MIB Bharti 2023 : माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कर्मचारी कार चालक पदाची भरती केली जाणार आहे. कर्मचारी कार चालक पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहेत. माहिती व प्रसारण मंत्रालय भरती २०२३ साठी कोण अर्ज करु शकतं, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता काय? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माहिती व प्रसारण मंत्रालय भरती २०२३ –

पदाचे नाव – कर्मचारी कार चालक

एकूण पदसंख्या – ८

शैक्षणिक पात्रता – १० वी पास

वयोमर्यादा – ३२ वर्षे

अर्जाची पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

श्रीमती. कीर्ती गुप्ता, अवर सचिव (प्रशासन), कक्ष क्रमांक ५४४, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, ए-विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली – ११००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ नोव्हेंबर २०२३

हेही वाचा- कल्याण डोंबिवली महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

अधिकृत वेबसाईट – mib.gov.in

पगार –

कर्मचारी कार चालक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना महिना ५ हजार २०० ते २० हजार २०० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

असा करा अर्ज –

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज २५ नोव्हेंबर २०२३ या तारखे आधी भरा.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1DhRiOhoBBs4bbbsav7fol7Ro4QKIHqzV/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य वाचा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government jobs opportunity for 10th pass candidates recruitment for these post under ministry of information and broadcasting has started jap