FACT Recruitment : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडतर्फे भरतीची घोषणा करण्यात आली आहे. संस्थेने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, या संस्थेमध्ये ७४ रिक्त पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या संबंधित सविस्तर माहिती https://fact.co.in/या महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. नोकरीसाठी उच्छुक उमेदवार १६ मे २०२३ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.
फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड म्हणजेच फॅक्टद्वारे होणाऱ्या या भरतीमध्ये एकूण ७४ जागा रिक्त आहेत. सिनियर मॅनेजर पदासाठी (AE) ०३ जागा, ऑफिसर पदासाठी ०६ जागा, मॅनेजमेंट ट्रेनी २७ जागा, टेक्निशियन २१ जागा, सॉनिटरी इंस्पेक्टर ०२ जागा, क्राफ्ट्समन ११ जागा, रिगर असिस्टंट ०४ जागा उपलब्ध आहेत. भरतीस इच्छुक उमेदवारांना या संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.
रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता
१) सिनियर मॅनेजर
या जागांसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/ HR किंवा समतुल्य PG पदवी /PG डिप्लोमा, ०९ वर्षे कामाचा अनुभव असावा.
२) ऑफिसर
६० टक्के गुणांसह B.Sc (कृषी) पदवी.
३) मॅनेजमेंट ट्रेनी
या जागांसाठी ६० टक्के गुणांसह केमिकल/इलेक्ट्रिकल/ इंस्ट्रूमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा ६० गुणांसह मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा किंवा CA पर्यंतचे शिक्षण आवश्यक आहे.
४) टेक्निशियन
B.Sc.(केमिस्ट्री/इंडस्ट्रियल केमिस्ट्री) / संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि दोन वर्षे कामाचा अनुभव असावा.
५) सॅनिटरी इंस्पेक्टर
१० वी उत्तीर्णसह सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स केलेला असावा, आणि किमान ०६ वर्षे अनुभव असावा.
६) क्राफ्ट्समन
या जगांसाठी १० वी उत्तीर्ण असण्यासह ITI (फिटर/मेकॅनिक/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रूमेंटेशन) पर्यंतचे शिक्षण आणि किमान ०२ वर्षे अनुभव असावा.
७) रिगर असिस्टंट
१० वी उत्तीर्ण असण्यासह ०५ व वर्षे या कामाचा अनुभव असावा.
वयाची अट
SC/ST:०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट
पद क्र.१: ४५ वर्षांपर्यंत
पद क्र.२: २६ वर्षांपर्यंत
पद क्र.३: २६ वर्षांपर्यंत
पद क्र.४ ते ७: ३५ वर्षांपर्यंत
निवड झालेल्या उमेदवारांची संपूर्ण भारतभर कोणत्याही राज्यात नियुक्ती करण्यात येईल. त्यांना १९ हजारांपासून ते २ लाख रुपयांपर्यंतचे वेतन देण्यात येईल.
उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी क्लिक करा.