श्रीराम गीत

मुलांनी कोही आगळं वेगळं करायचं ठरवलं की, अनेक कंगोरे एक दम टोक दारपणे समोर येतात. हे कंगोरे खरे कि ती, को खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. दूरचित्रवाहिनीवरील मालिकोंमुळे गायन आणि नृत्याकडे लहान वयातच वळणारे अनेक जण आजूबाजूला दिसतात. अशीच एक नुपूर. नृत्याकडे वळल्यानंतर आलेला अनुभव तिच्याच शब्दांत.

case against three in mumbai for kidnapping tailor
मुंबई: ‘डिझाइन’चोरल्याच्या संशयावरून मारहाण, एक लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
vision women pune, vision young woman pune,
‘आयटी’तील तरुणीची दृष्टी अखेर वाचली! मद्यपीने भिरकाविलेल्या दगडामुळे गंभीर दुखापत; डॉक्टरांच्या ६ महिन्यांच्या प्रयत्नांना यश
women Murder husband Thane,
ठाणे : अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या
mp honour killing
Madhya Pradesh : धक्कादायक! परजातीतल्या मुलाशी प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून बापाने केली स्वत:च्या मुलीची हत्या
Clash between two generations in virtual and real world
सांधा बदलताना : हा खेळ आभासांचा
Nisargalipi lesson in nature education
निसर्गलिपी – निसर्ग शिक्षणाचा धडा
Varanavati is relaxed due to the capture of the python while the Karnal area is frightened by the rampage of the leopard
अजगर पकडल्याने वारणावती निर्धास्त, तर कर्नाळ परिसर बिबट्याचा वावराने भयभीत

मी जेमतेम दुसरीत गेले असेन. त्यावेळी ममाने मला एका डान्स क्लासला नेऊन घातले. निमित्त होते उन्हाळी सुट्टीला सुरुवात झाल्याचे. ममा त्या वेळेला आयटी मधे नोकरी करत होती. पप्पा एका मार्केटिंग जॉब मध्ये होते. सुट्टीमध्ये मुलीचे करायचे काय? हा प्रश्न सोडवण्यासाठी खरं तर माझी क्लासमध्ये रवानगी झाली. खरोखर आजही मला गंमत वाटते ते म्हणजे माझ्या क्लासचे नाव. ते पण ‘नुपूरालय’ असे होते. ममाला मी विचारले सुद्धा, ‘व्हॉट इज नुपूरालय?’ तर तिथल्या ताईनीच मला गोड हसून उत्तर दिले तुझ नाव नुपूर म्हणूनच आता इथे नृत्य शिकणार आहेस.

पाहता पाहता सुट्टीचे अडीच महिने संपले. स्कूल अगेन रीस्टार्टेड. पण वेळ बदलून माझा क्लास माझ्याच आग्रहावरून चालू राहिला. स्कूलमध्ये कौतुक वाट्याला येणे जरा कठीणच, म्हणूनही असेल किंवा मला नृत्याच्या हालचालीत नैसर्गिक गती असेल, इतरांपेक्षा माझे कौतुक काकणभर जास्तच होत असे.

हेही वाचा >>> IIIT Nagpur recruitment 2024 : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे नोकरीची संधी! माहिती पाहा

दुसरी ते नववी अशी सात वर्षे नृत्यातील एकेक पायरी झपाट्याने पार पाडत माझी खूपच प्रगती झाली होती. केवळ प्रगतीच नसून नवीन आलेल्या प्राथमिक शाळेतील मुलींना शिकवण्यासाठी माझा शिकण्याचा वेळ सोडून थांबवून घेतले जाई. त्या अर्थाने मी तिथली सर्वात लहान ताई झाले होते. मी ताई झाल्यापासून मला क्लासची फी भरावी लागली नाही, पण छोटासा पॉकेट मनी सुद्धा सुरू झाला. शाळेत असतानाच मिळालेला तो पॉकेट मनी घरी घेऊन आल्यावर ममा आणि पप्पा दोघांनाही माझे प्रचंड कौतुक वाटले होते. नववीमध्ये माझा पॉकेट मनी सुरू झाला त्याच वर्षी मला गणितामध्ये शंभर पैकी शंभर तर संस्कृत मध्ये शंभर पैकी ९० मार्क मिळाले होते. पुढे काय करायचे? काय शिकायचे? याविषयी मला फारशी माहिती नव्हती.

नुपूरालय चालवणाऱ्या गुरू ताईंचे नाव शहरात खूप मोठे आहे आणि त्यांचे मोठमोठे कार्यक्रम अनेक शहरात होतात हे मनात पक्के ठसले होते. असा एखादा मोठा कार्यक्रम असला की महिनाभर क्लासमध्ये प्रचंड हलचल असे. असाच एक कार्यक्रम ठरला त्या वेळेला मला त्यात भाग घेता येईल का, असे मी विचारले. कारण त्या कार्यक्रमाची प्रॅक्टिस मी पाहतच होते. माझ्यापेक्षा मोठ्या ताईने मला उत्तर दिले, तुझे अरंगेत्रम झाल्याशिवाय कोणत्याही जाहीर कार्यक्रमात तुला घेतले जाणार नाही. थोडीशी रागानेच मी घरी जाऊन ममाला हे सांगितले. तर तिने हसून मलाच समजावले की मोठ्या गुरूंचा फोन आला होता, तुमच्या नुपूरचे अरंगेत्रम कधी करायचे? मग कधी करणार असा प्रश्न मी ममाला विचारला. तर तिने अजूनच हसून उत्तर दिले यंदाचा एक लाख रुपये बोनस मिळाला की तो तुझ्या अरंगेत्रमसाठीच मी राखून ठेवला आहे. नृत्याला इतके पैसे लागतात याची जाणीव त्या दिवशी मला पहिल्यांदा झाली. दहावी सुरू होण्याच्या आधीच तो मोठा कार्यक्रम झाला.

ममा पप्पांचे ऑफिसमधील सहकारी व सर्व नातेवाईक यांना शानदार महागडी इंव्हिटेशन्स गेली होती. दोनशे व्यक्ती बसतील अशा एका एसी हॉल मध्ये हा कार्यक्रम झाला. त्यासाठीचे माझे फोटो शूट आधीच केले गेले होते. इतके सुंदर माझे फोटो पाहून तीच का मी? असा प्रश्न मला कायम पडत आला. तो कार्यक्रम आणि माझे फोटो यामुळे पुढे काय करायचे याचे माझ्यापुरते उत्तर पक्के ठरले. माझे नाव नुपूर, प्रशिक्षण घेतले नुपूरालयात, तर सारी करिअर नृत्यातच.

शाळा ते पदवीचा प्रवास

दहावीचा निकाल लागला. गणितात शंभर पैकी शंभर. संस्कृत मध्ये शंभर पैकी ९५. एकूण टक्के ८५. निकालानंतरच्या दुसऱ्याच दिवशी कधी नव्हे ते ममा पप्पाशी माझे भांडण झाले. दोघांनी एकमताने मला बजावले. आता नृत्य बंद. सायन्सला जाऊन इंजिनीअर हो. छंद म्हणून नृत्य चालू ठेवायला आमची हरकत नाही. सायन्स घेतलेल्या माझ्या मैत्रिणींची दिवसभराची अभ्यासाची फरपट मी पाहत असल्यामुळे मी ठाम नकारच दिला. पप्पा खूप संतापले होते, ‘नाचून काय तुझे पोट भरणार आहे का?’ या वाक्यावर मी त्यांच्याशी बोलणेच बंद केले.

ममाने गोड बोलून माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तो मी असा काही झिडकारला की आठ दिवस आमच्या तिघात अबोलाच राहिला. नृत्याचा क्लास तीन तास चालू राहून काय शिकता येईल याचा शोध मीच घ्यायला सुरुवात केली. संस्कृत, गणित, दोन भाषा व मानसशास्त्र असे विषय घेऊन एका नामांकित कॉलेजमध्ये कला शाखेत मी प्रवेश मिळवला. हळूहळू घरातील ताण निवळत गेला… पण तो आजही संपलेला नाही.

सार काही घडायचंच होतं

चांगल्या मार्काने माझे बीए झाले. नंतरही पाच वर्षे नृत्य चालूच होते. नुपूरालयातील मुख्यताई या पदापर्यंत माझी प्रगती झाली. मला महिना पंधरा हजार रुपये गुरूंकडून मिळत. छोटे मोठे जाहीर कार्यक्रम झाले तर त्यातून जास्तीची मिळकत होत असे. पप्पा कधी कधी हातातील पेपर समोरून न सरकवता त्या आडून मला टोमणा मारत. इंजिनीअर झाली असतीस तर याच्या तिप्पट कमावले असतेस. त्यावरचे माझे गडगडाटी हसणे दोघांनाही आवडत नसे. हे सारे चालू असतानाच अचानक गुरूंचे अल्पशा आजाराने निधन झाले. नुपूरालय बंद पडले. मी तर मुख्य ताईच्या भूमिकेत असूनही क्लास घेते म्हटल्यावर दहा मुलींनी पण नाव नोंदणी केली नाही. मालकाने क्लासची जागा परत घेतली. नृत्याचा क्लास घ्यायचा म्हणून मला हॉल पण भाड्याने मिळेना. कारण आसपासच्या लोकांच्या आवाजाबद्दलच्या तक्रारी येतात असे सांगितले जाई. ममाने माझ्यासाठी आणलेली लग्नाची चांगली स्थळे मुलगी फक्त नृत्य शिकवते म्हटल्यावर नकार देत असत. तो रस्ताही कुंठल्यात जमा होता. यावेळी मात्र माझे गणित आणि संस्कृत मदतीला आले. दिवसभर घरात मी एकटी असल्यामुळे गणित व संस्कृतच्या खासगी शिकवण्या सुरू केल्या. त्यांना खूपच मागणी आली. दोनच वर्षात स्वत:ची भाड्याने जागा घेऊन ‘नुपूर्स मॅथ्स एंड संस्कृत क्लासेस’, सुरू झाले. गेल्या वर्षीच एका सायन्स टीचरने माझ्याशी पार्टनरशिप केली आहे. तो आता माझा व्यवसायातला आणि लाईफ पार्टनर पार्टनर बनला आहे. रिटायर्ड ममा-पप्पांचा लाडका जावई पण…