Export-Import Bank of India Exim Bank Recruitment 2025 : सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण- केंद्र सरकारच्या इंडिया एक्झिम बँक अर्थात भारतीय निर्यात-आयात बँकेत विविध पदे भरली जात आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया २२ मार्च २०२५ पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२५ पर्यंत आहे. या भरतीच्या माध्यमातून २८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पण, इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती घ्यावी.
एकूण रिक्त जागा – २८
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
१) मॅनेजर ट्रेनी (Digital Technology) – १०
६० टक्के गुणांसह B.E./ B.Tech degree (Computer Science / Information Technology / Electronics and Communication) किंवा MCA
२) मॅनेजर ट्रेनी (Research and Analysis) – ०५
६० टक्के गुणांसह अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी
३) मॅनेजर ट्रेनी (Rajbhasha) – ०२
६० टक्के गुणांसह पदवीधर, हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
४) मॅनेजर ट्रेनी (Legal) – ०५
६० टक्के गुणांसह LLB
५) डेप्युटी मॅनेजर – Legal (Grade/Scale Junior Management I) – ०४
६० टक्के गुणांसह LLB, ०१ वर्ष अनुभव
६) डेप्युटी मॅनेजर (Deputy Compliance Officer)(Grade / Scale Junior Management I) – ०१
ICSI चे असोसिएट मेंबरशिप (ACS), ६० टक्के गुणांसह नियमित पदवी, ०१ वर्ष अनुभव
७) चीफ मॅनेजर (Compliance Officer)(Grade / Scale Middle Management III) -०१
ICSIचे असोसिएट मेंबरशिप (ACS), ६० टक्के गुणांसह नियमित पदवी, १० वर्ष अनुभव
वयाची अट
वरील पदांकरिता किमान वयोमर्यादा २८ आणि कमाल ४० वर्षे आहे. त्यात एससी, एसटी उमेदवारांना पाच वर्षे आणि ओबीसींना तीन वर्षांची सूट आहे.
परीक्षा शुल्क
या पदांसाठी अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल; तर सामान्य, इतर मागास प्रवर्ग आणि इतर प्रवर्गांतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ६०० रुपये आहे.
परीक्षेची वेळ
या भरतीसाठीची प्रवेश परीक्षा मे २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे. ही प्रवेश परीक्षा चेन्नई, कोलकाता, मुंबई व नवी दिल्ली येथे होईल. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, पुरेशा संख्येने उमेदवार नसल्यास परीक्षा केंद्रे बदलू शकतात.
तर, सर्व वैयक्तिक मुलाखती केवळ मुंबई आणि नवी दिल्ली येथे घेतल्या जातील.
वेतनश्रेणी
प्रत्येक पदानुसार वेतनश्रेणी वेगवेगळी आहे; पण यात उमेदवारांना सरासरी ४८ हजारांपासून ते एक लाख रुपयांपेक्षा जास्त वेतन दिले जाईल.