Central Bank of India Recruitment 2023 : बॅंकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीचे एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट ऑफिसर पदाच्या जवळपास १९२ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकतात. तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आवश्यत शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२३ –

पदाचे नाव – स्पेशलिस्ट ऑफिसर

पदाचे नाव शाखास्केलरिक्त पदे
IT V
रिस्क मॅनेजर
V
रिस्क मॅनेजरIV
IIII
फायनांशिअल एनालिस्टIII
IT
II ७३
स्पेशलिस्ट ऑफिसरलॉ ऑफिसर
II १५
क्रेडिट ऑफिसर
II ५०
फायनांशिअल एनालिस्ट
II
CA – फायनान्स आणि अकाउंट्स/ GST/
Ind AS/ बॅलन्स शीट/ टॅक्सेशन
II
IT
I १५
सिक्योरिटी ऑफिसर
I१५
रिस्क मॅनेजर I / लायब्रेरियनI

शैक्षणिक पात्रता –

IT : कॉम्प्युटर सायन्स/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विषयात पदवी/ पदव्युत्तर पदवी किंवा ६० टक्के गुणांसह MCA + १० वर्षे अनुभव.

रिस्क मॅनेजर : ५५ टक्के गुणांसह सांख्यिकी/ विश्लेषणात्मक क्षेत्रात पदवी किंवा MBA + १०वर्षे अनुभव.

रिस्क मॅनेजर : ५५ टक्के गुणांसह सांख्यिकी/ विश्लेषणात्मक क्षेत्रात पदवी किंवा MBA + ८ वर्षे अनुभव.

IT : ६० टक्के गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/ M.Sc. (IT)/ M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) + ६ वर्षे अनुभव.

फायनांशिअल एनालिस्ट : CA + १ वर्ष अनुभव किंवा MBA (फायनान्स) + ४ वर्षे अनुभव.

IT : ६० टक्के गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/ M.Sc. (IT)/ M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) + ३वर्षे अनुभव.

लॉ ऑफिसर: ६० टक्के गुणांसह LLB + ३ वर्षे अनुभव.

क्रेडिट ऑफिसर : पदवीधर + MBA/ MMS (फायनान्स)/ PGDBM (बँकिंग आणि फायनान्स) + ३ वर्षे अनुभव किंवा CA.

फायनांशिअल एनालिस्ट : CA/ ICWA + किंवा ६० टक्के गुणांसह MBA (फायनान्स + ३ वर्षे अनुभव.

CA : CA.

IT : ६० टक्के गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/ M.Sc. (IT)/ M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) +१ वर्ष अनुभव.

सिक्योरिटी ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी + भारतीय सैन्यात जेसीओ म्हणून किमान 5 वर्षांची सेवा असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष रँक.

रिस्क मॅनेजर : MBA/ MMS/ बँकिंग/ फायनान्स विषयात PG डिप्लोमा.

लायब्रेरियन : ५५ टक्के गुणांसह लायब्रेरियन सायन्स पदवी + ५ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – कृपया जाहिरात बघा.
ओबीसी – ३ वर्षे सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी – ८५० रुपये + GST.
  • मागासवर्गीय – १७५ रुपये + GST.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अधिकृत बेवसाईट – https://www.centralbankofindia.co.in/en

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक – https://ibpsonline.ibps.in/cbiosep23/

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २८ ऑक्टोबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ नोव्हेंबर २०२३

भरती संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1jsV9lK-rP30uSJSyhsAcL-yWzilmB-xZ/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Golden job opportunity in central bank of india recruitment started for 192 posts of specialist officer posts apply today jap
Show comments