BAMU Aurangabad Bharti 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील काही रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर पदाच्या जवळपास ७३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरती २०२३

पदाचे नाव – प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर

एकूण रिक्त पदे – ७३

अर्ज शुल्क –

  • खुला प्रवर्ग – ५०० रुपये
  • राखीव प्रवर्ग – ३०० रुपये

नोकरी ठिकाण – औरंगाबाद</strong>

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

हेही वाचा- UIIC मध्ये प्रशासकीय अधिकारी पदासाठी भरती सुरु, अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ सप्टेंबर २०२३
  • अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख – २१ सप्टेंबर २०२३

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी कॅम्पस, सोनेरी महल जवळ, जयसिंगपुरा, औरंगाबाद- ४३१००४

अधिकृत वेबसाईट- bamu.ac.in

शैक्षणिक पात्रता –

  • प्रोफेसर – पीएच.डी. पदवी
  • असोसिएट प्रोफेसर – पदव्युत्तर पदवी
  • असिस्टंट प्रोफेसर – पदव्युत्तर पदवी

पगार –

  • प्रोफेसर – १ लाख ४४ हजार २०० रुपये ते २ लाख १८ हजार २०० रुपयांपर्यंत.
  • असोसिएट प्रोफेसर – १ लाख ३१ हजार ४०० रुपये ते २ लाख १७ हजार १०० रुपयांपर्यंत.
  • असिस्टंट प्रोफेसर – ५७ हजार ७०० रुपये ते १ लाख ८२ हजार १०० रुपयांपर्यंत.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/14xeUeRdb8ii2pz4wx5Ta7e1D1mX0l4Kw/view?usp=sharing) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Graduates opportunity of job in dr babasaheb ambedkar marathwada university aurangabad recruitment for this post has started jap