बऱ्याच विद्यार्थ्यांची उच्चशिक्षणासाठी पहिली पसंती अमेरिकेला असते. याचे प्रमुख कारण म्हणजे तेथील जागतिक दर्जाची विद्यापीठे व त्यांचे संशोधन. या लेखमालेमध्ये, अमेरिकेतील पदवी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया आपण पाहणार असल्याने SAT आणि TOEFL/ IELTS या परीक्षांबद्दल विस्ताराने पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेतील पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याला बारावीनंतर SAT म्हणजे Scholastic Aptitude Test व TOEFL ( Test of English as a Foreign Language) या दोन परीक्षा देणे आवश्यक आहे. (बऱ्याचदा विद्यार्थी TOEFL ऐवजी IELTS ही परीक्षा देतात. सर्व अमेरिकन विद्यापीठांकडून IELTS ही English Proficiency Test म्हणून स्वीकारली जाते). TOEFL ही परीक्षा अमेरिकेतील ETS ( Educational Testing Service) या संस्थेकडून तर SAT ही परीक्षा ‘‘कॉलेज बोर्ड’’ या खाजगी कंपनीकडून घेतल्या जातात. SAT या परीक्षे मध्ये गणित, इंग्रजी व विश्लेषणात्मक लेखन तपासले जाते तर ळडएाछ ही फक्त इंग्रजीची परीक्षा आहे.

SAT: या परीक्षेला पूर्वी Scholastic Aptitude Test ( SAT) या नावाने ओळखले जायचे. आता ETS ने या परीक्षेचे नाव बदलून SAT असेच केलेले आहे. ही परीक्षा कॉलेजबोर्ड या संस्थेकडून घेतली जाते. आपल्याकडील उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे बारावी पूर्ण केलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. अमेरिकेतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या परीक्षेत गणित, इंग्रजी व विश्लेषणात्मक लेखन तपासले जाते. तसेच परीक्षेचे एकूण गुणांकन १६०० गुणांच्या पातळीवर केले जाते. सॅट परीक्षेत प्रामुख्याने खालीलप्रमाणे तीन विभाग आहेत.

अ) Critical Reading (टीकात्मक इंग्रजी वाचन) – या विभागामध्ये तीन उपविभाग असून त्यात विविध प्रकारच्या प्रश्नांची उपलब्धता आढळते. या सर्व उपविभागास मिळून एकूण ६५ मिनिटांचा कालावधी असतो.

ब) Mathematics (गणित) – गणित विभागामध्येही वरील इंग्रजी विभागासारखेच उपविभागांचे व प्रश्नांचे वितरण केलेले आहे.

क) Writing (विश्लेषणात्मक इंग्रजी लेखन) – या विभागात निबंध लेखन व इतर विविध प्रकारचे विश्लेषणात्मक लेखन करणे अपेक्षित आहे.

सॅट परीक्षेचा एकूण कालावधी पावणेचार तासांचा आहे. सॅटच्या गुणांची वैधता पाच वर्षांची असते. SAT चे गुण कॉलेजबोर्डच्या अकाऊंटमधून तुम्ही अर्ज करणार असलेल्या विद्यापीठाला पाठवावे लागतात. हे गुण चार विद्यापीठांना मोफत पाठवता येतात तर त्यानंतरच्या सर्व विद्यापीठांना SAT Score पाठवण्यासाठी फी आकारली जाते.

TOEFL ( Test of English as a Foreign Language): ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा इंग्रजी नाही ( Non- native English Speakers) अशा विद्यार्थ्यांना अमेरिकेतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी टोफेल किंवा आयइएलटीएस यांपैकी कोणतीही एक परीक्षा देणे गरजेचे आहे. टोफेल ही फक्त इंग्रजीची परीक्षा आहे. अमेरिकेमध्ये विद्यार्थ्याला कोणत्याही अभ्यासक्रमासाठी मग ती पदवी असो वा पदव्युत्तर पदवी, या दोन्हींच्या प्रवेशासाठी टोफेल ही आवश्यक असलेली परीक्षा आहे. अमेरिकेतील काही विद्यापीठे पूर्वी आयइएलटीएस परीक्षा स्वीकारत नसत. त्यामुळे बहुतांश भारतीय विद्यार्थी English Proficiency Test म्हणून ‘टोफेल’ ही परीक्षा देत. टोफेलमध्ये चार विभाग असतात. Reading, Writing, Listening, Speaking. प्रत्येक विभाग तीस गुणांचा असतो. संपूर्ण परीक्षा १२० गुणांची असते आणि बहुतांश विद्यापीठे टोफेलमध्ये विद्यार्थ्याने किमान ८० गुण मिळवायला हवे ही अपेक्षा ठेवतात. (अर्थात प्रत्येक विद्यापीठाचा minimum cut- off हा दरवर्षी बदलत असतोच). या परीक्षेचे गुण दोन वर्षांसाठी वैध असतात.

IELTS ( International English Language Testing System): टोफेलसारखीच ‘आयइएलटीएस’ ही इंग्रजीची परीक्षा आहे. आयइएलटीएस आणि टोफेल या दोन्ही परीक्षांमध्ये बरेच साम्य आहे. मात्र टोफेल परीक्षेला पर्याय म्हणून अनेकदा आयइएलटीएसकडे पाहिले जाते. ऑस्ट्रेलिया-युरोपातील अनेक देशांमध्ये आयइएलटीएसचे गुण स्वीकारले जातात. त्यामुळे जे विद्यार्थी अमेरिका आणि इतर ठिकाणीही विद्यापीठांना प्रवेशासाठी अर्ज करतात ते विद्यार्थी टोफेलपेक्षा आयइएलटीएस परीक्षा देण्यास प्राधान्य देतात. आयइएलटीएस परीक्षेत एकूण चार विभाग ( Reading, Listening, Speaking, Writing) असतात. इथे गुणांच्याऐवजी या विभागांचे मूल्यांकन बँडस् च्या आधारावर केले जाते. हे बँडस् ०-९ या दरम्यान दिले जातात. आयइएलटीएससाठी एकूण तीन तासांचा वेळ असतो. या परीक्षेचे गुणांकन दोन वर्षांसाठी वैध असते.

● theusscholar@gmail.com