नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे SCERT मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती करण्यात येणार आहे. ज्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. SCERT च्या अधिकृत साइट scert.delhi.gov.in वर अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू झाली असून १४ एप्रिल २०२३ रोजी संपणार आहे. या भरतीद्वारे सहाय्यक प्राध्यापकांच्या एकूण ९९ जागा भरण्यात येणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४५ पदे, एससी प्रवर्गासाठी १५ पदे, अनुसूचित जाती जमातीसाठी ९ पदे, ओबीसी प्रवर्गासाठी २० पदे आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी १० पदे निश्चित करण्यात आली आहेत.
पात्रता निकष?
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे दरम्यान असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. शैक्षणिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचनेची मदत घेऊ शकतात
निवड प्रक्रिया –
निवड प्रक्रियेमध्ये संगणकावर चाचणी परीक्षा असते. ४ बहुपर्यायी उत्तरांपैकी उमेदवाराला फक्त एकच योग्य उत्तर निवडावे लागेल. लेखी परीक्षेतील पात्रता गुण ४० टक्के, SC/OBC-NCL/EWS यांसाठी ३० टक्के आणि ST साठी २५ टक्के निश्चित केले आहेत.
हेही वाचा – OIL Recruitment 2023: ऑईल इंडियामध्ये होणार मोठी भरती, असा करा अर्ज
अर्ज फी –
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. UR/OBC-NCL/EWS या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १६०० रुपये आणि महिला/SC/ST/सैनिक/PWBD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ११०० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. उमेदवाराने अर्जाची फी ऑनलाइन पद्धतीने भरावी लागेल. अधिक तपशीलांसाठी उमेदवार SCERT च्या अधिकृत साइटला भेट देऊ शकतात.