डॉ श्रीराम गीत

नमस्कार सर, मी आपल्या या सदराची नियमित वाचक आहे. अनेक विद्यार्थी आणि पालकांना यातून बहुमोल असे मार्गदर्शन मिळते. त्यासाठी आपले मनापासून आभार. माझी मुलगी यंदा दहावीला आहे. गणितात पैकीच्या पैकी गुण घेणारी आहे. इंजिनीअरिंग करण्यासाठी दहावीनंतर डिप्लोमा करावा की अकरावी -बारावी करून प्रवेश परीक्षेद्वारे जावे? कुठला रस्ता योग्य आहे? दोन्ही मार्गांसाठी वेगवेगळे मतप्रवाह ऐकते आहे. अकरावी -बारावी करून विद्यार्थ्यांची प्रगल्भतावाढते असे ऐकते आहे. मग हा विचार डिप्लोमासाठी लागू होत नाही का? कृपया यावर मार्गदर्शन करावे.

ayurvedic experts to hold seminar on garbhavigyan event at iit bombay
आयआयटी प्रांगणात ‘गर्भविज्ञान’ धडे; उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून विरोध
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
schedule for postgraduate medical admissions announced after changing eligibility criteria
पात्रता निकष बदलल्यानंतर वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर
article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Mumbai Municipal Corporation , Class two Test,
मुंबई : स्वयंअध्ययनातील निपुणतेसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांची चाचणी
Education Institute Quality, Education Institute ,
अशा वातावरणात कशी वाढणार शिक्षणाची गुणवत्ता?
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
MPSC Preparation Group B Services Prelims Exam History of Modern India
एमपीएससी तयारी: गट ब सेवा पूर्व परीक्षा; आधुनिक भारताचा इतिहास

मनीषा हजारे, छत्रपती संभाजी नगर.

डिप्लोमा का बारावी याबद्दल खूप चर्चा अनेक जण, अनेक पद्धतीत करत असतात. इथे त्या चर्चेत फारसे न पडता डिप्लोमाचे ठळक काही फायदे नोंदवत आहे त्यावर आपण विचार करावा.

१. अकरावीचा प्रवेश, अकरावी बारावीसाठीचे क्लासेस, त्या सगळ्या खर्चातून व कटकटीतून आपण बाहेर येता.

२. शाखा निवड आत्ताच करता आल्यामुळे त्यातूनही एक मानसिक शांतता मिळते.

३. डिग्री प्रवेशाच्या वेळेला असलेली तीव्र स्पर्धा डिप्लोमाच्या संदर्भात नसते जागा शिल्लकही राहतात. कोणती संस्था निवडायची यासाठी भरपूर वाव राहतो.

४. गणित चांगले असल्यामुळे अकरावी बारावीचे गणित पदविका घेताना शिकत राहिले तर इंजिनीअरिंग पदवीसाठी त्याचा फायदाच होतो.

५. बारावीनंतर माझे काय होणार या काळजीमध्ये अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांकडे बघितले तर, डिप्लोम चे विद्यार्थी त्या मानाने खूप शांतपणे एकाग्रतेने अभ्यास करून छान मार्क मिळवतात व पदवीला जातात.

याचा थोडक्यात विचार करून आपण योग्य तो निर्णय घ्या.

या वर्षी मी बीएच्या शेवटच्या वर्षात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या सरळसेवा या परीक्षांची देखील तयार करतोय. माझा प्रश्न असा की या वर्षी पदवीधर झाल्यावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी एमएसडब्लू या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन तेथे राहून आपली पुढील वाटचाल सुरू ठेवावी. असे करणे योग्य राहील का? तो अभ्यासक्रम पूर्ण करत असताना स्पर्धा परीक्षा करू शकतो का?

माधव शिंदे तुझा निर्णय योग्य आहे. मात्र त्यात जरा मी एक वेगळी सूचना करतो. प्रथम एम.एस.डब्ल्यू. पूर्ण कर. ते पूर्ण करत असताना स्पर्धा परीक्षा हा विषय डोक्यात सुद्धा नको. पास झाल्यानंतर एखाद्या एनजीओ बरोबर काम करत असताना दोन वर्षात स्पर्धा परीक्षांच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचा आवाका समजून घे. रोज एक तासाचा अभ्यास कर. एम.एस.डब्ल्यू. शिकत असताना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास होण्याची शक्यता अजिबात नाही. कारण समाजसेवेच्या पदवीचा अभ्यास करताना फिल्ड वर्क, केस स्टडीज, प्रत्यक्ष काम, प्रात्यक्षिके यात खूप लक्ष देऊन शिकावे लागते. अशा स्वरूपाच्या शिक्षणाची आजवर तुला अजिबात कल्पना नाही. बीए पूर्ण केलेले असल्यामुळे वर्गात बसून शिकणे एवढाच प्रकार घडलेला आहे. मात्र नोकरी करत असताना सकाळी नऊ ते सायंकाळी सहा नोकरी व रात्रीचा एक तासाचा सलग अभ्यास हे करून तुला दोन वर्षात यशापर्यंतचा रस्ता दिसू लागेल. एकीकडे स्वत: कमवायला सुरुवात केली असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. मुख्य म्हणजे तुझ्या हाती यशाच्या दृष्टीने प्रयत्न करण्याकरता किमान चार ते सहा वर्षे सहज राहतील. हाती पदवी आली की तातडीने स्पर्धा परीक्षांच्या मागे जातो, असे करण्याऐवजी हा रस्ता खऱ्या अर्थाने यशोदायी ठरू शकतो. योग्य तो विचार करून निर्णय घेशील याची मला खात्री वाटते त्यासाठी शुभेच्छा.

Story img Loader