Success Story of Girish Mathrubootham: आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने अनेकांनी यशाचा नवा इतिहास रचला आहे. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी बारावीत नापास होऊनही उत्तुंग यश मिळवले. बारावीत नापास झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी त्यांना खूप टोमणे मारले, पण त्यांनी हार मानली नाही आणि आज ते एक व्यावसायिक बनले आहेत. एवढंच नाही तर त्यांची कंपनी अमेरिकन स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड आहे. आपण जाणून घेणार आहोत गिरीश माथरुबूथमबद्दल.
गिरीश बारावीच्या परीक्षेत नापास झाले तेव्हा त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांनी त्यांची चेष्टा केली आणि ते रिक्षावाला होणार असे गमतीने सांगितले. हे सर्व ऐकूनही त्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवला आणि शेवटी HCL मध्ये नोकरी मिळवण्यात यश मिळवले. नंतर ते झोहो या सॉफ्टवेअर कंपनीत लीड इंजिनीअर म्हणून काम करू लागले.
५३,००० कोटींची झाली कंपनी
गिरीश माथरुबूथम यांच्या कंपनीचे नाव ‘फ्रेशवर्क्स’ आहे, जी आयटी सोल्यूशन्स प्रदान करते. आज या कंपनीचे मूल्यांकन ५३,००० कोटी रुपये आहे. गिरीश यांनी २०१० मध्ये फ्रेशवर्क्स सुरू केले, जेव्हा त्यांनी जोहो येथील नोकरी सोडली होती. २०१८ पर्यंत कंपनीचे १२५ देशांमध्ये एक लाखांपेक्षा जास्त ग्राहक होते. गिरीश यांच्याकडे सध्या फ्रेशवर्क्समध्ये ५.२२९ टक्के हिस्सा आहे, त्यांची एकूण मालमत्ता सुमारे २,३६९ कोटी रुपये आहे.
सात दिवसांत ३४० कोटींची कमाई केली
गेल्या आठवड्यात गिरीश यांनी फ्रेशवर्क्सचे शेअर्स विकले. त्यांनी सात दिवसांत एकूण $३९.६ दशलक्ष शेअर्स विकले आहेत, जे अंदाजे ३३६.४१ कोटी रुपयांच्या समतूल्य आहे. त्यानुसार त्यांनी एका आठवड्यात ३३६ कोटींहून अधिक कमाई केली आहे. यासह गिरीश यांनी फ्रेशवर्क्ससह SaaS (सॉफ्टवेयर ऐज अ सर्विस) व्यवसायात प्रवेश केला, जे SaaS उद्योगातील एक आघाडीचे नाव बनले आहे.
SaaS व्यवसाय म्हणजे काय?
SaaS बद्दल सांगायचं झालं तर या कंपन्या त्यांच्या ग्राहकांना ऑनलाइन सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रदान करतात. सॉफ्टवेअर खरेदी आणि इन्स्टॉल करण्याऐवजी, ग्राहक हे उपाय वापरण्यासाठी सबस्क्रिप्शन घेतात. यातून अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात, ज्यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवणे सोपे जाते.