सुहास पाटील
महाराष्ट्र शासन, आयुक्त आरोग्य सेवा तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र, मुंबई यांच्या अधिपत्याखाली सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिह्यांतील रिक्त पदांची सरळसेवा पद्धतीने भरती. एकूण रिक्त पदे – ४,०१०. जिल्हानिहाय रिक्त पदांची संख्या –
(१) अहमदनगर – ९२ (२) अकोला – ५५ (३) अमरावती – १७२ (४) औरंगाबाद – ११६ (५) बीड – ९४ (६) भंडारा – १२७ (७) बुलढाणा – १२५ (८) चंद्रपूर – २०३ (९) धुळे – २३ (१०) गडचिरोली – १३० (११) गोंदिया – ८५ (१२) जालना – ६२ (१३) जळगाव – ६९ (१४) कोल्हापूर – ९३ (१५) लातूर – ५१ (१६) हिंगोली – ७६ (१७) नागपूर – २७७ (१८) नांदेड – ११२ (१९) नंदूरबार – ९५ (२०) नाशिक – १६८ (२१) उस्मानाबाद – ८२ (२२) परभणी – ७६ (२३) पुणे – ३५२ (२४) पालघर – ६२ (२५) रायगड – १०४ (२६) रत्नागिरी – १०१ (२७) सांगली – ४० (२८) सातारा – ११५ (२९) सिंधुदुर्ग – ८८ (३०) सोलापूर – ११४ (३१) ठाणे – ३३६ (३२) वर्धा – ९१ (३३) वाशिम – ७१ (३४) यवतमाळ – ५६ (३५) उपसंचालक आरोग्य सेवा (परिवहन) पुणे – ९७
पदनिहाय रिक्त पदांचा तपशील –
(१) गट-ड (शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहायक, मदतनीस इ.) – ३,२६९ पदे.
(२) नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी) – ४६१ पदे.
पद क्र. १ व २ साठी पात्रता – १० वी उत्तीर्ण.
(३) नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर) –
१८३ पदे.
पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि हंगामी फवारणी कामगार म्हणून १८० दिवस काम केले जाईल.
(४) अकुशल कारागीर (परिवहन) –
८० पदे.
पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि ITI/ NCTVT परीक्षा उत्तीर्ण.
(५) अकुशल कारागीर (HEMR) –
१७ पदे.
पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशिनग किंवा इलेक्ट्रिकल किंवा सामान्य इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रमेंटेशनमधील आयटीआय सर्टिफिकेट.
पदाकरिता असलेली शैक्षणिक अर्हता परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु प्रस्तुत शैक्षणिक अर्हता परीक्षा दि. १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. (अधिवास प्रमाणपत्र आवश्यक.) महिला आरक्षणाकरिता त्यांचेकडे अर्ज करण्याच्या दिवशी नॉन-क्रिमी लेयर दाखला असणे आवश्यक (अजा/ अज/ खुला प्रवर्गातील उमेदवार वगळता)
वयोमर्यादा – दि. १८ सप्टेंबर २०२३ रोजी किमान १८ वर्षे पूर्ण, कमाल अमागास – ४० वर्षे, मागासवर्गीय/खेळाडू/ आदुघ – ४५ वर्षे, प्रकल्पग्रस्त/ दिव्यांग – ४७ वर्षे; अंशकालीन उमेदवार – ५७ वर्षे.
निवड पद्धती – लेखी परीक्षा – कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे १०० प्रश्न, (गट-ड व नियमित क्षेत्र पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणीकरिता प्रत्येकी २५ प्रश्न) अकुशल कारागिर (परिवहन व HEMR) पदांसाठी वरील विषयांवरील प्रत्येकी ५ प्रश्न आणि तांत्रिक ज्ञानावर आधारित ८० प्रश्न असे एकूण १०० प्रश्न. प्रत्येक प्रश्नास २ गुण, एकूण – २०० गुण, कालावधी – २ तास – उमेदवारांची निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल.
गट-ड संवर्गातील घोषित केलेल्या सर्व पदांसाठी परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने उमेदवाराने कोणत्या एका संवर्गासाठी एकाच जिह्यात व इतर संवर्गासाठी पात्र असल्यास शक्यतो त्याच जिह्यात अर्ज करावा. आणि तांत्रिक ज्ञानावर आधारित ८० प्रश्न असे एकूण १०० प्रश्न.
उमेदवारांनी ज्या पदांसाठी व ज्या कार्यालयांसाठी अर्ज केले असतील त्यानुसार त्यांना कोणत्या परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षेसाठी उपस्थित रहावे लागेल, याबाबतची माहिती परीक्षा प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. लेखी परीक्षेत किमान ४५ टक्के गुण मिळालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात येईल.
प्रोफालईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे पीडीएफ फाईल फॉरमॅटमध्ये संलग्न अपलोड करावीत.
विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे/ प्रमाणपत्रे (लागू असलेली) संलग्न अपलोड करणे अनिवार्य आहे.
(१) अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता), (२) वयाचा पुरावा, (३) शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, (४) सामाजिकदृष्टय़ा मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, (५) आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा, (६) अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन-क्रिमी लेअर प्रमाणपत्र, (७) पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, (८) पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, (९) खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, (१०) अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, (११) प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, (१२) भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, (१३) अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, (१४) एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा, (१५) अधिवास प्रमाणपत्र, (१६) मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, (१७) लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, (१८) अनुभव प्रमाणपत्र.
परीक्षा शुल्क – अमागास रु. १,०००/-; मागासवर्गीय, अनाथ व ईडब्ल्यूएस रु. ९००/-. (माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क माफ आहे.)
केंद्र निवड – केंद्र निवडीचा पर्याय नसून ज्या विभागाच्या पदांकरिता अर्ज केला आहे. त्याच विभागातील जिह्यांत परीक्षा आयोजित केली जाईल. प्रवेश केंद्राबाबतची माहिती प्रवेश पत्रावर देण्यात येईल. प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेपूर्वी ७ दिवस अगोदर पात्र उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील गट-क व गट-ड पद भरतीकरिता यापूर्वी दि. २४ व ३१ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या रद्द झालेल्या परीक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना आता TCS- ION या कंपनीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विहीत शुल्क भरून नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. दि. २४ व ३१ ऑक्टोबर २०२१ चे परीक्षार्थी शिथिलक्षम वयाधिक्याची मर्यादा पार करत असल्यास ते या परीक्षेचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत अर्ज भरण्यासाठी पात्र राहतील.
ऑनलाइन अर्ज www. arogya. maharashtra. gov. in या संकेतस्थळावर दि. १८ सप्टेंबर २०२३ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत. याशिवाय https:// nrhm. maharashtra. gov. in व https:// maharashtra. gov. in या संकेतस्थळांवर पदभरती २०२३ ऑनलाइन अर्ज ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच त्यांना पूर्वी भरलेले परीक्षा शुल्क, बँक तपशिल उपलब्ध करून दिल्यानंतर परत करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.