ESIC Recruitment 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळाद्वारे (ESIC) प्राध्यापक, विशेषज्ज्ञ, वरिष्ठ निवासी आणि शिक्षक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार ESIC च्या अधिकृत वेबसाइट esic.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील १४६ पदे भरण्यात येणार आहेत.
मुलाखत २९ जानेवारी, ३० जानेवारी,३१, फेब्रुवारी १, २, ३, ५, ६, ७ आणि ८, २०२४ रोजी घेतली जाईल. उमेदवारांची रिपोर्टिंग वेळ मुलाखतीच्या दिवशी सकाळी ९ते १०.३० अशी आहे. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी खाली वाचा.
ESIC Recruitment 2024 :पात्रता निकष
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते येथे उपलब्ध तपशीलवार माहिती अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात.
अधिसुचना – https://www.esic.gov.in/attachments/recruitmentfile/c7be6ce3740f25d421559e42c2e80582.pdf
हेही वाचा – RRB ALP 2024 : रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी! ५६९६ असिस्टंट लोको पायलट पदांसाठी होणार भरती; लवकर करा अर्ज
ESIC Recruitment 2024 : निवड प्रक्रिया
निवड मंडळासमोर मुलाखतीत उमेदवाराची निवड त्याच्या कामगिरीच्या आधारावर केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीची ऑफर मिळाल्यानंतर त्यांना कामावर रुजू व्हावे लागेल.
ESIC Recruitment 2024 : अर्ज शुल्क
सर्व श्रेणींसाठी अर्जाची फी ₹५००/- आहे. SC/ST/महिला उमेदवार, ई-सर्व्हिसमन आणिशारीरिकदृष्ट्या अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
हेही वाचा – ICSIद्वारे ‘सीआरसी एक्झिक्युटीव्ह’ पदासाठी होणार भरती! अर्ज करण्यासाठी जाणून घ्या पात्रता निकष
ESIC Recruitment 2024 : मुलाखतीचे ठिकाण
मुलाखतीचे ठिकाण शैक्षणिक ब्लॉक, ESIC मेडिकल कॉलेज, सनाथनगर, हैदराबाद आहे. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार ESIC ची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.