● मी मागील ६-८ महिन्यापासून राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करत आहे. २०२६ ला परीक्षा देण्याचे नियोजित आहे. माझे वय जास्त असल्याने मी यूपीएससी साठी पात्र नाही. क्लासेस लावायचा विचार आहे. पुण्यातील एक ऑनलाइन क्लास पहिला आहे परंतु त्याची फी खूप जास्त आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दिल्ली येथील एक यूपीएससी हिंदी मीडियम ऑनलाइन क्लास खूप माफक किमतीमध्ये उपलब्ध आहे. आर्थिक अडचणीमुळे निर्णय घेता येत नाही. २०२५ पासून एमपीएससीचा अभ्यासक्रम यूपीएससी सारखाच आहे. परंतु हिंदी मी़डियम मध्ये क्लासेस लावुन, यूपीएससी चा अभ्यास करावा का? त्याने एमपीएससी साठी काही मदत होईल का. दिल्ली येथील क्लास चे नोट्स देखील हिन्दी मध्ये तसेच मुख्य परीक्षेसाठी उत्तर सराव देखील हिन्दी मध्येच करावा लागेल त्याचे काही तोटे आहेत का?—हर्षद पाटील, ठाणे.
आपली कोणतीच माहिती आपण मला दिलेली नाही. फक्त क्लास पैसे व परीक्षा देण्याची इच्छा या पलीकडे कुठलाच उल्लेख सापडत नाही. मी काढलेला आपल्या प्रश्नाचा सारांश पुढील प्रमाणे, आपले यूपीएस्सी करता वय नियमात बसत नाही याअर्थी 33 पूर्ण झाली असावीत. सध्या काय काम करत आहात व आर्थिक तरतूद काय याचा उल्लेख नाही. आर्थिक ओढाताण आहे हे कसे समजावे? गेले सहा ते आठ महिने एमपीएससीचा अभ्यास करत आहात याचा अर्थ अभ्यास कसा व किती आहे याचा अंदाज आपल्याला लागला आहे. आपला शैक्षणिक प्रवास जर कळला असता तर त्या अभ्यासात कोणत्या पद्धतीत त्याचा उपयोग होऊ शकतो याचा मला उल्लेख करता आला असता. हिंदी मधील ऑनलाइन क्लास स्वस्त आहे म्हणून लावू नये. त्याचा कोणत्याही स्वरूपाचा फायदा होईल असे मला वाटत नाही. कारण राज्यसेवा परीक्षेत मराठी माध्यमाचा जास्त वापर होतो. आपल्या नावावरून आपण मूळ हिंदी भाषिक नाही हे कळते म्हणून सांगत आहे. घरात हिंदी बोलणारा व हिंदी माध्यमातून पदवी घेतलेला विद्यार्थी असा फायदा घेऊ शकतो. कोणत्याही क्लास शिवाय पूर्व परीक्षा आपण पास होण्यावर सध्या लक्ष केंद्रित करावे. विविध लेखकांची पुस्तके वापरून व चाचणी पेपर सोडवून २०२६ सालचा प्रयत्न द्यावा. मला कळलेल्या माहितीवरून एवढीच मदत मी करू शकत आहे.
हेही वाचा >>> VNIT Nagpur recruitment 2024 : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत नोकरीची संधी! पाहा माहिती
● मी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे तृतीय वर्षामध्ये शिकत असून मला यूपीएससी परीक्षेची तयारी करायची आहे व त्यासाठी मी नियमितपणे लोकसत्ता या पेपरमध्ये आपला करिअर मंत्र हा वृत्तांतमधे वाचत असतो. कृपया मला पुणे येथे यूपीएससीची तयारी करण्यासाठी कोणता शिकवणी क्लासेस लावावा त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करावे. – हिमांशू सुसर
हिमांशू तुझे इंजिनिअरिंगचे तिसरे वर्ष चालू आहे जे अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहे. पुढच्या वर्षी तुला प्रोजेक्ट करायचा आहे. त्यामध्ये लक्ष घालून स्वत:चे कौशल्य वापरलेस तर ते तुला कायम आत्मविश्वास देणारे काम ठरणार आहे. तुझ्या दहावीपासून आतापर्यंतच्या प्रवासातील मार्क कळवलेले नाहीत. सातत्याने ऐंशी टक्के मार्क असतील व इंजिनीअरिंगचा सीजीपी साडेआठच्या पुढे असेल तर मिळेल ती नोकरी एक वर्षभर करताना यूपीएससीच्या पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी रोज एक ते दोन तास तू देऊ शकतोस. त्याचा संपूर्ण आवाका कळल्यानंतर त्या रस्त्याला जायचे की नाही तू ठरव. त्याचप्रमाणे घरच्यांशी यासाठी किती काळ प्रयत्न करणार व त्याचा खर्च कोण करणार याची मोकळेपणे चर्चा होणे खूप महत्त्वाचे व गरजेचे आहे. बारावी पर्यंतचे क्लासेस व इंजिनीअरिंग साठीचा खर्च केल्यानंतर मुलगा काही न मिळवता फक्त यूपीएससीची तयारी करत आहे हे घरच्यांना माहिती हवे व त्यांचा सपोर्ट त्यांनी द्यायला हवा. यामध्ये क्लास व अभ्यासाच्या तयारीसाठी परगावी राहण्याचा खर्च मी गृहीत धरलेला नाही. शेवटचा तुझा प्रश्न क्लासचा. क्लास लावला म्हणजे यश मिळते हा मुळात चुकीचा समज आहे. करिअर वृत्तांत मध्ये आयएएस झालेल्या श्री. नरवडे यांची मुलाखत मुद्दामून शोधून तू वाचावीस अशी माझी तुला सूचना आहे. अभ्यास कळल्यानंतर तांत्रिक मदत घेऊन परीक्षेचे टेक्निक कळण्याकरता क्लासचा उपयोग नक्की होतो. तू कोणता लावायचा याच्या संदर्भात निर्णय तुझा तुलाच घ्यायचा आहे. आजवर कोणता क्लास लावायचा या संदर्भात मी कोणालाही कोणतीही सूचना केलेली नाही.