HCL Mega Bharti 2023: आयटी टेक कंपन्यांमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे एचसीएल टेक (HCL Tech) या कंपनीने फ्रेशर्सना संधी देणार असल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार कंपनी पुढील आर्थिक वर्षात २०२४ मध्ये तब्बल १५ हजार फ्रेशर्सची भरती करणार आहे. कंपनीने नुकतीच ही आकडेवारी जाहीर केली असून कंपनी कॅम्पस भरतीला प्रोत्साहन देणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. याबाबतचे वृत्त महाभरतीने दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकीकडे जगभरातील मोठमोठ्या कंपन्या नोकरकपात करत असताना आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेल्या एचसीएल टेक कंपनीने यंदा २०२३ मध्ये अनेक फ्रेशर्सना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. अशातच आता कंपनी पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच २०२४ मध्येही लॅटरल हायरिंगवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कंपनी १५ हजार फ्रेशर्सची भरती करणार आहे.

हेही वाचा- मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, महिना तब्बल एक लाख पगार मिळणार, आजच अर्ज करा

लॅटरल हायरिंग कमी करण्यासाठी एचसीएलने (HCL) यंदा फ्रेशर्सची भरती केली होती. पुढच्या वर्षीही फ्रेशर्सना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात येईल. फ्रेशर्सना प्रशिक्षण देऊन विविध प्रोजेक्ट्समध्ये त्यांना कसं सामावून घेता येईल हा आमचा उद्देश असून फ्रेशर्सना कंपनीत स्थान देता येऊ शकतं, असं आमच्या पुरवठा विभागाची आकडेवारी सांगते, असं एचसीएल टेकचे सीईओ विजयकुमार यांनी सांगितलं आहे.

कंपनीने यंदा २७ हजार फ्रेशर्सना नोकरी दिल्या. त्यापैकी काही उमेदवारांचं प्रशिक्षण सुरू आहे. तर पुढच्या वर्षीच्या नोकरभरतीचा आकडा जाहीर करणारी ही पहिलीच कंपनी आहे. विजयकुमार यांच्या मते, उत्पादन आणि उच्च तंत्रज्ञानामधले काही प्रोजेक्ट्स सध्या रखडले आहेत. टेक्नॉलॉजीवर खर्च करण्यासाठीचं बजेट क्लाएंट्सनी कमी केलं आहे, हे त्यामागचं कारण आहे.

हेही वाचा- भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ २४२ पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता निकष, अर्जाची प्रक्रिया

आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीसाठी कंपनी त्यांच्या ८५ टक्के कर्मचाऱ्यांना व्हेरिएबल पे देणार असून आधीच्या तिमाहीप्रमाणेच कंपनीने नफा मिळाल्यावर त्याबाबतची घोषणा केली आहे. कंपनीचे चीफ पीपल ऑफिसर (CPO) राम सुंदरराजन यांनी बैठकीमध्ये व्हेरिएबल पेबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना या तिमाहीत ८५ टक्के कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार असल्याचंही सांगितलं.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hcl mega bharti 2023 hcl tech will give job opportunity to 15 thousand freshers jap