Job Alert: IIT मुंबई मध्ये प्रवेश मिळावा यासाठी अनेक जण वर्षानुवर्षे अभ्यास करतात. पण आता याच आयआयटी मध्ये तुम्हाला तुमच्या अन्य कॉलेजच्या पदवीवर चक्क एक जॉब मिळवता येऊ शकतो. प्राप्त माहितीनुसार, भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) बॉम्बे इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. IIT तर्फेअधिसूचना जारी करण्यात आली असून महिन्याला तब्बल ३५ हजार रुपये पगाराच्या नोकरीची संधी तरुणांना मिळणार आहे. वरिष्ठ रिसर्च फेलोशिप करण्यासाठी आपण इच्छुक असाल तर नेमका हा जॉब काय आहे, पगार, शैक्षणिक निकष व अर्जाची तारीख- प्रक्रिया सर्व सविस्तर जाणून घेऊयात..
पात्रता आणि अनुभव
वरिष्ठ रिसर्च फेलो (Senior Research Fellow) साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी लक्षात घ्या की केवळ दोनच जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमचा अनुभव व शैक्षणिक पात्रता नीट तपासून पाहणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान M Tech Or BTech in Biomedical engineering, Biotechnology, Biochemical engineering पर्यत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी आपली पदवी ही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून पूर्ण केलेली असावी. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
पगार किती मिळणार?
वरिष्ठ रिसर्च फेलोशिप साठी उमेदवाराला प्रति महिना ३५,००० रुपये व HRA देण्यात येणार आहे.
हे ही वाचा<< Job Alert: सोशल मीडिया मॅनेजर व्हायचंय? ‘या’ २० कंपन्यांमध्ये मिळू शकते जॉबची संधी, पाहा यादी
अर्ज करताना जवळ बाळगा ही कागदपत्रे
- तुमच्या लेटेस्ट कंपनीतील नोकरीच्या माहितीसह अपडेट केलेला बायोडेटा
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र
- पासपोर्ट साईझ फोटो (स्कॅन केलेले)
IIT मुंबईमध्ये नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२३ असणार आहे.
हे ही वाचा<< Bank Of Maharashtra Recruitment 2023: २२५ रिक्त जागांची मोठी भरती; कधी, कुठे व कसा कराल अर्ज?
तुम्ही स्वतः अर्ज करणार असाल तर तुम्हाला खूप शुभेच्छा! किंवा तुमच्या ओळखीत अन्य इच्छुक उमेदवार असतील तर त्यांच्यासह ही माहिती शेअर करायला विसरू नका.