सुहास पाटील

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), एअरक्राफ्ट डिव्हिजन, नाशिक HAL. नाशिक डिव्हिजनमध्ये दोन वेगवेगळ्या जाहिरातींमधून १ वर्ष कालावधीच्या पुढील अॅप्रेंटिसेस पदांची सन २०२४-२५ करिता भरती. एकूण रिक्त पदे – ५७०.

Appeal will be filed in the Supreme Court regarding the cancellation of the independent candidature application form Mumbai
चेंबूरमधील अपक्ष उमेदवार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Night special local for the convenience of employees voters Mumbai news
कर्मचारी, मतदारांच्या सोयीसाठी रात्रकालीन विशेष लोकल धावणार
PET, LLM, Admit Card, Pre-Entrance Exams,
‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
KTCL Goa Bharti 2024 Job Opportunity in KTCL Recruitment
KTCL Goa Bharti 2024 : KTCLमध्ये नोकरीची संधी! कंडक्टरच्या ७० पदांसाठी होणार भरती, १०वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

( I) Advt. No. T & D/ 1614/ 2024-25/120 dtd. 8th August 2024

(ए) इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेस – १०५ पदे. स्टायपेंड – दरमहा रु. ९,०००/-.

१) एअरोनॉटिकल इंजिनीअरिंग – ५ पदे,

२) कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग – १० पदे, ३) सिव्हील इंजिनीअरिंग – १२ पदे, ४) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग – १४ पदे, ५) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनीअरिंग – १५ पदे, ६) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – ३५ पदे, ७) प्रोडक्शन इंजिनीअरिंग – १० पदे, ८) फार्मसी – ४ पदे,

पद क्र. १ ते ८ साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग/ फार्मसी पदवी.

(बी) टेक्निशियन (डिप्लोमा) ॲप्रेंटिसेस – ७१ पदे. स्टायपेंड – दरमहा रु. ८,०००/-.

हेही वाचा >>> Success Story: दहावीच्या परीक्षेत नापास… नातेवाइकांनी केला अपमान; मेहनतीच्या जोरावर उभी केली करोडोंची कंपनी अन् पटकावले तीन राष्ट्रीय पुरस्कार

१) एअरोनॉटिकल इंजिनीअरिंग – ३ पदे

२) सिव्हील इंजिनीअरिंग – ८ पदे

३) कॉम्प्युटर इंजिनीअरिंग – ६ पदे

४) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग – १६ पदे

५) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनीअरिंग – १५ पदे

६) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – २० पदे

७) लॅब असिस्टंट (DMLT) – ३ पदे. पात्रता – संबंधित क्षेत्रातील किमान १ वर्ष कालावधीचा DMLT कोर्स.

पद क्र. १ ते ६ साठी पात्रता : संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदविका.

(सी) नॉन-टेक्निकल ग्रॅज्युएटस अॅप्रेंटिसेस – ८० पदे. स्टायपेंड – दरमहा रु. ९,०००/-.

१) बी.ए. – २५ पदे, २) बी.कॉम. – २५ पदे, ३) बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट/ ॲप्लिकेशन – ३ पदे, ४) बी.एससी. (PCM Stats only) – २० पदे,

५) हॉटेल मॅनेजमेंट – ४ पदे, ६) हॉटेल मॅनेजमेंट – २ पदे, ७) नर्सिंग असिस्टंट – ५ पदे

पद क्र. १ ते ७ साठी पात्रता : संबंधित विषयातील पदवी. नर्सिंग असिस्टंटसाठी फक्त B. Sc. नर्सिंग.

वरील सर्व पदांसाठी उमेदवारांनी प्राप्त केलेली डिग्री/ डिप्लोमा नेमणुकीच्या ५ वर्षांपूर्वी प्राप्त केलेली नसावी.

NATS 2.0 Portal https:// nats. education. gov. in वर उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी रजिस्टर करणे आवश्यक आहे आणि तो रजिस्ट्रेशन नंबर (Students ID/ Enrollment ID) Google Application Form मध्ये नमूद करावा. ज्या उमेदवारांनी यापूर्वी NATS पोर्टलवर आपले नाव रजिस्टर केलेले आहे. त्यांना NATS 2.0 पोर्टलवर स्थलांतर ( Migrate) करण्यासाठी संबंधित विभागीय BOAT ऑफिसशी संपर्क साधावा.

Google Application Form https://forms.gle/dWrWkGHDDZBsAtaUy या लिंकवर भरावा, फॉर्म यशस्वीरित्या भरला गेल्यावर ‘ Thank You! Your Form submitted Successfully!’ असा मेसेज स्क्रीनवर समोर येईल.

( II) Advt. No. hAL/ T & D/ 1614/ 2024-25/121 dtd. 8th August 2024

(डी) आयटीआय पूर्ण केलेले – ३२४ पदे.

१) फिटर – १३८ पदे , २) टूल अँड डायमेकर (जिग अँड फिक्चर) – ५ पदे,

३) टूल अँड डायमेकर (डाय अँड मोल्ड) – ५ पदे, ४) टर्नर – २० पदे, ५) मशिनिस्ट – १७ पदे, ६) मशिनिस्ट (ग्राईंडर) – ७ पदे, ७) इलेक्ट्रिशियन – २७ पदे, ८) ड्राफ्ट्समन मेकॅनिकल – ५ पदे, ९) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – ८ पदे, १०) पेंटर (जनरल) – ७ पदे, ११) मेकॅनिक मोटर वेहिकल – ६ पदे, १२) रेफ्रिजरेशन अँड एसी मेकॅनिक – ६ पदे, १३) कारपेंटर – ६ पदे, १४) शीट मेटल वर्कर – ४ पदे, १५) सीओपीए – ५० पदे, १६) वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) – १० पदे, १७) स्टेनोग्राफर (इंग्लिश) – ३ पदे.

(अजा – १० टक्के, अज – ९ टक्के, इमाव – २७ टक्के, अपंग – ४ टक्के, माजी सैनिक – ४.५ टक्के, ईडब्ल्यूएस् – १० टक्के पदे राखीव)

१ ते १२ पदांसाठी पात्रता : संबंधित ट्रेडमधील NCVT/ SCVT मान्यताप्राप्त आयटीआय कोर्स उत्तीर्ण.

स्टायपेंड : (डी) १ ते १२ पदांसाठी रु. ८,०५०/- दरमहा आणि १३ ते १७ पदांसाठी रु. ७,७००/- दरमहा.

निवड पद्धती : संबंधित पदवी/ डिप्लोमा/ आयटीआयमधील गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. कोणतीही लेखी परीक्षा अथवा इंटरव्ह्यू घेतला जाणार नाही. गुणवत्ता यादी hal-india.co.in या संकेतस्थळावर कागदपत्र पडताळणीनंतर दोन आठवड्यांनी जाहीर केली जाईल. तसेच त्यांना ई-मेलसुद्धा पाठविला जाईल. वॉक-इनच्या वेळी उमेदवारांचे अर्ज स्विकारले जातील.

सर्व पदांसाठी कागदपत्र पडताळणीच्या वेळी पुढील कागदपत्र सादर करणे आवश्यक. (१) आधारकार्ड, (२) १० वीचे गुणपत्रक, (३) डिग्री/ डिप्लोमा/ आयटीआयचे मूळ सर्टिफिकेट, गुणपत्रक (सर्व सेमिस्टर्सचे किंवा एकत्रित मार्कशिट), (४) आरक्षण/ कम्युनिटी/ कास्ट सर्टिफिकेट (अजा/ अज/ इमाव, ईडब्ल्यूएस, माजी सैनिक, दिव्यांग), (५) वरील सर्व सर्टिफिकेट्सच्या फोटो कॉपीचा एक संच ( Set), (६) दोन पासपोर्ट आकाराचे फोटोग्राफ, (७) आयटीआय उमेदवारांनी ॲप्रेंटिसशिप रजिस्ट्रेनची कॉपी.

(II) आयटीआय उमेदवारांसाठी – आयटीआय उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या NAPS पोर्टलवर रजिस्टर करणे आवश्यक. त्यांनी रजिस्ट्रेशन क्रमांक https://forms.gle/ci59kuMer5TG53CU7 या Google Form वर नमूद करणे आवश्यक.

रजिस्ट्रेशनच्या वेळी पुढील कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य – (१) १० वीचे गुणपत्रक, (२) आयटीआय गुणपत्रक (सर्व सेमिस्टर्सचे), (३) आधारकार्ड, (४) फोटोग्राफ, (५) सिग्नेचर आणि (६) बँक पासबुक (SBI बँक खाते आधारकार्डाशी जोडलेले असावे.)

दोनही जाहिरातींसाठी गुगल फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे ३१ ऑगस्ट २०२४. कागदपत्र पडताळणी सप्टेंबर २०२४ च्या दुसऱ्या/तिसऱ्या आठवड्यात होईल. शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची यादी सप्टेंबर २०२४ च्या चौथ्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाईल. अॅप्रेंटिसशिप प्रशिक्षण ऑक्टोबर २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होईल. शंकासमाधानासाठी फोन नंबर ०२५५०२७७१४४ (सकाळी ७.३० ते ११.१५ आणि १२.१५ १४.४५ वाजे दरम्यान) संपर्क साधावा. (सार्वत्रिक सुट्टी वगळता)

भरती प्रक्रियेविषयी माहितीसाठी उमेदवारांनी www.hal-india.co.in ( Career Section – Aircraft Manufacturing Division, Nasik) नियमितपणे तपासून पहावी.