श्रीराम गीत
भारताचे दोन ठळक भाग पडतात, उत्तर भारत व दक्षिण भारत. दक्षिण भारतातील सर्वच राज्यांमध्ये नृत्यकलेकडे आदराने पाहिले जाते. त्याची परंपरा जपली जाते. गोवा व महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये दाक्षिणी व उत्तरेकडच्या परंपरांचे मिश्रण सापडते. दाक्षिणी परंपरेमध्ये देऊळे संस्कृती जपण्यात मोठीच भूमिका बजावतात. या उलट उत्तरेकडे राजाश्रय व धनिकांच्या कोठ्यांच्या आधारे नृत्यकला जपली गेली आहे,वाढली आहे. मात्र सामान्य माणसांच्या दृष्टीने नृत्यकलेबद्दल अज्ञान, अनभिज्ञता व दुर्लक्ष या तिन्हीचे एकत्रित मिश्रण सरसकट पाहायला मिळते.नृत्यामागचे शास्त्रीय विचार समजणारे फारच कमी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हा मोठा फरक पहा
तुम्हीच लक्षात घ्या, एखाद्या सिनेमाला गर्दी भरपूर होते. त्यामध्ये काही नृत्ये असतात. त्यांचे कौतुकही होते. पण पूर्णपणे नृत्यधारित सिनेमा आजवर फारसा पाहण्यात नाही. एका हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच अपवाद आहेत. नाटके भरपूर चालतात मनोरंजन करतात. संगीत नाटकांची परंपरा आहे. पण त्यात नृत्याचा अभावच असतो. केवळ शास्त्रीय नृत्याचा एखादा कार्यक्रम जर आयोजित केला गेला तर त्याचे स्वरूप सहसा निमंत्रितांसाठी असेच असते. क्वचितच प्रायोजित कार्यक्रम ऐकू येतात व यशस्वी होतात. मोठा गाजावाजा करून अरंगेत्रम सारखे काही कार्यक्रम केले जातात. त्यांना वृत्तपत्रात प्रसिद्धी पण मिळते. मात्र हे सारे स्वखर्चाने आयोजित असते.
दूरदर्शनच्या सुरुवातीपासून ठरावीक कालावधीनंतर शास्त्रोक्त नृत्याचे गाजलेल्या भारतीय कीर्तीच्या कलावंतांकडून सादर झालेले विविध कार्यक्रम नियमितपणे सादर केले जातात. मात्र त्यांची दर्शक संख्या खूपच कमी असते. केवळ नृत्यामध्ये पदवी घेणे यासाठी अनेक विद्यापीठात सोय आहे. कला शिक्षणाला वाहिलेली काही विद्यापीठे या प्रकारच्या प्रशिक्षणाला हा आवर्जून स्थान देतात. मात्र इथे शिकलेले स्नातक पुन्हा कला शिकवण्याच्या शिक्षणातच अडकतात.
भारतातच नव्हे तर जगभर याच पद्धतीत क्लासिकल डान्सकडे पाहिले जाते. बॅले डान्सर हा विशेष करून रशियात सुरू झालेला प्रकार नंतर युरोपमध्येही प्रसिद्ध झाला. इझाबेला डंकन या प्रसिद्ध बॅले डान्सरवर चरित्रपट सुद्धा निघाला व तो जगभर गाजला. नृत्य नाटिकेतून एखादी मनाला भिडणारी कहाणी सांगण्याची पद्धत जगभर रुळलेली आहे. भारतीय लोककलातही हीच पद्धत वापरली जाते. प्रत्येक राज्याला स्वत:ची लोककलेतून निर्माण झालेली नृत्य परंपरा आहे. आदिवासी जमाती मध्ये नृत्याला जीवनाचा एक अविभाज्य भाग समजला जातो. मात्र या साऱ्या प्रकारच्या नृत्यांमध्ये एक सहजता असते. साऱ्या वयोगटातील मंडळी त्यात सहभागी होऊन आनंद लुटू शकतात इतकी ती सहजता सोपी असते. कमीतकमी साधीशी वाद्यो, सोपा ठेका, कोणालाही गाता येतील अशी लोकगाणी यातून हा माहोल उभा राहतो.
पारंपरिक नृत्य शिक्षणात भारतभरात विविध परंपरा व पद्धती आहेत. कथ्थक, भरतनाट्यम, कथकली, सत्रिया, मणिपुरी या प्रमुख पद्धती समजल्या जातात. तर कुचीपुडी, ओडिशी, मोहिनीअट्टम या भगिनी शैली आहेत. शास्त्रोक्त नृत्य शैलीचा उगम यातूनच होतो व हजारो वर्षाची नृत्य परंपरा यातून जपली जाते. गुजरातचा गरबा, दांडिया किनारपट्टी वरचे कोळी नृत्य, आदिवासी बहुल भागातील वारली नृत्य, काश्मीरचे घुमरो, हिमाचल प्रदेश, बंगाल, आसाम येथील प्रादेशिक छटा संगीता नुसार बदलत जातात. महाराष्ट्रातील लावणी ही अस्सल मराठी मातीतील समजली जाते. मात्र तिच्यातही विविध परंपरा आहेत. या कलेला दृश्य कलेतील प्रमुख कला समजली जाते.
कलाकारांना भरपूर मान दिला गेला तरी जगायला लागणारे आर्थिक बळ मिळतेच असे नाही. तरी या कलेकडे वळणारे व त्याला आयुष्याभर वाहून घेणारे अनेक कलावंत होऊन गेले आहेत व होत राहतील. ही सारी एक मोठ्या पटावरची मांडणी म्हणून वाचकांसमोर ठेवत आहे. मात्र नृत्यातून करिअर करायची असे म्हणणाऱ्यांची संख्या आता वाढत आहे. त्यांचे रस्ते कसे जातात? याबद्दल पुढच्या लेखात, पुढच्या बुधवारी जरूर वाचा…..
मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं की, अनेक कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. कलाकारांना भरपूर मान दिला गेला तरी जगायला लागणारे आर्थिक बळ मिळतेच असे नाही, परंतु तरी समाज आता नृत्यातल्या करिअरकडे सकारात्मकतेने पाहू लागला आहे.