी – ५२ (१ पद दिव्यांग कॅटेगरी VI साठी राखीव).

(२) कानडी – २४ (१ पद दिव्यांग कॅटेगरी OH साठी राखीव).

(३) गुजराती – ४४ (२ पदे दिव्यांग कॅटेगरी VI, HI साठी प्रत्येकी १ पद राखीव).

(४) तेलगू – १०२ (४ पदे दिव्यांग कॅटेगरी OH, VI, HI, others साठी प्रत्येकी १ पद राखीव).

(५) संस्कृत – ३५८ (१५ पदे दिव्यांग कॅटेगरी OH – ४, VI – ४, HI – ३, Others – ४ साठी राखीव).

(६) बंगाली – १०, (७) मल्यालम – २, (८) मणिपुरी – ६, (९) ओडिया – २५, (१०) मिझो – २, (११) संताली – २१, (१२) ऊर्दू – ६.

पात्रता : संबंधित भाषा पदवीच्या तीनही वर्षी अभ्यासलेली असावी.

याशिवाय सर्व टीजीटी पदांसाठी उमेदवाराने सेंट्रल टिचर इलिजिबिलिटी टेस्ट (CTET) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच उमेदवाराकडे बी.एड. पदवी असावी.

(III) ट्रेण्ड ग्रॅज्युएट टिचर (TGT) मिस्लेनिअस कॅटेगरी ऑफ टिचर्स (ग्रुप-बी) एकूण – १,६९७ पदे.

(१) TGT म्युझिक – ३२० पदे (१२ पदे दिव्यांग कॅटेगरी OH – ६, VI – ६ साठी राखीव).

पात्रता : म्युझिक विषयातील पदवी उत्तीर्ण.

(२) TGT आर्ट – ३४२ पदे (१२ पदे दिव्यांग कॅटेगरी OH, VI, HI, others साठी प्रत्येकी ३ पदे राखीव).

पात्रता : फाईन आर्ट्स/ क्राफ्ट्स विषयातील पदवी किंवा फाईन आर्ट्समधील बी.एड. पदवी.

(३) TGT फिजिकल एज्युकेशन टिचर (PET) पुरुष – ३२१ पदे (१५ पदे दिव्यांग कॅटेगरी OH – ७, HI – ८ साठी राखीव).

(४) TGT फिजिकल एज्युकेशन टिचर (PET) महिला – ३४५ पदे (१४ पदे दिव्यांग कॅटेगरी OH – ७, HI – ७ साठी राखीव).

पद क्र. ३ व ४ साठी पात्रता : फिजिकल एज्युकेशनमधील पदवी उत्तीर्ण.

(५) लायब्ररियन – ३६९ पदे (१५ पदे दिव्यांग कॅटेगरी OH, HI, Others साठी प्रत्येकी ५ पदे राखीव).

पात्रता : लायब्ररी सायन्स पदवी किंवा पदवी आणि १ वर्ष कालावधीचा लायब्ररी सायन्स डिप्लोमा.

((IV) नॉन-टिचिंग कॅटेगरीतील पदे – एकूण ६६९.

(१) हॉस्टेल वॉर्डन (पुरुष) – ३३५ पदे (दिव्यांग कॅटेगरी HI साठी १३ पदे, माजी सैनिकांसाठी ३३ पदे राखीव)

(२) हॉस्टेल वॉर्डन (महिला) – ३३४ पदे (दिव्यांग कॅटेगरी HI साठी १४ पदे, माजी सैनिकांसाठी ३३ पदे राखीव)

१ व २ पदांकरिता पात्रता : पदवी उत्तीर्ण किंवा ४ वर्ष कालावधीची पदवी रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन ऑफ NCRT मान्यताप्राप्त संस्थेकडील.

वयोमर्यादा : (दि. १८ ऑगस्ट २०२३ रोजी) सर्व पदांसाठी ३५ वर्षेपर्यंत, EMRS चे कर्मचारी – ५५ वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे).

निवड पद्धती : उमेदवारांची निवड EMRS स्टाफ सिलेक्शन एक्झाम (ESSE -2023) OMR बेस्ड (पेन पेपर) मोडने घेऊ केली जाईल.

TGT पदांसाठी ESSE  परीक्षा एकत्रित वेळ ३ तास ऑब्जेक्टिव्ह टाईप – १२० प्रश्न, १२० गुण आणि लँग्वेज कॉम्पिटन्सी जनरल हिंदी, जनरल इंग्लिश आणि रिजनरल लँग्वेज (प्रत्येक भाषेकरिता १० गुण) एकूण ३० प्रश्न, ३० गुण.

अर्ज केलेल्या उमेदवारांना १७ रिजनल लँग्वेजमधून एक भाषा निवडावी लागेल. (मराठी, कानडी, तेलगू इ.)

हॉस्टेल वॉर्डन पदांसाठी १२० गुणांची लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप १२० प्रश्न, वेळ २ तास ३० मिनिटे.

प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील.

ESSE परीक्षेसाठीचा अभ्यासक्रमी emrs.tribal.gov.in या संकेतस्थळावर आणि जाहिरातीमधील Appendix- I मध्ये उपलब्ध आहे.

परीक्षा केंद्र : मुंबई, गांधीनगर, बंगळूरु, भोपाळ, पणजी, विजयवाडा इ.

अंतिम गुणवत्ता यादीमध्ये पदनिहाय १० टक्के उमेदवारांची प्रतीक्षा यादी बनविली जाईल. प्रतीक्षा यादी १ वर्षांसाठी ग्राह्य असेल.

वेतन श्रेणी : टीजीटी (इंग्लिश/ हिंदी/ मॅथ्स/ सायन्स/ सोशल स्टडीज/ थर्ड लँग्वेज/ लायब्रेरियन) पदांसाठी पे-लेव्हल – ७ (रु. ४४,९०० – १,४२,४००) अंदाजे वेतन दरमहा रु. ६८,०००/-.

टीजीटी (मिस्लेनियस पदे) (म्युझिक/ आर्ट/ PET (पुरुष)/ PET (महिला)) – पे-लेव्हल – ६ (रु. ३५,४०० – १,१२,४००) अंदाजे वेतन दरमहा रु. ५५,०००/-.

हॉस्टेल वॉर्डन पदांसाठी पे-लेव्हल – ५ (रु. २९,२०० – ९२,३००) अंदाजे वेतन दरमहा रु. ४६,५००/-.

EMRS या पूर्णपणे निवासी शाळा असल्यामुळे टिचिंग आणि नॉन-टिचिंग स्टाफ यांना EMRS कँपसमध्ये रहावे लागेल. त्यासाठी त्यांना रेंट फ्री अकोमोडेशन पुरविले जाईल.

निवडलेल्या उमेदवारांना २ वर्षांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल. OMR उत्तरपत्रिका आणि उत्तरतालिका (Answer Keys)NESTS च्या वेबसाईटवर २ ते ३ दिवसांसाठी उमेदवारांना काही हरकती असल्यास घेण्याकरिता उपलब्ध करून दिल्या जातील. तशी सूचना https://ctet.nic.In या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. प्रत्येक प्रश्नासाठी रु. १,०००/- भरून हरकत घेता येईल.

शंकासमाधानासाठी संपर्क साधा हेल्पलाईन नं. ०११-२२२४०११२ (कामकाजाच्या दिवशी ९.०० ते १७.३० पर्यंत) किंवा मेल emrs.recruitmentst@gmail.com  

अर्जाचे शुल्क : टीजीटी रु. १,५००/-, हॉस्टेल वॉर्डन रु. १,०००/-. ऑनलाईन अर्जी emrs.tribal-gov.in या संकेतस्थळावर दि. १८ ऑगस्ट २०२३ पर्यंत करावेत.

Story img Loader