मस्कार, माझी मुलगी नुकतीच ICSE बोर्डातून १० वी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. तिला ९२ टक्के मिळाले. पण तब्येतीच्या समस्येमुळे डॉक्टरांनी तिला एक वर्षाचा ब्रेक घेण्याचा सल्ला दिला. तिला तिचे शैक्षणिक वर्ष वाया घालवायचे नाही. आम्हाला NIOS ओपन स्कूलिंगबद्दल माहिती मिळाली. त्यामुळे तुम्ही आम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करावे. याप्रमाणे NIOS मधून नियमित कॉलेजांमध्ये हे वर्ष पूर्ण केल्यानंतर आम्हाला प्रवेश मिळू शकतो का? ते सर्वत्र वैध/मंजूर आहे की त्याला काही मर्यादा आहेत? की हे पूर्ण झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेत काही अडचणी येतील? यापुढे उच्च-स्तरीय शिक्षण चालू ठेवणे तिच्यासाठी समस्याप्रधान असेल का? तिला मानसशास्त्रात करिअर करायचे आहे. ठकडर तिच्या करिअरच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरेल का? – अपर्णा

एनआयओएस ही केंद्र सरकारने स्थापन केलेली, सर्व मान्यवर विद्यापीठांनी मान्य केलेली संस्था आहे. इथून बारावी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयात मुख्य प्रवाहात प्रवेश घेता येतो. मानव्य शास्त्र असो किंवा वाणिज्य शाखा दोन्हीतील दिलेले मिश्र विषय येथे उपलब्ध आहेत. दोन वर्षात पाच किंवा सहा निवडलेल्या विषयांची परीक्षा स्वत:च्या तयारी व क्षमतेनुसार देता येते. प्रत्येक शहरात परीक्षा केंद्रे असतात. काही मोठ्या शहरात याची तयारी करून घेणारे क्लासेस पण आहेत. आपल्या मुलीचे आयसीएससीचे मार्क पाहता हा अभ्यासक्रम ती उत्तम पद्धतीत पार पाडेल याची खात्री बाळगावी. मात्र कॉलेज नसल्यामुळे दैनंदिन अभ्यासात ठरावीक वाचनाची शिस्त व लेखनाचा सराव गरजेचा राहतो. आपल्या कन्येला मानसशास्त्रात पदवी घ्यायची आहे तोही विषय ती अकरावी बारावीला शिकू शकते. या पद्धतीत अभ्यासक्रम पूर्ण केलेले यशस्वी असंख्य विद्यार्थी विविध क्षेत्रात जबाबदारीची कामे करतात. मात्र अकरावी इथे व बारावी पुन्हा कॉलेजमध्ये हा विचार मनातून काढून टाकणे गरजेचे आहे. काही कारणाने अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी तीन पातळ्यांवर सरकारी व्यवस्था गेली ५० वर्षे उपलब्ध आहे. शालेय पातळीवर नॅशनल ओपन स्कूल, अकरावी बारावी साठी एनआयओएस, तर पदवी पातळी साठी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी यांची स्थापना केली गेली आहे. पालकांच्या मनात मात्र आपण दुय्यम रस्ता स्वीकारतो का काय असा उगाचच अपराध भाव किंवा गिल्ट कॉम्प्लेक्स असतो. त्यात भर घालण्यासाठी नातेवाईक, शेजारीपाजारी यांचे कडून अज्ञानमूलक प्रश्न विचारून गोंधळ वाढवतात. खेळात निपुण असणारे अनेक विद्यार्थी, आर्थिक अडचण असलेले विद्यार्थी, नोकरी करत शिकणारे विद्यार्थी, अध्ययन अक्षमता असलेले असंख्य विद्यार्थी यांचेसाठी हा सुंदर रस्ता आहे.

हेही वाचा >>> Central Railway Apprentice Recruitment 2024: मध्य रेल्वेत नोकरीची संधी! २४२४ जागांसाठी होणार भरती; कसा कराल अर्ज?

लेखमालेच्या मागील काही लेखांपासून पण काही शिष्यवृत्त्यांविषयी माहिती जाणून घेत आहोत. ज्यात काही विशिष्ट अभ्यासक्रम किंवा प्रवर्गाचा तर विचार केलेला आहेच पण त्याच बरोबर काही शिष्यवृत्त्या हे प्रामुख्याने सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्याच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या दिसतात. अर्थात अशा शिष्यवृत्त्यांची निवड प्रक्रिया, अटी-शर्ती किंवा शिष्यवृत्ती देण्यासाठीचे विभाग ठरलेले असले तरी त्या-त्या ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या स्वप्नांना पंख देण्यासाठीच जाणूनबुजून याबाबत सखोल विचार करत त्या सुरू केल्याचे दिसते. आज पण अशाच एक शिष्यवृत्तीबाबत बोलणार आहोत जी एक सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे.

सायबेज सॉफ्टवेअर प्रा. लिमिटेट कंपनी जी सॉफ्टवेअर क्षेत्रातील नावाजलेली कंपनी आहे, या कंपनीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ( CSR) उपक्रमांची जबाबदारी स्वीकारताना ‘सेवा सुविधा नसलेल्या समुदायांपर्यंत पोहोचणे’ हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून सामाजिक उत्तरदायित्व लक्षात घेऊन, मानवी प्रतिष्ठेचा विचार करून सामाजिक क्षेत्रातील आपली नैतिकता जपत स्वत:चे एक ब्रीदवाक्य ठरवले ‘आम्ही ज्या समुदायांमध्ये काम करतो त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात सक्रियपणे योगदान देणे’. आणि या वचनाला जागत समाजातील दुर्बल घटकांसाठी एक चांगली, शाश्वत जीवनशैली तयार करणे आणि देशाचा मानवी विकास वाढविण्याच्या उद्देशाने सामाजिक ऋणाची परतफेड करण्यासाठी सामाजिक विकासाशी सुसंगत अशा सायबेज आशा (ऑक्टोबर २००३) आणि cybagekhushaboo खुशबू चॅरिटेबल (जुलै २००९) ट्रस्टची स्थापना करून सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

या उपक्रमांतर्गत अर्थपूर्ण शैक्षणिक आणि सामाजिक-आर्थिक योजना आखल्या गेल्या ज्याचा उद्देश समाजातील दुर्बल, गरजू, वंचित लोकांच्या उन्नतीसाठी सर्वोतोपरी मदत करणे हा आहे. सायबेज आशा (CybageAsha) चे मुख्य कार्यक्रम ग्रामीण उत्थान, दारू-व्यसनमुक्ती, समाजकल्याण आणि गो-ग्रीन उपक्रम आहेत, तर खुशबू शिष्यवृत्ती कार्यक्रम (cybagekhushaboo scholarship) आणि शैक्षणिक समुपदेशनाद्वारे गरजू विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची सुविधा देते. हे परिणामकारक उपक्रम सायबॅगियन्सच्या मदतीने स्वतंत्रपणे राबवले जातात जे त्यांच्या सेवा स्वयंसेवा करतात किंवा सायबेजच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या सक्षम मार्गदर्शनाखाली इतर स्वयंसेवी संस्थांसोबत काम केले जाते.

या खुशबू चॅरिटेबल ट्रस्टने उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी जो एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे त्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर आणि त्यांचा अभ्यास पूर्ण करण्याच्या इच्छेवर अधिक भर दिला गेला आहे. 

या शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी पात्रता निकषांचा विचार केला तर –

१. अर्जदार विद्यार्थ्याला किमान ६० टक्के गुणांसह १० वी आणि १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ज्यात कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असावे.

२. अर्जदार विद्यार्थ्याला किमान ८० टक्के गुणांसह १० वी आणि १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ज्यात कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे.

३. पुणे, नाशिक, अहमदनगर येथील रहिवासी असणाऱ्या जे-जे विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतात त्यांच्या शिष्यवृत्तीचे केवळ वार्षिक आधारावर नूतनीकरण केले जाते.

४. पुढील वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी अर्जदाराने गुणपत्रिका आणि फी रचना सादर करणे आवश्यक आहे.

५. शैक्षणिक वर्षात विद्यार्थी कोणत्याही विषयात अनुत्तीर्ण झाल्यास शिष्यवृत्ती बंद केली जाते.

खुशबू शिष्यवृत्ती कार्यक्रमात (cybagekhushaboo scholarship) अभियांत्रिकी, वैद्याक, फार्मसी, नर्सिंग, व्यवस्थापन, आर्किटेक्चर, बीसीए, बीबीए, एमबीए इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश असून ह्या शिष्यवृत्तीसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मदत मिळू शकते. ऑनलाइन फॉर्म भरताना नोंदणी मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक डाउनलोड करून फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म स्पष्टपणे आणि पूर्णपणे भरलेला असावा, सर्व माहिती/ प्रश्न भरणे अनिवार्य असून ट्रस्ट अयोग्यरित्या भरलेला फॉर्म विचारात घेणार नाही.

विनंती केल्यानुसार कोणतीही कागदपत्रे सादर करण्यात अयशस्वी झाल्यास, ट्रस्ट अर्जदाराच्या फॉर्मचा विचार करत नाही. तेव्हा या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना तुम्हाला उपलब्ध होणार फॉर्म व माहिती काळजीपूर्वक भरण्याची खबरदारी सर्वच विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. अर्जदाराला शिष्यवृत्ती मंजूर करताना ट्रस्ट काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार निश्चितपणे करते ज्यात कागदपत्रांची पडताळणी सोबतच अर्जदाराची मुलाखत, गृहभेट आणि फीचे मूल्यांकन या महत्त्वपूर्ण गोष्टी बघितल्या जातात.

या शिष्यवृत्तीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही http://www.cybagekhushboo.org या संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता. १५ ऑगस्ट २०२४ ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे.