FTII Pune Recruitment 2023 : फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया( FTII) पुणे कित्येकजण शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहतात. कित्येक बॉलीवूड स्टार्सने येथे शिक्षण घेतले आहे. आता एफटीआयआयमध्ये नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळत आहे.एफटीआयआयतर्फे ग्रुप बी आणि ग्रुप सी कॅटेगरींतर्गत विविध पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या भरतीची प्रक्रिया २९ एप्रिलला सुरू झाली आहे. नोटिफिकेशननुसार, एफटीआयआय ग्रुप बी आणि ग्रुपी सी कॅटेगरीमधील एकूण ८४ पदांवर भरती होणार आहे.
नोटिफिकेशनमध्ये सांगितले जात आहे की, एफटीआयआयतंर्गात केली जाणारी भरतीसाठी तेच उमेदवार अर्ज करू शकतात जे भारतीय नागरिक आहेत आणि केंद्रीय ग्रृह मंत्रायलानुसार पात्र घोषित करण्यात आले आहे. फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टीस्टयूट ऑफ इँडिया हे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक स्वायत्त संस्था आहे. नोटिफिकेशन मध्ये एक गोष्ट स्पष्ट केले आहे की, ग्रुप बी आणि सी कॅटेगरी पदांसाठी दिव्यांग कॅटेगरी अंतर्गत येणारे उमेदवार अर्ज करू शकत नाहीत.
हेही वाचा – पुणे महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ १०१ पदासांठी लवकरच होणार भरती, जाणून घ्या सविस्तर
योग्य शैक्षणिक पात्रता
एफटीआयआय पुणे तर्फे ग्रुप पी आणि सी कॅटेगरीतंर्गत उमेवदवाराकडे पदांसाठी संबधित शाखेतून उतीर्ण झालेली पदवी किंवा डिप्लोमा असला पाहिजे. वयोमर्यादा आणि इतर माहितीसाठी एफटीआयआय भरतीचे नोटिफिकेशन पाहू शकता.
कशी होईल निवड
एफटीआयआयमध्ये निघालेली भरती ग्रूप बी आणि सी पदांवर लेखी परिक्षेद्वारे आणि कौशल्य चाचणीद्वारे केली जाईल.
येथे क्लिक करून नोटिफिकेशन पाहा – https://www.ftii.ac.in/uploads/Adv_01-2023-_Final_29-04-2023.pdf
प्रत्येक पदासाठी अर्ज शुल्क १००० रुपये आहे.