डॉ श्रीराम गीत

नमस्कार सर, मला १० वी आणि १२वी ला ८५ टक्के गुण मिळाले होते. एमपीएससी द्यायची आहे म्हणून मी आता बी.ए. च्या पहिल्या वर्षात शिकत आहे. माझे मराठी, इंग्रजी, समाजशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल हे विषय असून माझे आवडते विषय इतिहास आणि समाजशास्त्र आहेत. माझ्या कुटुंबात ५ बहिणी आणि एक भाऊ आहे. मी सर्वात मोठी असल्यामुळे मला ऑप्शन बी निवडायचा आहे. आमची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने काय करू ते सांगा.

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
loksatta readers feedback
पडसाद : मनात डोकावून पाहायला लावणारे भाषण
devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking
“त्यांच्या आधी माझी बॅग तपासली, केवळ भांडवल…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

– ऋतुजा.

हेही वाचा >>> SCI Mumbai Bharti 2024: नोकरीची उत्तम संधी! मुंबईत शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदासाठी भरती; अर्जाची अंतिम तारीख पाहा

प्रथम उत्तम मार्कांनी बीए, शक्य झाल्यास इंग्रजी विषयातून. त्या दरम्यान संगणक शिकून घे. तो वापरायची सवय ठेव. पदवी हातात येत असताना या दोनातून तुला एखादी सहाय्यकाची नोकरी मिळेल. आवडत्या विषयातून नोकरी कठीण. दोन वर्षे नोकरी करताना एमपीएससी परीक्षेचा अभ्यास प्राथमिक दृष्ट्या पूर्ण करणे सहज शक्य आहे. केवळ घरच्या जबाबदारीशी याचा संबंध नसून, स्वत:च्या पायावर आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली व्यक्ती स्पर्धा परीक्षेत यश मिळवते, असे आजवरचे आकडेवारीतून लक्षात येते. सध्या वृत्तपत्र वाचन व करिअर वृत्तांतचे वाचन हे मात्र चालू ठेव. पदवीला ऐंशी टक्के मार्क टिकवणे हे तुझे सध्या एकमेव ध्येय राहील.

हेही वाचा >>> NHAI Recruitment 2024: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये पदवीधरांसाठी भरती; असा करा अर्ज…

मी यूपीएससीची तयारी करतो आहे. माझे पेपर १ चे गुण ९२/२०० आहेत आणि २ ला ६५/२०० आहेत. यूपीएससीमध्ये उताऱ्यांमधील उत्तरांची निश्चितता खूप कमी असते. आपण केवळ ५० टक्केच या दरम्यान उत्तर देऊ शकतो. परंतु तरीसुद्धा उत्तर चुकण्याची संधी जास्त असते. २५ ते ३० प्रश्न केवळ आकलानावर असतात. उरले ५० प्रश्न. त्यात २० प्रश्नांची उत्तरे बऱ्यापैकी देता येतात आणि उरलेल्या ३० प्रश्नांची काठिण्यता खूप जास्त असते. यूपीएससीमधील बेसिक न्यूमरसी ही दिवसेंदिवस खूप कठीण होत चाललेली आहे. यूपीएससी प्रश्नांमध्ये असलेली नावीन्यता पुस्तकामध्ये सुद्धा नसते हे यामागील कारण आहे. हल्लीच्या स्थितीमध्ये सी-सॅटला ६७ गुण मिळवणे खूप आव्हानात्मक झालेले आहे. २०२३ चा पेपरही खूप कठीण पेपर होता. याबाबत कृपया योग्य मार्गदर्शन करावे.

– प्रणय रेखा गौतम.

हेही वाचा >>> NHAI Recruitment 2024: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये पदवीधरांसाठी भरती; असा करा अर्ज…

मंगळ ग्रहावरून आलेला पेपर, असे गमतीचे वर्णन तू केले आहेस. त्याच शब्दात बोलायचे झाले तर मंगळावर पोहोचण्या इतकेच यूपीएससीतून निवड होणे कठीण असते हे लक्षात घे. वास्तवाचा स्वीकार करून स्पर्धेला तोंड देण्याची स्वत:ची क्षमता वाढवणे गरजेनुसार गणितातील क्षमता वाढवणे व सी सॅट मधील मार्क मिळवणे याला कोणताही पर्याय नाही. खूप अभ्यास अधिक अभ्यास मोठा क्लास या ऐवजी नेमका अभ्यास कसा करावयाचा यावर लक्ष दे. खरे तर तुझी पदवी कोण कोणत्या विषयात व आज वरचा शैक्षणिक प्रवास किती टक्केवारीने याचा कोणताही उल्लेख प्रश्नात दिलेला नाही त्यामुळे माझ्या उत्तराला खूप मर्यादा आल्या आहेत. तुझ्या छोट्या प्रत्येक प्रश्नात तू आकडेवारीत अडकला आहेस. त्या ऐवजी स्वत:च्या गुणवत्तेत कशी वाढ करता येईल इकडे लक्ष केंद्रित करावे. उदाहरणार्थ ७०० उतारे वाचून मला १७ मार्क मिळाले. या ऐवजी मी मोजके कठीण ५० उतारे वाचले व त्यावर येता योग्य विश्लेषण करून उत्तरे लिहिली हा रस्ता तुला अनुसरायला हवा. या परीक्षेकरिता किती प्रयत्न करायचे तेही तुलाच ठरवायचे आहे.