सुहास पाटील

ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळवून संशोधन करण्यासाठी दरमहा रु. ४७,०००/- ची स्टायपेंड मिळवून Ph.D. करावयाची आहे किंवा असिस्टंट प्रोफेसर व्हावयाचे आहे?

Teacher Eligibility Test will be conducted by the State Examination Council on November 10
राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘टीईटी’ची घोषणा… कधी होणार परीक्षा, अर्ज कधीपासून उपलब्ध?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
kalyan minor girl molested marathi news
कल्याणमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा
nagpur medical college fourth class recruitment Online Exam
नागपूर : चतुर्थश्रेणी कर्मचारी पदभरतीच्या ऑनलाईन परीक्षेत गोंधळ; उमेदवार परीक्षेला मुकले
Mumbai University, Winter Session Exams,
मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा २३ ऑक्टोबरपासून
medical admission, list of medical courses,
वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली यादी शनिवारी जाहीर होणार, प्रवेशासाठी ३९ हजार विद्यार्थ्यांनी भरले पसंतीक्रम
11th Admission Third Special Admission List announce mumbai
अकरावी प्रवेश: तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीर; ८ हजार ६८४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय
Pune, MPSC, Maharashtra Public Service Commission, agricultural posts, competitive examinees, MP Supriya Sule, Devendra Fadnavis,
एमपीएससीची उद्या बैठक, कृषि सेवेच्या २५८ पदांबाबत काय होणार निर्णय?

भारतीय विद्यापीठ आणि कॉलेजेसमध्ये ‘असिस्टंट प्रोफेसर’ आणि ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप व असिस्टंट प्रोफेसर’ पद भरतीकरिता पात्रता निश्चित करण्यासाठी ८३ विषयांमध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (UGC) – नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट (NET December 2023) परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाणार आहे. UGC- NET परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. (जून आणि डिसेंबर)

पात्रता : ह्युमॅनिटिज आणि सोशल सायन्स (लँग्वेजेससह), कॉम्प्युटर सायन्स आणि अॅप्लिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक सायन्स इ. (Appendix- V मध्ये नमूद केलेल्या) विषयांतील पदव्युत्तर पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग/ तृतीय पंथी उमेदवारांना ५० टक्के गुण आवश्यक) पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षाचे उमेदवार NET परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना NET 2023 चा निकाल जाहीर होणाऱ्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत पात्रता परीक्षा आवश्यक त्या गुणांसह उत्तीर्ण करणे आवश्यक. उमेदवारांनी ज्या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे, त्या विषयासाठीची NET परीक्षा लिहिणे आवश्यक. जर पदव्युत्तर पदवीचा विषय NET विषयांच्या यादीत (Appendix- V) नसल्यास त्या विषयाशी संबंधित विषय NET परीक्षेसाठी निवडावा.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : भूमी उपयोजन म्हणजे काय? महाराष्ट्रातील भूमी उपयोजनेचे स्वरूप कोणते?

वयोमर्यादा : (दि. १ डिसेंबर २०२३ रोजी) ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी ३० वर्षेपर्यंत. (इमाव (केंद्रीय यादीत असलेल्या जातींसाठी)/ अजा/ अज/ दिव्यांग/ तृतीय पंथी आणि महिला उमेदवारांसाठी – ३५ वर्षेपर्यंत)

असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी – कोणतीही कमाल वयोमर्यादा नाही.

आरक्षण : १५ टक्के जागा अजासाठी, ७५ टक्के जागा अजसाठी, २७ टक्के जागा इमावसाठी, १० टक्के जागा जनरल इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स (General EWS) साठी, ५ टक्के जागा दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव आहेत.

परीक्षा पद्धती : लेखी परीक्षा (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न – दोन पेपर्स. पेपर-१ – ५० प्रश्न, १०० गुण (टीचिंग/ रिसर्च अॅप्टिट्यूड जाणून घेण्यासाठी टेस्ट ऑफ रिझनिंग अॅबिलिटी, रिडींग, कॉम्प्रिहेन्शन, डायव्हर्जंट थिंकिंग आणि जनरल अवेअरनेस विषयांवर आधारित).

पेपर-२ – १०० प्रश्न, २०० गुण निवडलेल्या विषयावर आधारित डोमेन नॉलेज तपासण्यासाठी.

परीक्षेच्या कालावधी ३ तास, १८० मिनिटे. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. UGC NET Dec. 2023 साठीची विषयांची यादी (Appendix- II) आणि त्यांचे कोड नंबर जाहिरातीच्या Appendix- IV मध्ये उपलब्ध आहेत. परीक्षेचा अभ्यासक्रम https:// www. ugcnetonline. in/ syllabus. new. php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रश्नपत्रिकेचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी असेल. (भाषा (लँग्वेजेस वगळता)

हेही वाचा >>> पूर्ण वेळ नोकरी करूनही पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा केली उत्तीर्ण अन् आयएएसचे स्वप्न केले साकार …

ऑनलाइन अर्जात निवडलेल्या माध्यमातूनच प्रश्न विचारले जातील.

चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जाणार नाहीत.

‘असिस्टंट प्रोफेसर’ किंवा ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर’ पदांसाठी पात्रता उमेदवारांच्या UGC NET परीक्षेतील दोन्ही पेपर्समधील सरासरी गुणवत्तेवर आधारित निश्चित केली जाईल.

जे उमेदवार फक्त ‘असिस्टंट प्रोफेसर’ पदासाठी पात्र ठरलेले आहेत, त्यांना खफा पुरस्कारासाठी (award) विचारात घेतले जाणार नाहीत.

जे उमेदवार JRF पुरस्कारासाठी पात्र ठरतील त्यांना त्यांच्या पदव्युत्तर पदवीच्या विषयात किंवा संबंधित विषयात रिसर्च संशोधन करता येईल. तसेच ते ‘असिस्टंट प्रोफेसर’ पदासाठी पात्र ठरतील.

परीक्षा केंद्र : उमेदवारांनी आपल्या पसंतीची ४ परीक्षा केंद्रे निवडावीत. (Appendix- III) मध्ये सिटी कोड नंबर उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे – अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नंदूरबार, नाशिक, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा यवतमाळ.

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – रु. १,१५०/-; जनरल ईडब्ल्यूएस/ इमाव – रु. ६००/-; अजा/ अज/ दिव्यांग/ तृतीय पंथी – रु. ३७५/-. परीक्षा शुल्क दि. २९ ऑक्टोबर २०२३ (२३.५० वाजे) पर्यंत भरता येईल.

पीएच.डी. फेलोशिप स्टायपेंड खफा साठी (३७,००० अधिक २७ टक्के एचआरए) रु. ४६,९९०/- दरमहा २ वर्षांनंतर SRF साठी (रु. ४२,०००/- अधिक २७ टक्के एचआरए) रु. ५३,३४०/- दरमहा दिले जाते.

UGC- NET 2023 परीक्षा ६ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान घेतली जाईल. NTA वेबसाईटवरून अॅडमिट कार्ड डिसेंबर २०२३ च्या पहिल्या आठवड्यापासून डाऊनलोड करता येतील.

ऑनलाइन फॉर्ममध्ये काही सुधारणा/ बदल करावयाच्या असल्यास दि. ३०/ ३१ ऑक्टोबर २०२३ (२३.५० वाजे) पर्यंत करेक्शन विंडो उपलब्ध असेल. ऑनलाइन अर्ज https:// ugcnet. nta. ac. in/; या संकेतस्थळावर दि. २८ ऑक्टोबर २०२३ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत. (Registration; Application Form; Payment of Fees)