– आशुतोष शिर्के

फ्रान्समधील पदवीला जागतिक मान्यता आहे का, असा प्रश्न अनेक विद्यार्थी आणि पालक विचारतात. अर्थातच या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे. युरोपिअन-युनियन मध्येच नव्हे तर जगातील अनेक प्रगत देशांमध्ये फ्रेंच विद्यापीठातील पदवीला मान्यता आहे. विज्ञान आणि अभियांत्रकिी, कृत्रमि बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स ( Université PSL, Grenoble Alpes) या क्षेत्रांमध्ये संशोधन आणि नाविन्यपूर्ण संधी देणारी अनेक विद्यापीठे आणि संस्था फ्रांसमध्ये आहेतच (É cole Polytechnique, CentraleSupé lec) पण त्याच बरोबर व्यवस्थापन क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर नावाजलेली अनेक बिजनेस स्कूल्स फ्रान्समध्ये आहेत ( HEC Paris, INSEAD, ESSEC). इतिहास, मानव्यशास्त्र , ( Sciences Po, Sorbonne University) या बरोबरच चित्र कला, स्थापत्य कला, मूर्तीकला, रचना शास्त्र, फिल्म, नृत्य, नाट्य, या सर्वांसाठी फ्रान्स नेहमीच नावाजलेला देश राहिलेला आहे. हॉस्पिटॅलिटी किंवा हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग आणि गॅस्ट्रॉनॉमी, पर्यटन ( Vatel, Institut Paul Bocuse) या सर्व विषया्तील उच्च शिक्षणात आज फ्रान्स जगात प्रथम क्रमांकावर आहे. फॅशन डिझायनिंग च्या क्षेत्रातही फ्रान्स जगातील सर्वात मोठे आणि दबदबा असलेले केंद्र आहे( Institut Franç ais de la Mode)

फ्रान्सची अर्थव्यवस्था आज युरोपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. अनेक आघाडीच्या आंतरराष्ट्रीय कंपन्या येथे कार्यरत आहेत. उद्याोग आणि कंपन्यांमधून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना अप्रेंटिसशिप आणि इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याची परंपरा फ्रान्समध्ये आहे. त्यामुळे शिक्षणासोबतच प्रत्यक्ष उद्याोग क्षेत्राचा अनुभव विद्यार्थ्याना मिळतो.

प्रवेश प्रक्रिया आणि पात्रता

फ्रान्समध्ये अनेक सार्वजनिक आणि खासगी विद्यापीठांमधून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमातून उपलब्ध असतात. या अभ्यासक्रमांसाठी TOEFL किंवा IELTS या इंग्रजी भाषेच्या आंतरराष्ट्रीय परीक्षा द्याव्या लागतात. जे अभ्यासक्रम फ्रेंच भाषेतून आहेत त्यासाठी फ्रेंच भाषेच्या DELF किंवा DALF या परीक्षा आवश्यक असतात. काही पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी जी- मॅट किंवा जीआरइ या परीक्षा आवश्यक असतात. आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील प्रवेशासाठी आवश्यक असणारी स्टेटमेंट ऑफ पर्पज, शिफारस पत्रे इत्यादी कागदपत्रे तयार ठेवावी लागतात. कॅम्पस फ्रान्स या फ्रेंच शिक्षण खात्याच्या वेबसाईटवर, अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया यापासून ते व्हिसा प्रक्रियेपर्यंत सर्व माहिती उपलब्ध आहे. https:// www. inde. campusfrance. org

भारतीय विद्यार्थ्याना फ्रान्समध्ये उच्च शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी अनेक शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. मास्टर्स आणि पी एच डी साठी ‘आयफिल स्कॉलरशिप’, मास्टर्ससाठी चारपॅक स्कॉलरशिप, संशोधन करण्यासाठी ‘रामन- चारपाक फेलोशिप’, पर्यावरण विज्ञान विषयक ‘मेक अवर प्लॅनेट ग्रेट अगेन स्कॉलरशिप’ या काही प्रमुख शिष्यवृत्ती आहेत. याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुद्धा काही विशेष शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत.

उच्च शिक्षणाचा खर्च

सार्वजनिक विद्यापीठांमध्ये प्रतिवर्षी साधारण तीन ते चार हजार युरो असे शुल्क असू शकते. खागगी विद्यापीठांमध्ये आणि बिजनेस स्कूल्स मध्ये मात्र हेच शुल्क दहा ते तीस हजार युरोपर्यंत जाते. याशिवाय निवास आणि वास्तव्याचा एकूण खर्च प्रति महिना पॅरिस मध्ये बाराशे ते पंधराशे यूरोज आणि इतर शहरांमध्ये आठशे युरो पर्यंत येतो. शिक्षण घेता घेता काम करण्याची संधी विद्यार्थ्याना उपलब्ध असते. अनेक विद्यार्थी आठवड्याला वीस तास पर्यंत काम करून शिक्षणाच्या खर्चाला हातभार लावतात .

फ्रेंच भाषा शिकण्याचे महत्त्व

B1/ B2 स्तराचे फ्रेंच आल्यास दैनंदिन जीवन आणि नोकरीच्या संधी अधिक सुलभ होतात असा अनेक विद्यार्थ्यांचा अनुभव आहे . काही विद्यापीठे विनामूल्य किंवा कमी दरात फ्रेंच भाषा प्रशिक्षणही देतात. काही प्रमाणात फ्रेंच भाषा येणे इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिप मिळवण्यासाठी फायदेशीर ठरते.

भारतीय विद्यार्थी समुदाय

फ्रान्समध्ये अनेक भारतीय विद्यार्थी संघटना सक्रिय आहेत. भारतीय विद्यार्थ्यांसाठी ‘ Bienvenue en France’ उपक्रमांतर्गत विशेष सहाय्य उपलब्ध आहे. भारतीय खाद्यापदार्थ आणि सण साजरे करण्यासाठी फ्रान्समध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. फ्रान्समधील मेट्रो शहरांमध्ये भारतीय समाज मोठ्या प्रमाणावर आहे.

करिअर संधी आणि वर्क परमिट

– फ्रान्समध्ये पदवी पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षे नोकरी शोधण्यासाठी Post- Study Work Visa मिळतो. अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीच्या उत्तम संधी या देशात उपलब्ध आहेत. मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळाल्यास, दीर्घकालीन कामगार व्हिसासाठी अर्ज करता येतो.

– फ्रेंच संस्कृतीत एकत्रित भोजन, महोत्सव आणि साहित्याला विशेष स्थान आहे.

– भारतीय विद्यार्थी फ्रान्समध्ये दिवाळी, होळी आणि गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे करतात.

– फ्रान्स हे भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, संशोधन आणि करिअरसाठी उत्तम संधी उपलब्ध करून देते. जागतिक दर्जाची विद्यापीठे, समृद्ध संस्कृती आणि स्वागतशील वातावरण यामुळे फ्रान्स उच्च शिक्षणासाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरतो. तसेच, फ्रेंच भाषा शिकणे, शिष्यवृत्तींचा लाभ घेणे आणि स्थानिक नेटवर्किंग करणे हे विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

mentorashutosh@gmail. com

Story img Loader