विवेक वेलणकर

सध्या देशभरातील सरकारी अथवा खासगी शैक्षणिक संस्थामधील अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांचा टप्पा हा पार करावाच लागतो. प्रत्येक अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षांची पात्रता, अभ्यास, तारखा या वेगवेगळय़ा असतात. त्याबद्दलची माहिती या सदरात दर पंधरा दिवसांनी..

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
rap songs campaigning
प्रचारासाठी ‘रॅप’चा ठेका, मतदारांना आकर्षित करण्याकडे उमेदवारांचा कल
Cases of violation of Model Code of Conduct in Pune during poll campaign
आचारसंहिता भंगाचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल; सिंहगड रस्ता पोलिसांकडून कारवाई

१९८६ साली भारत सरकारच्या कापड व वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या पुढाकाराने नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेच्या आज रोजी बेंगळूरु, भोपाळ, चेन्नई, गांधीनगर, हैदराबाद, कानपूर, कोलकाता, मुंबई, दिल्ली, रायबरेली, पाटणा, पंचकुला, शिलाँग, कांगरा, जोधपूर, भुवनेश्वर आणि श्रीनगर या सतरा शहरांमध्ये शाखा असून त्यामध्ये बारावीनंतर फॅशन डिझायनिंग, लेदर डिझायनिंग, टेक्सटाइल डिझायनिंग, अ‍ॅक्सेसरी डिझायनिंग, निटवेयर डिझायनिंग, फॅशन कम्युनिकेशन आणि अ‍ॅपरल कम्युनिकेशन हे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत.

यामध्ये उपलब्ध चार हजार जागांसाठी राष्ट्रीय स्तरावरील सीईटी नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत ५ फेब्रुवारी रोजी घेतली जाणार आहे. ही परीक्षा देशभरातील ६० शहरात होणार असून महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, मुंबई व नागपूर या शहरात ही परीक्षा होणार आहे.

या परीक्षेत दोन पेपर असणार आहेत ज्यातील पहिला पेपर हा ‘जनरल अ‍ॅबिलिटी टेस्ट’ असणार आहे जो कॉम्प्युटर वर होईल ज्यामध्ये इंग्रजी ६० मार्क (४० प्रश्न), अंकगणित २० मार्क (२० प्रश्न), लॉजिक २५ मार्क (१५ प्रश्न), सामान्य ज्ञान  १५ प्रश्न (२५ मार्क) असे विभाग असतील.

ज्या विद्यार्थ्यांना नावीन्याची आवड आहे, ज्यांच्याकडे सर्जनशीलता आहे आणि चांगली स्केचिंग कला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी फॅशन/ अ‍ॅपरल डिझायनिंग हे उत्कृष्ट करिअर आहे. यामध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना फॅशन डिझायनर, फॅशन स्टायलिस्ट, टेक्सटाइल डिझायनर, रिटेल मॅनेजमेंट, फुटवेअर डिझायनर अशा विविध करिअर पर्याय उपलब्ध होऊ शकतात. याकरिताचे सर्वोत्तम आणि अद्ययावत शिक्षण देणारी सरकारी संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी.

गेल्या जवळपास सत्तर वर्षांपासून या संस्थेने जागतिक स्तरावर नावाजलेले विद्यार्थी घडवले आहेत. अद्ययावत तंत्रज्ञान, सोयीसुविधा, उत्तम अध्यापक वर्ग यामुळे ही संस्था जगभरात नावाजलेली आहे. या संस्थेत मास्टर्स आणि अगदी पीएचडीपर्यंत शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत. त्यामुळे फॅशन डिझायनिंग क्षेत्रात करिअर करू इच्छित असलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना या संस्थेत प्रवेशाच्या संधीचा जरुर फायदा घ्यावा.

सीईटी..

दुसरा पेपर हा सर्जनशीलता क्षमता मापनाचा असेल ज्यामध्ये विद्यार्थ्यांची स्केचिंग, निरीक्षण क्षमता आणि डिझाईन सेन्सिटीव्हिटी यांची तपासणी होईल. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये स्टुडिओ टेस्ट व प्रत्यक्ष मुलाखतीला सामोरे जावे लागेल. यातून विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाईल. या परीक्षेसाठी विद्यार्थी ३ जानेवारी (लेट फी सह ८ जानेवारी २०२४) पर्यंत ऑनलाइन http:// nift. ac. in/ admission या संकेतस्थळावर अर्ज भरू शकतात.