या लेखात आपण यूपीएससी पूर्वपरीक्षेतील ‘मध्ययुगीन भारताचा इतिहास’ या विषयाची तयारी कशी करायची ते समजून घेणार आहोत. पूर्वपरीक्षेत सरासरी २ ते ३ प्रश्न या घटकांवर विचारले जातात. याचा अर्थ नक्कीच असा नाही की याकडे दुर्लक्ष केले तरी चालेल वा हा विषय महत्त्वाचा नाही. एनसीईआरटीची पुस्तके यासाठी उपयुक्त असून जुने एनसीईआरटी यासाठी खूप जास्त उपयुक्त आहे. बहुतेक विद्यार्थी या विषयाकडे दुर्लक्ष करतात कारण प्रश्नसंख्या कमी असते. पूर्वपरीक्षेतील एकेक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. बहुतेकदा असे होते की ज्या विषयांवर आपण अवलंबून असतो त्यातील प्रश्न आपल्या आवाक्याबाहेरचे असतात त्यामुळे आपण सर्व विषय पूर्वपरीक्षेसाठी अभ्यासणे गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यासताना पुढील घटकांचा अभ्यास अपेक्षित आहे-

भारतात अरब आणि तुर्की आक्रमणे : यात पश्चिम व मध्य आशियात इस्लामचा विकास, आधीची राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती, भारतावर तुर्कीचे आक्रमण, सिंधवर अरबांचा विजय, तुर्कांचे आक्रमण.

दिल्लीची सल्तनत: यात दिल्ली सल्तनतचा पाया, मामलुक राजवंश किंवा गुलाम राजवंश(इ.स. १२०६-१२९०), मंगोल आक्रमण, खिलजी राजवंश (इ.स.१२९०-१३२०), तुघलक राजवंश (इ.स.१३२०-१४१४), सय्यद राजवंश (इ.स. १४१४-१४५१), लोदी राजवंश (इ.स. १४५१-१५२६), दिल्ली सल्तनत अंतर्गत प्रशासन, सल्तनत काळातील वास्तुकला.

प्रादेशिक सत्तांचा उदय : गुजरात, माळवा, मेवाड, काश्मीर, चक राजवंश, जौनपूर, शार्की राजवंश, बंगाल, ओरिसा (ओडिशा), गंगा राजवंश, गजपती राजवंश, आसाम यासह इतर प्रादेशिक राज्ये.

विजयनगर आणि बहमनी राज्ये : विजयनगर साम्राज्याची निर्मिती,विजयनगर साम्राज्यांतर्गत राजवंश आणि राज्यकर्ते, विजयनगर प्रशासन, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती, बहमनी राज्य व दख्खनची स्वतंत्र राज्ये.

धार्मिक चळवळींचा उदय : भक्ती चळवळ- सगुण व निर्गुण संत, सुफी चळवळ – चिस्ती सिलसिला, सुहरावर्दी सिलसिला, नक्शबंदी सिलसिला, कादरी सिलसिला.

मुघल साम्राज्य : बाबर (इ.स. १५२६-१५३०), हुमायून (इ.स.१५३०-१५५६), सूर साम्राज्य, सूर प्रशासन, सूर वास्तुरचना, हुमायूंचा जीर्णोद्धार (इ.स. १५५५-५६), अकबर (इ.स. १५५६-१६०५), जहांगीर (इ.स. १६०५-१६२७), शाहजहान (इ.स. १६२७-१६५८), औरंगजेब (इ.स. १६५८-१७०७).

मुघल प्रशासन : मुघलांचे केंद्रीय प्रशासन, प्रांतीय प्रशासन, स्थानिक प्रशासन, न्यायिक प्रशासन, लष्करी प्रशासन, मनसबदारी प्रणाली, जहागीरदारी व्यवस्था, महसूल प्रशासन, मुघल काळातील अर्थव्यवस्था, मुघल काळात साहित्य, मुघल काळातील संगीत.

मराठा साम्राज्य : छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे प्रशासन, पेशव्यांच्या अधिपत्याखालील मराठा साम्राज्य, पेशव्यांच्या अधिपत्याखालील प्रशासन.

वरील घटकांना खालील ४ भागात वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यावरून त्यांचे पूर्वपरीक्षेतील त्यांचे महत्त्व लक्षात येईल –

‘मध्ययुगीन भारताचा इतिहास’ याबाबत आयोगाने विचारलेले प्रश्न समजून घेवूयात –

प्र. मध्ययुगीन भारतात ‘फणाम’ हा शब्द कशासाठी वापरण्यात आला? [२०२२]

अ) कपडे

ब) नाणे

क) आभूषणे

ड) शस्त्रे

प्र. भारतीय इतिहासातील खालीलपैकी कोण ‘कुलह-दारन’ म्हणून ओळखले जात होते? [२०२२]

अ) अरबी व्यापारी

ब) कलंदर

क) फारसी सुलेखक

ड) सय्यद

वरील प्रश्नांवरून आपल्याला हे लक्षात येते की विशिष्ट ‘संज्ञा’ विचारण्याकडे आयोगाचा कल दिसून येतो. एनसीईआरटी मध्ये अशा संज्ञा रंगीत बॉक्स मध्ये दिलेल्या असतात.

प्र. साम्राज्यवादी भारतातील खालील कोणत्या शासकाने पोर्तुगीजांना भटकलमध्ये किल्ला बांधण्याची परवानगी दिली? [२०२४]

अ) कृष्णदेवराय

ब) नरसिंह सालुवा

क) मोहम्मद शाह तिसरा

ड) युसूफ अदिल शाह

प्र. खालील कोणत्या मध्ययुगीन गुजरातच्या शासकाने दिव पोर्तुगीजांना दिले? [२०२३]

अ) अहमद शाह

ब) महमूद बेगड

क) बहादूर शाह

ड) मुहम्मद शाह

वरील प्रश्नांवरून हे लक्षात येते की, वेगवेगळ्या शासकांद्वारे जे महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत त्याचाही अभ्यास आपण करायला हवा. प्रशासकीय, सामाजिक व सांस्कृतिक घटकांवर आयोगाद्वारे प्रश्न विचारलेले आहेत.

धार्मिक चळवळींशी संबंधित प्रश्नाचे स्वरूप तुम्हाला खालील प्रश्नावरून लक्षात येईल.

प्र. खालील विधानांचा विचार करा: [२०१९]

१. संत निंबर्का अकबराच्या काळातील होते.

संत कबीर यांच्यावर शेख अहमद सिरहिंदी यांचा मोठा प्रभाव होता.

वरील दिलेल्या विधानांपैकी कोणती/कोणती विधान योग्य आहे?

अ) फक्त १

ब) फक्त २

क) दोन्ही १ आणि २

ड) यापैकी नाही

खाली दिलेला प्रश्न ‘साहित्य’ या घटकाशी संबंधित आहे. मध्ययुगीन काळातील साहित्य, त्याचे निर्माते, अनुवादक, त्यातील विषय या बाबी समजून घ्यायला हव्यात.

प्र. ‘योगवसिष्ठ’चा फारसीत अनुवाद निजामुद्दीन पानिपतीने कोणत्या सम्राटाच्या राजवटीत केला: [२०२२]

अ) अकबर

ब) हुमायूँ

क) शाहजहाँ

ड) औरंगजेब

‘मध्ययुगीन भारताचा इतिहास’ समजून घेताना प्रश्नांचा अभ्यास चांगला केल्यास आपल्याला कमी श्रमात चांगले गुण मिळू शकतात. हे लक्षात घेवून अशा विषयांचा अभ्यास करायला हवा.

sushilbari10 @gmail. com

संरक्षण, व्यापार,

विधि सेवा