Hindustan Copper Limited Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. एचसीएलमध्ये (HCL) ज्युनियर मॅनेजर या पदासाठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट hindustancopper.com वर जाऊन अर्ज करू शकतात. १ जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै २०२४ आहे. परंतु, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पदांचा तपशील, पगार आणि अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

पदाचे नाव आणि रिक्त पदांची संख्या

ज्युनिअर मॅनेजर
१) माइनिंग – ४६
२) इलेक्ट्रिकल – ६
३) कंपनी सेक्रेटरी – २
४) फायनान्स – १
५) एचआर – १

शैक्षणिक पात्रता

१) माइनिंग/इलेक्ट्रिकल डिप्लोमा आणि ५ वर्षांचा अनुभव
किंवा
२) माइनिंग/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी आणि २ वर्षांचा अनुभव
३) कोणत्याही शाखेतील पदवी आणि ५ वर्षे अनुभव
किंवा
४) CA किंवा PG पदवी/ डिप्लोमा(Finance/HR) PG MBA (Finance/HR) आणि २ वर्षांचा अनुभव

१० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; HAL मध्ये या विभागात ५८ पदांसाठी भरती, असा करा अर्ज

वयाची अट

उमेदवाराची वयोमर्यादा १ जून २०२४ दरम्यान १८ ते ४० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. यापेक्षा जास्त असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. यात एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची, तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांची सूट दिली आहे.

नोकरीचे ठिकाण : कोलकाता

अर्ज शुल्क

General/OBC/EWS: ५०० रुपये
SC/ST: फी नाही

पगार

या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना ३० हजार ते एक लाख २० हजार रुपये वेतन दिले जाईल.

HCL ची अधिकृत वेबसाइट

https://www.hindustancopper.com/

भरतीसाठी संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी लिंक

https://www.hindustancopper.com/Upload/Notice/0-638549381307846250-HindiNoticeFILE.pdf

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक

https://www.hindustancopper.com/Page/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करत तुम्ही या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

  • सर्वप्रथम http://www.hindustancopper.com या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • फ्रंटपेजवरील HCL recruitment 2024 या लिंकवर क्लिक करा.
  • आता आवश्यक विचारलेली सर्व माहिती भरा.
  • अर्ज सबमिट करा.
  • आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.
  • आता भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.