जागतिक मंदीच्या सावटामुळे सध्या जगभरातील अनेक दिग्गज कंपन्यानी नोकरकपात सुरु केली आहे. त्यामुळे अनेक सुशिक्षित तरुणांमध्ये चिंतेच वातावारण आहे. कारण अनेक विद्यार्थी आपलं शिक्षण पुर्ण करुन नोकरीच्या शोधात असतानाच जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं जात असल्यामुळे आपणाला नोकरी कशी मिळणार? असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना सतावत आहे. पण सध्या या तरुणांना दिलासा देणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ऐन नोकरकपातीच्या काळात काही कंपन्यांकडून नोकरभरती केली जात आहे. यामध्ये IT कंपन्या आघाडीवर आहेत. तर कोणत्या कंपन्यांमध्ये नोकरभरती केली जाणार आहे आणि किती जागांसाठी ही भरती असेल याबाबतची माहीती जाणून घेऊया.
नोकरी पोर्टल (Naukri.com) च्या JobSpeak च्या अहवालानुसार, भारतातील नोकरभरतीच्या परिस्थितीत जानेवारी २०२३ च्या तुलनेत फेब्रुवारी २०२३ मध्ये वाढ दिसून आली आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांत रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये घसरण झाल्यानंतर आयटी क्षेत्राने सकारात्मक पुनरागमनाचे संकेत दिले असून ही नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बाब आहे.
हेही वाचा- Bank of India मध्ये होतीये मेगा भरती; प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या ५०० जागांसाठी ‘या’ दिवशी होणार परीक्षा
या कंपन्यांमध्ये होणार भरती –
वॉटरहाऊस कूपर्स –
भारतातील आपल्या कामकाजाचा विस्तार करण्यासाठी, अकाऊंटिंग आणि कन्सल्टन्सी फर्म प्राइसवॉटरहाऊस कूपर्स इंडियाने (Price Waterhouse Coopers) पुढील ५ वर्षांमध्ये ३० हजार लोकांना नोकरी देण्याची योजना आखली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, देशातील कामगारांची संख्या ८० हजारांपर्यंत वाढवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
एअर इंडिया –
एअर इंडिया (Air India) यावर्षी ९०० हून अधिक नवीन पायलट आणि ४ हजारांहून अधिक केबिन क्रू मेंबर्सची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. कंपनी आणखी देखभाल अभियंते आणि पायलट नियुक्त करण्याची शक्यता आहे.
इन्फोसिस (Infosys) –
इन्फोसिसमध्ये ४,२६३ जागांवर भरती केली जाणार असल्याची माहिती लिंक्डइनने दिली आहे. त्यानुसार या कंपनीत इंजिनियर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, सल्लागार, प्रोजेक्ट मॅनेजमेंट अशा विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे.
विप्रो (Wipro) –
हेही वाचा- Medical Officer साठी बंपर भरती सुरू; लवकरात लवकर अर्ज करा
विप्रोकडे भारतात ३,२९२ कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याची माहीती LinkedIn ने दिली आहे. त्यानुसार, कंटेंट रिव्यूअस ते मार्केट लीड यासारख्या विवध पदांवर भरती करण्यात येणार आहे. याशिवाय ग्राहक सेवा, ऑपरेशन्स, इंजिनियरींग, IT आणि माहिती सुरक्षा, अकाऊंट अँड फायनान्स विभागांमध्येही भरती करण्यात येणार आहे.
TCS –
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनी काही हजार लोकांना नोकरी देणार असल्याची माहिती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मानव संसाधन प्रमुख मिलिंद लक्कड यांनी दिली आहे.