IGR Maharashtra Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. फक्त १० वी पास असणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवता येणार आहे. महाराष्ट्र शासनाने नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदांसाठी भरती जाहीर केली आहे. जवळपास २८४ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मे २०२५ पर्यंत आहे; परंतु अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी igrmaharashtra.gov.in वर जाऊन भरतीसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्यावी. (Department of Registration and Stamps Government of Maharashtra Recruitment 2025)
एकूण रिक्त जागा – २८४
पदाचे नाव – शिपाई
शैक्षणिक पात्रता – १० वी उर्त्तीर्ण
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान १८ ते ३८ वर्ष असावे. या वयोमर्यादेत मागासवर्गीयांना पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे.
परीक्षा शुल्क
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील लोकांना १००० रुपये शुल्क द्यावे लागते. तर मागासवर्गीय आणि अनाथ उमेदवारांना ९०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.
पगार
अंतिम निवड झालेल्या उमेदवारास १५,००० ते ४७,६०० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.
नोकरीचे ठिकाण
पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० मे २०२५
परीक्षा – नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ :
igrmaharashtra.gov.in
भरतीची अधिकृत जाहिरात
https://igrmaharashtra.gov.in/pdf/documents/
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
ibpsonline.ibps.in