बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांच्या काही जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत जवळपास ४३९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत. या पदांसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑक्टोबर २०२३ आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
एकूण रिक्त पदे – ४३९
पदाचे नाव व रिक्त पदे –
पदाचे नाव | रिक्त पदे |
असिस्टंट मॅनेजर (AM) | ३३५ |
असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) | १ |
मॅनेजर | ८ |
डेप्युटी मॅनेजर | ८० |
चीफ मॅनेजर | २ |
प्रोजेक्ट मॅनेजर | ६ |
सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर | ७ |
शैक्षणिक पात्रता-
कॉम्प्युटर सायन्स/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ सॉफ्टवेअर विषयात B.E/ B.Tech/ M.Tech/ M.Sc/ MBA/ MCA + २/ ५/ ८/ १० वर्षे अनुभव.
वयोमर्यादा –
- खुला – सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात बघा.
- ओबीसी – ३ वर्षांची सूट.
- मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
अर्ज फी –
- खुला/ ओबीसी/ EWS – ७५० रुपये.
- मागासवर्गीय/ PWD – फी नाही
अधिकृत बेवसाईट – https://sbi.co.in/
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १६ सप्टेंबर २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑक्टोबर २०२३
भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/17aaeK4_AoeyP2Ih3knFpbqDrvmK9gPQ0/view?usp=sharing) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.