किरण सबनीस

पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणाच्या जगात शिरताना, प्रवेश परीक्षा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु सर्वच प्रवेश परीक्षा समान नसतात. विशेषत:, डिझाइन क्षेत्रातील प्रवेश परीक्षा या पारंपरिक अभियांत्रिकी, वैद्याकीय, सनदी लेखापाल, कायदा, व्यवसाय या परीक्षांपेक्षा अनेक बाबतीत भिन्न असतात. या लेखात आपण या परीक्षांच्या वेगळेपणा समजून घेणार आहोत, ज्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना डिझाइन शिक्षणाच्या विशिष्ट आवश्यकता समजण्यास मदत होईल.

TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान
Thane district, 578 children came under education stream, Survey of out of school children
ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात
Loksatta kutuhal Artificial Intelligence ISRO and DRDO
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता : इस्राो आणि डीआरडीओ
New Spider Species Baner Hill, Baner Hill,
कोळ्याच्या नवीन प्रजातीचा बाणेर टेकडी येथे शोध, काय आहे वेगळेपण?

डिझाइन हे केवळ कलात्मक कौशल्यांचे – चित्रकला, हस्तकला, रंग संगती, मॉडेल बनवणे – प्रदर्शन नाही, तर तर्कबद्ध विचार, शास्त्रीय दृष्टिकोन, विश्लेषणात्मक क्षमता आणि वापरकर्त्यांच्या समस्या सोडवण्याच्या कौशल्यांचा सुसंवादी वापर आहे. डिझाइन प्रवेश परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, दृष्टिकोन आणि डिझाइनची मूलभूत समज यांची चाचणी केली जाते. त्यामुळेच डिझाइन प्रवेश परीक्षांमध्ये अनेक पैलूंचे विविधप्रकारे मूल्यमापन केले जाते.

डिझाइन प्रवेश परीक्षांचे स्वरूप:

सामान्यत: भारतातील डिझाइन प्रवेश परीक्षांचे दोन मुख्य घटक आहेत: भाग (अ) आणि भाग (ब)

भाग अ : या भागात विद्यार्थ्यांच्या विश्लेषणात्मक क्षमता, संख्यात्मक क्षमता, त्रिमितिय क्षमता आणि तार्किक विचारशक्ती यांची चाचणी केली जाते. हे कौशल्य डिझाइन प्रक्रियेच्या तर्कशुद्ध बाजूवर आधारित असतात. एक प्रभावी डिझाइन तयार करण्यासाठी वापरकर्त्यांच्या समस्या ओळखणे, विश्लेषण करणे, मापन, गणना आणि तार्किक विचार प्रक्रिया आवश्यक असतात. त्यामुळेच या कौशल्यांचे परीक्षण करणे आवश्यक आहे.

हेही वाचा >>> नोकरीची संधी : नाबार्डमधील संधी

भाग ब : या भागाला सामान्यत: ‘सर्जनशीलता चाचणी’ किंवा ‘कलात्मक क्षमता चाचणी’ असे म्हणतात. यात रेखाचित्र, रंगसंगती, मॉडेल तयार करणे, कल्पनाशक्ती आधारित प्रश्न इत्यादींचा समावेश होतो. डिझाइन हे केवळ तर्कशुद्धता नाही तर नवीन कल्पनांचा जन्म घेणारे क्षेत्र आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीचे परीक्षण करणे आवश्यक आहे.

काही उदाहरणे

आय आय टी प्रवेश परीक्षेच्या भाग-अ मध्ये (UCEED) प्रामुख्याने विद्यार्थ्यांना दृश्य कल्पना, त्रिमिती-अवकाशीय क्षमता, शास्त्रीय संकल्पना, पॅटर्न ओळख आणि डिझाइन संवेदनशीलतेची चाचणी घेणारे प्रश्न असतात.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (NID) प्रवेश परीक्षेच्या भाग-ब मध्ये विद्यार्थ्यांच्या निरीक्षण कौशल्य, सामाजिक जाणीव, नवनवीन कल्पना कागदावर चित्रित करण्याची क्षमता आणि सर्जनशील अभिव्यक्तीची चाचणी घेणारे प्रश्न असतात.

काही डिझाइन संस्थेच्या प्रवेश परीक्षांमध्ये पॅटर्न ओळख आणि अपूर्ण पॅटर्न पूर्ण करणे किंवा नवीन पॅटर्न तयार करणे, 3D ते 2D रूपांतरण म्हणजे त्रिमितीय वस्तूंचे द्विमितीय प्रक्षेपण काढणे, TANGRAM आणि त्यातील विविध रचना, rotating objects, परिप्रेक्ष्य रेखाटन: विविध दृष्टिकोनांतून वस्तू काढणे, mirror views, light & shadow of objects, शास्त्रीय सिद्धांतावर आधारित कोडी असे डोक्याला चलन देणारे प्रश्न विचारले जातात

बऱ्याच डिझाइनच्या प्रवेश परीक्षांमध्ये कला आणि डिझाइनचा इतिहास, प्रमुख कलाकार, आर्किटेक्ट, डिझाइनर आणि कला चळवळींबद्दलचा (Art Movements) मतप्रवाह, डिझाइनचे ट्रेंडस, तंत्रज्ञानाबद्दलची जागरूकता, सामाजिक आणि पर्यावरणीय मुद्दे याविषयी प्रश्न विचारून विविध विषयांच्या माहितीची चाचणी घेतली जाते.

डिझाइन प्रवेश परीक्षांमध्ये बहुपर्यायी प्रश्नांसह संकल्पना चित्र (Concept Sketch), मॉडेल तयार करणे, पोर्टफोलियो सादर करणे इत्यादी स्वरूपाचे प्रश्न असू शकतात. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना मूर्त स्वरूपात सादर करण्याची संधी मिळते.

डिझाइन प्रवेश परीक्षा: मूल्यांकन पद्धती

डिझाइन प्रवेश परीक्षेतील मूल्यांकन पद्धती वेगवेगळ्या संस्थांमध्ये आणि परीक्षांमध्ये थोडीफार बदलू शकते. काही संस्था फक्त लेखी परीक्षा घेऊन त्याचे मूल्यांकन करतात, तर काही ३ टप्प्यांची (लेखी, पोर्टफोलियो आणि मुलाखत) सखोल परीक्षा घेतात. त्याचप्रमाणे मूल्यांकनाचे निकषही संस्थांप्रमाणे बदलू शकतात.

व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ मूल्यांकन (Subjective & Objective Assessment) : डिझाइन प्रवेश परीक्षांमधील बऱ्याच प्रश्नांचे मूल्यांकन करताना व्यक्तिनिष्ठता आणि वास्तुनिष्ठता यांचा मेल घालणे अपरिहार्य असते, कारण सर्जनशील कामाचे मूल्यांकन करणे हे नेहमीच काही प्रमाणात गुंतागुंतीचे असते आणि त्याला एकच एक परिमाण लावत येत नाही.

बहु-आयामी मूल्यांकन ( Holistic Evaluation): उमेदवारांच्या तांत्रिक कौशल्य, सौंदर्यशास्त्रीय संवेदना आणि संकल्पनात्मक विचारांचे एकत्रित मूल्यांकन केले जाते.

डिझाइन प्रक्रिया-केंद्रित (Design Thought Process): केवळ अंतिम उत्तर किंवा परिणामाऐवजी विद्यार्थ्याच्या विचारप्रक्रियेला महत्त्व दिले जाते.

पोर्टफोलिओ मूल्यांकन (Portfolio Presentation): काही संस्था प्रवेश प्रक्रियेचा भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या पूर्वीच्या कामाचे पोर्टफोलिओ मागवतात.

मौखिक मुलाखती (Personal Interaction): अनेक डिझाइन संस्था लिखित परीक्षेनंतर मौखिक मुलाखत घेतात, जिथे उमेदवारांच्या दृष्टिकोन आणि व्यक्तिमत्वाचे मूल्यांकन केले जाते.

डिझाइन प्रवेश परीक्षा: अभ्यासक्रम, पॅटर्न आणि पुस्तके?

या परीक्षांसाठी सांचेबंध व ठरावीक अभ्यासक्रम नाही. त्याचप्रमाणे परीक्षांचा पॅटर्न पण दरवर्षी बदलत राहतो. काही संस्था ३०० गुणाची तर काही संस्था १०० गुणाची परीक्षा घेतात. काही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने असतात तर काही कागद-पेन-पेन्सिल पद्धतीने घेतल्या जातात. परीक्षांसाठी ठरावीक पुस्तके, गाईडस, अपेक्षित संच इत्यादी उपलब्ध नाही. याची खासियत अशी की, या परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांच्या वास्तविक जीवनातील अनुभव, विविध विषयांचे पुस्तक वाचन, कल्पना रेखचित्रांचा सराव आणि सखोल निरीक्षणावर आधारित असते. विद्यार्थ्यांनी कला, संस्कृती, समाज, इतिहास, तंत्रज्ञान या विषयांचा अभ्यास केला पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी स्वत:चे पोर्टफोलियो तयार करणे आणि त्यात त्यांची सर्जनशीलता दाखवणे आवश्यक आहे.

पालकांना विशेष सूचना

डिझाइन प्रवेश प्रक्रिया, तयारीची पद्धती, अभ्यासक्रम, मूल्यांकन हे इतर अभियांत्रिकी, वैद्याकीय, वाणिज्य, कायदा, व्यवसाय परीक्षा यापेक्षा बरेच वेगळे आहे. डिझाइन प्रवेश परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि दृष्टिकोन यांचे विविध अंगांनी मूल्यमापन केले जाते. या परीक्षांची माहिती सर्व संस्थांच्या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे व ती प्रत्येक वर्षी अद्यायावत केली जाते. उदा. भारतातील काही शासकीय डिझाइन शिक्षण संस्था – https://www.uceed.iitb.ac.in/2024/ https://www.nid.edu/home https://www.nift.ac.in/ डिझाइन क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तयारीनुसार स्वत:ला घडवून घेण्याची आवश्यकता आहे व त्यासाठी पालकांकडून प्रोत्साहन गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पालकांनी त्यांच्या पाल्याच्या डिझाइन परीक्षेच्या तयारीची तुलना JEE, NEET, MBA, UPSE परीक्षांच्या तयारी करणाऱ्या त्यांच्या मित्रांशी किंवा इतर विद्यार्थ्यांशी करणे योग्य ठरणार नाही.