साधारणपणे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले की मुलेमुली सोनेरी करिअरची स्वप्ने रंगवू लागतात. आपल्या शिक्षणाला साजेशी नोकरी मिळवणं हे आधी सर्वात मोठं आव्हान असतं. आणि पुढे ती टिकवण्याचा डोंगर समोर उभा असतो. आपल्या मेहनतीच्या जोरावर, स्पर्धेत टिकून राहून करिअरचा ग्राफ उंचावत न्यायचा असतो. या मार्गावर अर्थात अनेक अडथळ्यांची शर्यत असते. त्या अडथळ्यांवर यशस्वी मात करण्यासाठी आणि युवक-युवतींचे मनोबल उंचावण्यासाठी डॉ. मकरंद ठोंबरे आणि डॉ. भूषण केळकर ही लेखकद्वयी आपल्या या ‘पहिले पाऊल’ सदरातून आपल्या भेटीला येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कॉलेजमधील पदवी प्राप्त करणाऱ्या मुला-मुलींमध्ये पहिल्या दुसऱ्या वर्षापासूनच पदवी घेतल्यानंतर पुढे काय करायचे याबद्दल विचार सुरू असतात. नात्यांमध्ये किंवा ओळखीच्या मित्र-मैत्रिणी पदवी घेतल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी कुठे कुठे प्रयत्न करतात त्यासाठी कुठले मार्ग अवलंबतात याकडे त्यांचे लक्ष असते. काही वर्षांपूर्वी करिअर घेण्याविषयी फारशी माहिती ज्ञान किंवा मदत नक्की कुणाची घ्यायची याविषयी लोकांमध्ये जागरूकता व सजगता नव्हती परंतु गेल्या दहा वर्षात करियर कौन्सिलिंग चा लोक उपयोग करून घेऊ लागले आहेत त्याचबरोबर सोशल मीडियाचाही यासाठी पुष्कळ वापर होऊ लागला आहे.
या वयोगटातील मुले याच काळामध्ये व्यक्तिमत्व विकासाच्या काही महत्त्वाच्या टप्प्यातून जात असतात त्यामुळे त्यांना अनेक वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. पौगंडावस्थेत अनेक शारीरिक बदल तर होतच असतात पण त्याचबरोबर मानसिक भावनिक बौद्धिक अशा अनेक स्तरांवर महत्त्वाचे बदल होतात व त्यातूनच व्यक्तिमत्त्वाचा विकास होताना दिसतो. या सर्व बदलांना सामोरे जाताना अनेकांना मानसिक व भावनिक संघर्षांना तोंड द्यावे लागते. व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच सामाजिक स्तरावरही अनेक गोष्टींची सतत जुळवून घ्यावे लागते. कॉलेजमधले वातावरण तिथल्या मित्र-मैत्रिणी त्यांचे स्वभाव त्यांची वर्तणूक त्याचबरोबर कॉलेजमधला अभ्यासक्रम तिथल्या परीक्षा व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांच्या करिअर विषयक मुलांकडून असलेल्या अपेक्षा या सर्वांचा परिणाम मुलांवर होताना दिसतो.
काही महत्त्वाकांक्षी पालक व मुले आपले प्रोफाइल अतिशय आकर्षक व्हावे यासाठी अनेक प्रकारचे कोर्सेस करताना दिसतात खूप क्लासेस अटेंड करतात बऱ्याच वेळा या सर्व धावपळीमध्ये मुलांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच शिल्लक राहत नाही. खूप कमी काळामध्ये आपल्या मुलाने अनेक कौशल्य आत्मसात करावीत असा बऱ्याच पालकांचा आग्रह दिसून येतो. बरोबर शिकणाऱ्या इतर मित्र-मैत्रिणींनी कुठले क्लासेस लावले आहेत ते सर्व कुठल्या कुठल्या गोष्टी शिकत आहेत हे सर्व मला पण यायला पाहिजे याचा अतिरिक्त दबाव मुलांवर दिसून येतो व त्यातूनच एक प्रकारची स्पर्धा व तुलना करण्याची सवय मुलांना व पालकांना लागताना दिसते.
एकीकडे स्वत:चे अस्तित्व निर्माण करणे व ते टिकवणे व बाह्यजगतामध्ये आपण कुठे कमी पडता कामा नये असं सतत वाटत राहणे या सर्व गोष्टींमुळे मुले सतत मानसिक ताण-तणावाला सामोरे जाताना दिसतात. या काळात समुपदेशनाला येणाऱ्या मुलामुलींमध्ये वैचारिक मानसिक व भावनिक स्तरावर गोंधळलेली अवस्था बऱ्याचदा दिसून येते. यातून अस्वस्थता बेचैनी खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी व झोपेच्या तक्रारी अनेकांमध्ये दिसून येतात.
नेक स्तरांवर स्वत:ला सिद्ध करण्याच्या धडपडीमुळे मुलांमध्ये ंल्ल्र७ी३८ दिसून येते वैचारिक अस्थिरता जाणवते व काही जणांना भविष्यकाळातील स्पर्धात्मक आव्हानांना आपण सामोरे जाऊ शकणार नाही असा निर्णय देखील निर्माण होताना दिसतो. आपण इतरांच्या पेक्षा खूप मागे आहोत या स्पर्धेमध्ये आपला निभाव लागणार अवघड आहे असं पुष्कळ मुला-मुलींना वाटत असतं. कारण पदवीनंतर काय करायचं कुठे नोकरी मिळवायची यासंबंधी पुष्कळ माहिती घेतलेली असते परंतु हे ध्येय गाठण्यासाठी कोणत्या प्रकारचा मार्गाचा अवलंब करायचा स्वत:मध्ये नक्की काय बदल करायचे नक्की कोणत्या प्रकारची कौशल्य आत्मसात करायची त्यासाठी व्यक्तिमत्त्वामध्ये कोणत्या प्रकारचे बदल करायचे ते कसे करायचे नक्की कोणाची मदत घ्यायची याविषयी संभ्रमावस्था पुष्कळजणांमध्ये दिसून येते.
एकंदरीत मुलांच्या आयुष्यामध्ये येणारा हा टप्पा आव्हानात्मक जरी असला तरी योग्य प्रकारे केलेले वेळेचे नियोजन स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाविषयी असलेली योग्य जाणीव व मानसिक व भावनिक ताणतणावांचे केलेले योग्य व्यवस्थापन यामुळे पदवी प्राप्त करण्यापासून नोकरी मिळेपर्यंत जाणारा काळ आपण अधिक चांगल्या प्रकारे घालवू शकतो व मिळणाऱ्या वेळेचा सदुपयोग करून आपला व्यक्तिमत्व विकास व नोकरीसाठी आवश्यक असणारी कौशल्य आत्मसात करू शकतो.
(लेखक समुपदेशक आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत) drmakarandthombare@gmail. com