FSSAI recruitment 2024 : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण [एफएसएसएआय] अंतर्गत सध्या ‘सहायक संचालक’ आणि ‘प्रशासकीय अधिकारी’ या पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष आणि अर्ज कसा करावा याबद्दल माहिती पाहावी. तसेच, अर्ज करण्याची अंतिम तारीख काय हेदेखील पाहावे.
FSSAI recruitment 2024 : पद आणि पदसंख्या
सहाय्यक संचालक [Assistant Director] या पदासाठी एकूण ५ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.
प्रशासकीय अधिकारी [Administrative Officer] या पदासाठी एकूण ६ पदांवर भरती करण्यात येणार आहे.
FSSAI recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता
सहाय्यक संचालक [Assistant Director] आणि प्रशासकीय अधिकारी [Administrative Officer] या पदासांठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती, इच्छुक उमेदवारांनी एफएसएसएआयच्या अधिकृत वेबसाईटला वा भेट देऊन अथवा अधिसूचना वाचून समजून घ्यावी.
FSSAI recruitment 2024 : वेतन
सहायक संचालक [Assistant Director] या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपयांदरम्यान [Pay Level- 10] वेतन देण्यात येणार आहे.
प्रशासकीय अधिकारी [Administrative Officer] या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४७,६००/- रुपये ते १,५१,१००/- रुपयांदरम्यान [Pay Level- 08] वेतन देण्यात येणार आहे.
FSSAI recruitment 2024 – भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण [FASSI] अधिकृत वेबसाईट लिंक –
https://www.fssai.gov.in/jobs@fssai.php
FSSAI recruitment 2024 – अधिसूचना लिंक –
https://www.fssai.gov.in/upload/uploadfiles/files/shortnotice.pdf
https://www.fssai.gov.in/upload/uploadfiles/files/Circular%20for%20extension.pdf
https://www.fssai.gov.in/upload/uploadfiles/files/Previous%20Notice%20dated%2008_01_2024.pdf
FSSAI recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया
वरील पदांच्या नोकरीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवांनी नोकरीचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी नोकरीच्या अर्जामध्ये आपली संपूर्ण व अचूक माहिती भरणे अनिवार्य आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एफएसएसएआयच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या लिंकचा वापर करावा.
उमेदवारांनी कोणत्याही नोकरीचा अर्ज भरण्याआधी, नोकरीची अधिसूचना वाचून आणि समजून घ्यावी.
वरील नोकरीचा ऑनलाईन अर्ज उमेदवारांनी अंतिम तारखेआधी भरणे अनिवार्य आहे.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही १४ जुलै २०२४ अशी आहे.
वरील नोकरीसंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाईट आणि अधिसूचना वर नमूद केली आहे.