Hindustan Copper Bharti 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL)मध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अनेक उमेदवार या भरतीची प्रतीक्षा करत होते. अखेर या भरतीसंदर्भात माहिती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी प्रतीक्षा करत असलेले उमेदवार तसेच HCL मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी लवकरच अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची मुदत जाहीर करण्यात आली आहे. १४ ऑक्टोबर २०२४ पासून या भरतीसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. उमेदवारांना ४ नोव्हेंबर २०२४ तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. ही भरती प्रक्रिया केवळ १९ पदांसाठी आहे. या पदांमध्ये मॅनेजर पदांचा समावेश आहे.

रिक्त पदे –

हिंदुस्थान कॉपर लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया उपव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक अशा विविध पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून १९ जागा या भरल्या जातील.

निवड प्रक्रिया

hindustancopper.com या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीनंतर उमेदवाराची निवड ही केली जाईल.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २८ ते ५५ वर्ष असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ५३,९४० ते १,६१,८२० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

शुल्क

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ५०० रुपये फीस ही भरावी लागेल. तर इतर आरक्षित प्रवर्गातील ऊमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये सूट देण्यात आली आहेत.

हेही वाचा >> Railways Recruitment 2024 : रेल्वे विभागात नोकरीची सुवर्ण संधी; जाणून घ्या कसा कराल अर्ज

या भरतीसाठी आयोजित असलेल्या निवड प्रक्रियेमध्ये मुलाखतीचा समावेश आहे. असिस्टंट मॅनेजर तसेच ट्रेनी मॅनेजरच्या पदासाठी नियुक्त होण्यासाठी उमेदवारांना संगणक आधारित ऑनलाईन परीक्षा दयावी लागणार आहे. तसेच त्यांची मुलाखत घेतली जाणार आहे. तसेच डेप्युटी जनरल मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजरच्या पदासाठी उमेदवारांना मुलाखत द्यावी लागणार आहे.