गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड (GRSE) (संरक्षण मंत्रालयांतर्गत भारत सरकारचा उपक्रम), कोलकाता (Notification No. ०१/२०२४). पुढील २३० अॅप्रेंटिसेस पदांची भरती –
(I) ट्रेड अॅप्रेंटिस (एक्स आयटीआय) – एकूण ९० पदे. (प्रशिक्षणाचा कालावधी १२ महिने) स्टायपेंड : दरमहा रु. ७,०००/- किंवा ७,७००/-.
(१) फिटर (२) वेल्डर (जी अॅँड ई) (३) इलेक्ट्रिशियन (४) मशिनिस्ट (५) पाईप फिटर (६) कारपेंटर (७) ड्राफ्ट्समन मेकॅनिकल (८) PASAA (COPA) (९) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (१०) पेंटर (११) मेकॅनिक (डिझेल) (१२) फिटर स्ट्रक्चरल (१३) सेक्रेटरियल असिस्टंट (इंग्लिश) (१४) MMTM (१५) ICTSM (१६) मेकॅनिक रेफिजरेशन अँड ए.सी.
कामाचे ठिकाण : मेकॅनिक (डिझेल) ट्रेडसाठी रांची येथे इतरांसाठी कोलकाता.
पात्रता : संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट (NTC).
वयोमर्यादा : १४ ते २५ वर्षे.
(II) ट्रेड अॅप्रेंटिस (फ्रेशर) – एकूण ४० पदे.
स्टायपेंड – दरमहा रु. ६,०००/-
हेही वाचा >>> कराअर मंत्र
ट्रेड्स –
(१) फिटर (२) वेल्डर (जी अँड ई) (३) इलेक्ट्रिशियन (४) पाईप फिटर (५) मशिनिस्ट
पात्रता : १० वी उत्तीर्ण. कामाचे ठिकाण – GRSE चे कोलकाता येथील युनिट्स.
वयोमर्यादा : (दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी) १४ – २० वर्षे.
ट्रेड अॅप्रेंटिसेस एक्स-आयटीआय आणि ट्रेड अॅप्रेंटिस (फ्रेशर) पदांसाठी या जाहिरातीनुसार ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी MSDE अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग पोर्टल https://www.apprenticeshipindia.gov. in वर आपले नाव रजिस्टर केले असावे. जर तसे केले नसल्यास https://apprenticeshipindia.gov.in/ candidate- registration वर रजिस्टर करावे.
(III) ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस – एकूण ४० पदे. (कालावधी १२ महिने) स्टायपेंड – दरमहा कोलकाता येथे रु. १५,०००/-, रांची येथे रु. १२,५००/-.
(१) मेकॅनिकल (मेकॅनिकल/ मेकॅनिकल अँड प्रोडक्शन इंजिनीअरिंग)
(२) इलेक्ट्रिकल (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स)
(३) कॉम्प्युटर सायन्स अँड आयटी (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी/ आयटी)
(४) सिव्हील इंजिनिअरींग (सिव्हील/ सिव्हील अँड स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग)
पात्रता : संबंधित विषयातील इंजिनिअरींग पदवी २०२२/ २०२३ किंवा २०२४ मध्ये उत्तीर्ण.
वयोमर्यादा : (दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी) १४ – २६ वर्षे.
ट्रेनिंगचे ठिकाण : GRSE चे कोलकाता युनिट्स.
(IV) टेक्निशियन अॅप्रेंटिस – एकूण ६० पदे. (कालावधी – १२ महिने) स्टायपेंड – दरमहा रु. १०,०००/- कोलकाता येथे आणि रु. ९,०००/- रांची येथे.
(१) मेकॅनिकल (मेकॅनिकल/ मेकॅनिकल अँड प्रोडक्शन इंजिनीअरिंग)
(२) इलेक्ट्रिकल (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग)
(३) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग)
(४) सिव्हील (सिव्हील / सिव्हील अँड स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग)
ट्रेनिंगचे ठिकाण : GRSE चे कोलकता किंवा रांची युनिट्स.
पात्रता : संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा २०२२, २०२३ किंवा २०२४ मध्ये उत्तीर्ण.
वयोमर्यादा : (दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी) १४ – २६ वर्षे
ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस आणि टेक्निशियन अॅप्रेंटिस पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी NATS पोर्टल http:// nats. education. gov. in वर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक.
अॅप्रेंटिस पदांसाठी निवड पद्धती : पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल.
(१) HR Trainee – एकूण ६ पदे (१ पद इमावसाठी राखीव). (ट्रेनिंगचा कालावधी – १२ महिने) स्टायपेंड – दरमहा रु. १५,०००/-.
पात्रता : एमबीए/ पीजी डिग्री/ पीजी डिप्लोमा (HRM/HRD/PM/IR/Social Work/Labour Welfare) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
वयोमर्यादा : (दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी) २६ वर्षेपर्यंत.
निवड पद्धती : शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूद्वारे.
सर्व पदांसाठीची विस्तृत जाहिरात www.grse.in आणि https://jobapply.in/grse २०२४ app वरील Career Section मध्ये उपलब्ध आहे.
ऑनलाइन अर्ज https://jobapply.in/grse२०२४ app या संकेतस्थळावर दि. १७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत करावेत.