प्राथमिक व माध्यमिक शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठीची पात्रता परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE), दिल्ली ‘सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट’ (CTET)- Dec 2024 दि. १ डिसेंबर २०२४ रोजी घेणार आहे. CTET पात्रता प्रमाणपत्र परीक्षा शिक्षकांची नोकरी मिळविण्यासाठी पूर्ण हयातभर ग्राह्य धरला जाईल. CTET मध्ये किमान ६० टक्के गुण मिळवणारे उमेदवार उत्तीर्ण गणले जातील. CTET स्कोअर केंद्र सरकार (केंद्रीय विद्यालय स्कूल्स (KVS), नवोदय विद्यालय समिती (NVS), सेंट्रल तिबेटन स्कूल्स इ.) व केंद्रशासित प्रदेशांतर्गत (चंडीगढ, दादरा-नगर हवेली, दमण आणि दीव, अंदमान-निकोबार बेटे, लक्षद्वीप आणि NCT दिल्ली व इतर शाळांमध्ये (विनाअनुदानित खाजगी शाळा)) येणाऱ्या व इतर शाळांमध्ये १ ली ते ८ वीचे शिक्षक म्हणून निवडण्यासाठी ग्राह्य धरला जातो.

पात्रता : प्राथमिक शिक्षक पदासाठी – (इ. १ ली ते ५ वी) १२ वी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि २ वर्षे कालावधीचा एलिमेंटरी एज्युकेशनमधील डिप्लोमा किंवा पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि बी.एड. उत्तीर्ण इ. (डीईएलईडी/बी.एड. च्या अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.)

Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
PET, LLM, Admit Card, Pre-Entrance Exams,
‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
expert answer on career advice questions career advice tips
कराअर मंत्र
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?

माध्यमिक शिक्षक पदासाठी : (इ. ६ वी ते ८ वी) – ( i) पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि २ वर्षं कालावधीचा एलिमेंटरी एज्युकेशनमधील डिप्लोमा किंवा बी.एड. पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा १ वर्ष कालावधीचा बी.एड. (स्पेशल एज्युकेशन) इ. ( ii) १२ वी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि BA/ B. Sc. BEd किंवा B. A. Ed/ B. Sc. Ed उत्तीर्ण. (अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र.) प्रायमरी टीचर आणि माध्यमिक टीचर पदांसाठी अजा/अज/इमाव/अपंग उमेदवारांना पात्रता परीक्षेत ५ टक्के गुणांची सूट असेल.

हेही वाचा >>> Success Story : एका जिद्दीची गोष्ट! शाळेतील शिक्षक ते आयआरएस अधिकारी; वाचा विष्णू औटी यांची प्रेरणादायी कहाणी

CTET कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) साठी उमेदवारांना २० पैकी २ भाषा निवडाव्या लागतील. (मराठी/ हिंदी/ इंग्रजी इ.)

परीक्षा पद्धती : सीटीईटी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. (एमसीक्यू) ओएमआर शिट प्रत्येक प्रश्नाला १ गुण असेल. चुकीच्या प्रश्नासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. पेपर-१ – प्रायमरी टीचर १ ली ते ५ वीसाठी आणि पेपर-२ – ६ वी ते ८ वीकरिता टीचर पदांसाठी. ज्या उमेदवारांना १ ली ते ५ वी आणि ६ वी ते ८ वीसाठी शिक्षक होण्याची इच्छा आहे अशांनी दोन्ही पेपर द्यावयाचे आहेत.

पेपर-१ (इ. १ ली ते ५ वीसाठी टीचर) – सर्व विषय अनिवार्य आहेत. (i) चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॅगॉगी, (ii) मॅथेमॅटिक्स, (iii) एन्व्हार्नमेंटल स्टडीज, (iv) लँग्वेज-१, (v) लँग्वेज-२ – प्रत्येकी ३० गुण/ ३० प्रश्न. एकूण १५० प्रश्न, १५० गुण, वेळ २ तास ३० मिनिटे.

पेपर-२ (इ. ६ वी ते ८ वीसाठी टीचर) – (i) चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॅगॉगी (अनिवार्य), (ii) मॅथेमॅटिक्स अँड सायन्स (मॅथेमॅटिक्स आणि सायन्स टीचरसाठी) ६० प्रश्न, ६० गुण किंवा (iii) सोशल स्टडीज/ सोशल सायन्सेस टीचर. ६० प्रश्न, ६० गुण. (iv) लँग्वेज-१ (अनिवार्य), (v) लँग्वेज-२ (अनिवार्य). प्रत्येकी ३० प्रश्न व प्रत्येकी ३० गुण. इतर विषयांचे शिक्षक होण्यासाठी पेपर-२ मधील उपविभाग IV किंवा V द्यावा लागेल. एकूण १५० प्रश्न, १५० गुण, वेळ २ तास ३० मिनिटे. NCERT अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा (पेपर-१ व पेपर-२) घेतली जाईल.

परीक्षा शुल्क : खुला/इमाव – फक्त एका पेपरसाठी रु. १,०००/-, दोन्ही पेपर्ससाठी रु. १,२००/-. अजा/ अज/ दिव्यांग – एका पेपरसाठी रु. ५००/-, दोन्ही पेपर्ससाठी रु. ६००/-. याव्यतिरिक्त जीएस्टी वेगळी आकारली जाईल.

महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र : अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, सोलापूर.

ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी ४ परीक्षा केंद्रांची निवड करावी.

टेस्ट प्रॅक्टिस सेंटर उमेदवारांना विनाशुल्क ऑनलाइन कॉम्प्युटर बेस्ड टेस्टचा सराव करून देण्याकरिता प्रॅक्टिस टेस्ट आणि प्रश्न उपलब्ध करून दिले जातील. टेस्ट प्रॅक्टिसकरिता CTET वेबसाईटवर लिंक उपलब्ध करून दिली जाईल.

एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल व उमेदवारास भविष्यातील परीक्षांसाठी प्रतिबंधित ( Debard) करण्यात येईल. ऑनलाइन अर्ज https://ctet.nic.in या संकेतस्थळावर दि. १६ ऑक्टोबर २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.