सुहास पाटील
हिंदूस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आपल्या ७ राज्यांमधील विविध प्रोडक्शन विभाग, नूतनीकरण आणि देखभाल विभाग, रिसर्च आणि डिझाईन सेंटर्स, बंगळूरु, नाशिक, कोरापत (ओडिशा), लखनौ, कानपूर आणि कोरवा (उत्तर प्रदेश) येथील ऑफिसेसमध्ये डिझाईन ट्रेनी/ मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती करणार आहे. (Advt.No.HAL/ HR/२५(४५)२०२३/०१)
एकूण १८५ रिक्त पदांचा तपशील –
(i) डिझाईन ट्रेनी : एकूण ९५ पदे (४ पद दिव्यांग कॅटेगरी HOH/OL/OA/ LC/DW/AAV/SDD/SID/ SD/ SI साठी राखीव).
(१) एअरोनॉटिकल – ९ पदे (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ५).
(२) इलेक्ट्रिकल – १२ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ५).
(३) इलेक्ट्रॉनिक्स – ४४ पदे (अजा – ७, अज – ३, इमाव – १२, ईडब्ल्यूएस – ४, खुला – १८).
(४) मेकॅनिकल – ३० पदे (अजा – ५, अज – २, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १२).
(II) मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) : एकूण ९० पदे.
(१) कॉम्प्युटर सायन्स – २३ पदे (अजा – ३, अज – २, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – २, खुला – १०).
(२) इलेक्ट्रिकल – १६ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस् – २, खुला – ७).
(३) इलेक्ट्रॉनिक्स – १३ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – ५).
(४) मेकॅनिकल – ३० पदे (अजा – ५, अज – २, इमाव – ९, ईडब्ल्यूएस – ३, खुला – ११).
(५) प्रोडक्शन – ५ पदे (अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – २).
(६) मेटॅलर्जी – ३ पदे (खुला).
पात्रता : (i) अनुक्रमांक i, ii मधील सर्व पदांसाठी संबंधित विद्याशाखेतील इंजीनिअरिंग/ टेक्नॉलॉजीमधील पदवी सरासरी किमान ७० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांसाठी ६० टक्के गुण)
पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत, त्यांना ऑक्टोबर, २०२३ मध्ये होणाऱ्या इंटरव्ह्यूच्या वेळी पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागेल.
वयोमर्यादा : दि. २२ ऑगस्ट २०२३ रोजी २८ वर्षे. (इमाव – ३१ वर्षे, अजा/अज – ३३ वर्षे, दिव्यांग – ३८/ ४१/ ४३ वर्षे)
अर्जाचे शुल्क : रु. ५००/-. (अजा/ अज/ दिव्यांग/ खाते अंतर्गत उमेदवारांना फी माफ आहे.)
निवड पद्धती : ऑनलाइन सिलेक्शन टेस्ट (९ ते ११ सप्टेंबर २०२३ दरम्यान) (उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात दिलेल्या केंद्रांपैकी ३ केंद्र निवडतील.) आणि इंटरव्ह्यू (बंगळूरु येथे ९ ते ११ ऑक्टोबर २०२३ दरम्यान) (ई-अॅडमिट कार्ड उमेदवारांना HAL वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल.)
ऑनलाइन सिलेक्शन टेस्ट (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न (MCQ) एकूण १६० प्रश्न, वेळ २ तास ३० मिनिटे. (प्रत्येक प्रश्नास १ गुण)) (पार्ट-१ – जनरल अवेअरनेस – २० प्रश्न; पार्ट-२ – इंग्लिश अॅण्ड रिझिनग ४० प्रश्न; पार्ट-३ – संबंधित विद्याशाखेवर आधारित १०० प्रश्न) उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करताना हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून टेस्ट द्यावयाची आहे त्या भाषेची निवड करावी लागेल.
सिलेक्शन टेस्टचा निकाल HAL वेबसाईटवर दि. १३ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर केला जाईल.
ऑनलाइन सिलेक्शन टेस्टमधील कामगिरीवर आधारित रिक्त पदांच्या ५ पट उमेदवार इंटरह्यूसाठी शॉर्ट लिस्ट केले जातील.
प्रोव्हिजनली सिलेक्टेड उमेदवारांची यादी दि. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी जाहीर केला जाईल.
अंतिम गुणवत्ता यादी बनविताना ऑनलाइन टेस्टसाठी ८५ टक्के वेटेज व इंटरव्ह्यूसाठी १५ टक्के वेटेज दिले जाईल.
HAL जॉईन करण्यापूर्वी उमेदवारांना प्री-एम्प्लॉयमेंट मेडिकल टेस्ट द्यावी लागेल. (दि. २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२३ दरम्यान)
ट्रेनिंग : निवडलेल्या उमेदवारांना ५२ आठवडय़ांचे ट्रेनिंग दिले जाईल. ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना दरमहा स्टायपेंड दिले जाईल. (मूळ वेतन रु. ४०,०००/- अधिक महागाई भत्ता, कँटीन अलाऊन्स) उमेदवारांना ट्रेनिंग दरम्यान बॅचलर्स अकोमोडेशन दिले जाईल. ट्रेनिंग ऌअछ बंगळूरु येथे नोव्हेंबर २०२३ च्या तिसऱ्या/ चौथ्या आठवडय़ापासून सुरू होईल. यशस्वीरित्या ट्रेनिंग पूर्ण केल्यावर ट्रेनीजना इंजीनिअर्स ग्रेड- कक पदावर (वेतर श्रेणी रु. ४०,०००/- – १,४०,०००/-) कायम केले जाईल. मूळ वेतनाव्यतिरिक्त ऑफिसर्सना DA/HRA (किंवा कंपनी अकोमोडेशन)/ परफॉरमन्स रिलेटेड पे/ कॅफेटेरिया अलाऊन्स इ. भत्ते दिले जातील.
शंकासमाधानासाठी उमेदवारांनी ऌअछ च्या वेबसाईटवरील FAQs तपासून पहावेत. FAQs व्यतिरिक्त चौकशीसाठी halrecruitmentsqst @gmail.com शी संपर्क साधा. ऑनलाइन अर्ज www.hal- india.co.in या संकेतस्थळावर दि. २२ ऑगस्ट २०२३ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत.