GAIL recruitment 2023: गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे गेल या संस्थेतर्फ वरिष्ठ सहयोगी (Senior Associate) पदांसाठी भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गेलमध्ये होणाऱ्या भरतीबद्दलचे सूचनापत्रक gailgas.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे. एकूण १२० रिक्त पदांसाठी होणाऱ्या भरतीमध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहे. १० मार्च रोजी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

गेलद्वारे आयोजित केलेल्या भरतीमध्ये या जागांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

सीनियर असोसिएट (टेक्निकल) – ७२ जागा
सीनियर असोसिएट (फायर अँड सेफ्टी) – १२ जागा
सीनियर असोसिएट (मार्केटिंग) – ६ जागा
सीनियर असोसिएट (फायनान्स अँड अकाउंट्स) – ६ जागा
सीनियर असोसिएट (कंपनी सेक्रेटरी) – २ जागा
सीनियर असोसिएट (ह्युमन रिसोर्स) – ६ जागा
ज्युनियर असोसिएट – १६ जागा

या जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२३ आहे. अर्ज केल्यानंतर ठराविक कालावधीनंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या एकूण टक्केवारीवरुन पुढील प्रक्रिया सुरु होईल. सीनियर असोसिएट पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना मुलाखत, स्किल टेस्ट, तर ज्युनियर असोसिएट स्किल टेस्ट द्यावी लागेल.

आणखी वाचा – दहावी, बारावी आणि पदवी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी; CPCB मध्ये सुरु झालीये मेगा भरती

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना १०० रुपये भरावे लागणार आहेत. एस, एसटी आणि दिव्यांग वर्गातील उमेदवारांना यामध्ये सूट देण्यात येईल. अर्ज करण्यासाठीची शैक्षणिक पात्रता, वय, शारीरिक स्थिती यांबाबतची सविस्तर माहिती गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या gailgas.com या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.