आशुतोष शिर्के

मराठी मध्यमवर्गीय कुटुंबांमधील अनेक भारतीय विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची कल्पना एकाच वेळी रोमांचक, चिंताजनक आणि महत्त्वाकांक्षेला चालना देणारी असते. अभ्यास आणि करिअर याबाबत गंभीरपणे विचार करणाऱ्या आजच्या अनेक विद्यार्थ्यांना आपण पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर उच्च-शिक्षण घेण्यासाठी परदेशी जावं असं वाटत असतं. आपल्या मुला-मुलींनी एखाद्या परदेशी विद्यापीठात जाऊन पदव्युत्तर शिक्षण घ्यावं आणि उद्याच्या जागतिक संधींना गवसणी घालावी असं स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीय पालकांची संख्याही महाराष्ट्रात मोठी आहे. १९८५ नंतर भारतात आयटी शिक्षणाचा घातला गेलेला पाया आणि ९० पासूनचे जागतिकीकरणाचे आव्हान स्वीकारत भारतात निर्माण झालेले अनेकानेक धाडसी प्रयोग यामधून एक उच्च-शिक्षित पिढी परदेशात जाऊन पाय रोवून उभी राहिलेली आपण पाहिली. यातून महाराष्ट्रातील मध्यमवर्गामध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला.

torres ponzi scam in mumbai
Torres Ponzi Scam: ‘असा’ झाला टोरेस कंपनीचा घोटाळा; मालक विदेशात फरार, अनिश्चिततेत गुंतवणूकदार!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Girl's Hair Cut case At Dadar Station
“म्हणून मी तिचे केस कापले…”, दादर स्थानकात तरुणीचे केस कापणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
loksatta editorial on inflation
अग्रलेख: थाली बचाव…!
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Bangladesh Army violence against Hindu
Video: बांगलादेशी सैन्याचे हिंदूंवर अत्याचार; चितगावमध्ये ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?
loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!

परदेशी शिक्षण अनेक संधी देऊ शकते हे खरे , पण हा निर्णय घेताना उद्दिष्टे आणि गैरसमज यामधील फरक ओळखणे महत्त्वाचे आहे.

परदेशी शिक्षणाचे आकर्षण

परदेशी उच्च शिक्षणामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान, जागतिक नेटवर्क्स यांच्याशी आपण जोडले जाऊ, जागतिक स्तरावरच्या सांस्कृतिक विविधतेचा अनुभव आपल्याला घेता येऊ शकेल, आधुनिक देशांतील उत्तम सुविधा असणार्या विद्यापीठांमधील नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आपण पार पाडू शकू. अशा विद्यापीठांमधील संशोधनसंधी आपल्याला समृद्ध करतील अशी अनेक आकर्षणे महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरत आहेत.

याशिवाय, परदेशी विद्यापीठांमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्र विचार करण्याची क्षमता. लवचिकता आणि तर्कशक्ती विकसित झालेली आपण पाहतो. ही कौशल्ये आजच्या जागतिक युगात खूपच महत्त्वाची ठरत आहेत. आंतरराष्ट्रीय कामाचा अनुभव घेण्याच्या संधी आणि परदेशी पदवीसोबत येणारी प्रतिष्ठा यामुळेही परदेशी शिक्षणाचे आकर्षण आज वाढते आहे.

परदेशी शिक्षण निवडण्यामागील चुकीची कारणे

हा निर्णय घेताना मराठी कुटुंबांमध्ये काही चुकीचे समज घर करून बसलेले आढळतात.

प्रतिष्ठेचा प्रश्न : काहीं पालकांना मुला- मुलींना परदेशात शिक्षणासाठी पाठवणे हा सामाजिक प्रतिष्ठेचा भाग वाटतो. परदेशी पदवी जणू काही यशाची हमखास आणि एकमेव शिडी आहे आणि काहीही करून ही शिडी मिळालीच पाहिजे मग त्यासाठी कोणत्याही युनिव्हर्सिटीचा कुठलाही अभ्यासक्रम चालेल, असा विचार केला जातो. यामधून घेतलेले निर्णय हमखास चुकीचे ठरलेले मी अनेकदा पाहीले आहेत.

यशाचा शॉर्टकट : परदेशी शिक्षण घेतल्याने उच्च वेतनाची नोकरी मिळणारच, असा चुकीचा समज फारच पसरलेला आढळतो. प्रत्यक्षात यश विद्यार्थ्याच्या प्रयत्नांवर, कौशल्यांवर आणि परिस्थितीनुसार काम करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर अवलंबून असते.

भारतीय शिक्षणापासून पळ काढणे: भारतीय शिक्षणपद्धतीत काही अडचणी असल्या तरी फक्त भारतीय शिक्षण पद्धतीपासून सुटका मिळवण्यासाठी परदेशात जाणे हा निर्णय योग्य नाही.

परदेशी शिक्षणाबद्दल योग्य दृष्टिकोन

उच्च-शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा निर्णय घेताना सर्वप्रथम उद्दिष्टांची स्पष्टता असायला हवी. त्यानंतर निर्णय भरपूर माहितीवर आधारित आणि विद्यार्थ्यांच्या करिअरबद्दलच्या ज्या अपेक्षा आहेत त्याच्याशी सुसंगत असावा. हा निर्णय घेताना खालील बाबी लक्षात घ्यायला हव्यात:

उद्दिष्टांची स्पष्टता : विद्यार्थ्यांचे दीर्घकालीन उद्दिष्ट काय आहे हे ठरवा. निवडलेल्या अभ्यासक्रमामुळे किंवा विद्यापीठामुळे भारतात उपलब्ध नसलेल्या एखाद्या ज्ञान शाखेमध्ये किंवा कौशल्यामध्ये तुम्ही तज्ञ होणार आहात का?

सखोल संशोधन करा: सर्व परदेशी विद्यापीठे सारखी नसतात. विद्यापीठाची मान्यता, प्राध्यापकांची गुणवत्ता, माजी विद्यार्थ्यांना मिळालेले यश आणि त्या विद्यापीठातील पदवी मिळाल्या नंतरच्या संधी यांचा अभ्यास करावा. केवळ परदेशात जाण्यासाठी कमी दर्जाच्या विद्यापीठात प्रवेश घेणे टाळा.

आर्थिक नियोजन : परदेशी शिक्षण महागडे असते. कुटुंबांनी आपली आर्थिक क्षमता वास्तविकतेत तपासावी आणि शिष्यवृत्ती, अर्ध-वेळ कामाच्या संधी आणि शिक्षण कर्जाचा विचार करावा. परदेशी शिक्षणामुळे आर्थिक ताण येऊ नये.

कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करा: परदेशी शिक्षणाचा खरा फायदा म्हणजे त्यातून मिळणारी कौशल्ये आणि दृष्टिकोन. विद्यार्थ्यांनी अभ्यासा दरम्यान आपले ज्ञान, नेटवर्क्स आणि क्षमतांचा विकास करायला हवा.

पर्यायांचा विचार करा : निर्णय घेण्यापूर्वी, भारतात त्याच प्रकारचे अभ्यासक्रम किंवा संधी उपलब्ध आहेत का याचा विचार करा. अनेक भारतीय संस्थांमध्ये आता परदेशी विद्यापीठांसोबत सहकार्याने जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम उपलब्ध केले जात आहेत.

संतुलित दृष्टिकोन

परदेशी शिक्षण हा केवळ प्रतिष्ठेचा किंवा यशाचा राज-मार्ग नाही. आपण त्याकडे व्यापक दृष्टीकोन, कौशल्य विकास आणि जागतिक करिअरसाठीची तयारी म्हणून पाहायला हवे – पळवाट किंवा सामाजिक अपेक्षा म्हणून नव्हे.

महत्त्वाकांक्षा आणि व्यवहार्यता याची सांगड घालत माहितीच्या आजच्या युगात ही ‘दिगंतातील भरारी’ आपल्याला नक्कीच शक्य आहे. पुढील लेखांमधून उच्च शिक्षणातील परदेशी विद्यापीठांमधील अनेक वाटांचा परिचय आपण येथे करून घेणार आहोत.

(लेखक करिअर समुपदेशक आहेत)

mentorashutosh@gmail.com

Story img Loader