MPSC Rajyaseva Exam 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी भरती २०२३ साठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. उमेदवार एमपीएससीची अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात. महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये विविध ग्रुप ए आणि ग्रुप बी च्या पदांसाठी एमपीएससी राज्यसेवा भरती २०२३ नुसार एकूण ६७३ रिक्त जागा भरणार आहेत. एमपीएससी राज्यसेवा परीक्षा किंवा सिविल सेवा सामान्य प्रारंभिक परीक्षेचं आयोजन डेप्यूटी कलेक्टर,पोलीस उपअधिक्षक इ. पदांसाठी केलं जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्र एमपीएससी भरती २०२३ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे आणि अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २२ मार्च २०२३ असणार आहे. या तारखेनंतर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी काळजी घ्यावी. प्रत्येक सेवेसाठी प्रारंभिक परीक्षा ऑक्टोबर २०२३ मध्ये आयोजित केली जाईल.

नक्की वाचा – वैद्यकीय अधिकारी व्हायचंय? या पदांसाठी निघाली बंपर भरती, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

वयोमर्यादा

एमपीएससी ग्रुप ए आणि ग्रुप बी भरती २०२३ साठी १९ ते ३८ वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असतील. आरक्षण नसलेल्या श्रेणीतील उमेदवारांना रजिस्ट्रेशन फी म्हणून ३९४ रुपये भरावे लागतील. तर आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना अर्ज करताना २९४ रुपये शुल्क भरावे लागेल. एमपीएससी २०२३ परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विश्वविद्यालयातून पदवी प्रमाणपत्र असलं पाहिजे. उमेदवार एमपीएससी २०२३ शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती अधिकृत नोटिफिकेशनच्या माध्यमातून मिळवू शकतात.

असा करा अर्ज

एमपीएससीची अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in वर भेट द्या. होमपेजवर स्क्रीनवर असलेल्या ऑनलाईन एप्लिकेशनवर सिस्टमवर क्लिक करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याच्या विकल्पासोबत आगामी परीक्षांची लिस्ट नवीन पेजवर दिसेल. अप्लाय ऑनलाईन लिंकवर क्लिक करा आणि पुन्हा रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा. अर्जाचे पत्र डाऊनलोड करा आणि भविष्याच्या संदर्भासाठी याची हार्ड कॉपी काढून घ्या.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Golden job opportunity in maharashtra government mpsc rajyaseva exam 2023 673 posts vacant 22 march last date to apply online nss
Show comments