EPFO Recruitment 2023: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओद्वारे २८५९ पदांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया आज २७ मार्चपासून सुरू होत आहे. जर तुम्ही १२वी उत्तीर्ण झाला असेल किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल तर तुम्ही देखील या नोकरीसाठी अर्ज करू शकता.
ईपीएफओद्वारे या पदांसाठी होणार भरती
या भरती प्रक्रियेतून EPFO मध्ये एकूण २८५० पदे भरणार आहेत. यात सोशल सिक्योरिटी असिस्टेंट साठी २६७४ पदे आणि स्टेनोग्राफर साठी १८५ पदे समाविष्ट आहेत. epfindia.gov.in या वेबसाइटवर भेट देऊ ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करु शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ एप्रिल २०२३ आहे.
आवश्यक पात्रता
सोशल सिक्योरिटी असिस्टेंट पदांसाठी पात्र उमेदवारांकडे पदवीधर असण्यासोबतच इंग्लिशमध्ये ३५ शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये ३० शब्द प्रति मिनिट टाइपिंग स्पीड असला पाहिजे. स्टेनोग्राफर पदाकरिता पात्र उमेदवारांकडे १२वी पास असण्यासोबत ८० शब्द प्रति मिनिट डिक्शनेशन आणि इतर टाइपिंग पात्रता असली पाहिजे.
वयोमर्यादा
EPFO मध्ये २८५९ पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी १८ वर्ष आणि जास्तीत जास्त २७ वर्ष असले पाहिजे. याशिवाय आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयामर्यादेत सूट देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया
संगणक आधारित लेखी चाचणी आणि संगणक टायपिंग चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. स्टेनोग्राफर पदांसाठी टायपिंग टेस्टऐवजी स्टेनो स्किल टेस्ट असेल.
हेही वाचा- BSNLमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, कसा करावा अर्ज आणि कशी होईल निवड?
पगार
लेव्हल ५ अंतर्गत सोशल सिक्योरिटी असिस्टेंसाठी २९२०० ते ९२३०० रुपये आणि लेव्हल ४ अंतर्गत स्टेनोग्राफरसाठी २५५००ते ८११०० रुपये पगाराची तरतूद करण्यात आली आहे.
नोटीफिकेशन पाहण्यासाठी क्लिक करा
पहिली नोटिस
दूसरी नोटिस