How To Take Control Of Your Money : पैसा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे कारण आपण जे काम करतो, ते पैसा कमावण्यासाठी करतो आणि पैशांमुळेच आपल्याला सर्व गरजा पूर्ण करता येतात. त्यामुळे प्रत्येक जण पैशांचे मागे धावताना दिसतात पण अनेक लोकांना पैसा कसा वाचवायचा, हे कळत नाही आणि त्यामुळे त्यांचे पैशांवर नियंत्रण दिसून येत नाही. आज आपण अशा काही खास टिप्स जाणून घेणार आहोत, ज्यामुळे पैशांवर नियंत्रण कसे ठेवावे, हे आपल्याला समजून घेता येईल.

खूप लवकर सेव्हींग सुरू करा

जितक्या लवकर सेव्हींग सुरू करता येईल तितक्या लवकर करा आणि सेव्हींग करायला कधीही उशीर नाही त्यामुळे जर तुम्हाला सेव्हींग करायची इच्छा असेल तर लगेच सुरू करणे गरजेचे आहे. सेव्हींग तुम्ही पैशांची गुंतवणूक करून सुद्धा करू शकता. म्युचुअल फंडमधील एसआयपीद्वारे किंवा सोने, घर- जमीनद्वारे सुद्धा तु्म्ही पैसा गुंतवू शकता.

आर्थिक योजनांचा लाभ घ्या.

अनेकदा आर्थिक ज्ञान नसल्यामुळे पैसा कसा वाचवायचा किंवा गुंतवायचा, हा खूप मोठा प्रश्न पडतो. अनेकांना आर्थिक योजनांचा लाभ सुद्धा घेता येत नाही. त्यामुळे सरकारच्या कोणत्या आर्थिक योजना आहेत, त्याकडे लक्ष द्या आणि त्याचा फायदा करून घ्या.

हेही वाचा : Success Story : देशातील श्रीमंतांच्या यादीत नाव असणारे बेनू गोपाल बांगूर नक्की आहेत तरी कोण? वय ९३ तर संपत्ती आहे इतकी; वाचा ‘त्यांची’ यशोगाथा

पैशांशी संबंधित या चुका टाळा

बजेट लक्षात न घेता पैसा खर्च करणे

अनेक जण महिन्याचे बजेट लक्षात न घेता पैसा खर्च करतात. पैसा आला की लगेच खर्च करतात आणि बजेटचा विचार करत नाही. अशा लोकांना नंतर अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

इतरांच्या हाती तुमचा पैसा देणे

तुम्ही स्वत: कमावत असलेले पैसे स्वत: जवळ ठेवा आणि त्या पैशांचा व्यव्हार तुम्ही करा. यामुळे तुम्हाला आर्थिक नियोजन करता येईल आणि पैसा कुठे कसा खर्च करायचा, याविषयी सुद्धा अंदाज येईल.

पैसा कपाटात किंवा बॅगमध्ये ठेवणे

अनेक जण विशेषत: महिला पैसा कपाटात किंवा बॅगमध्ये ठेवतात. त्याऐवजी एखाद्या म्युचुअल फंडमध्ये किंवा आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा किंवा बँक अकाउंटमध्ये ठेवा तुम्हाला त्यामुळे आर्थिक फायदा दिसून येईल.

एमरजन्सी फंड नाही

बऱ्याच लोकांना एमरजन्सी फंडविषयी माहिती नाही. कोणत्याही मेडिकल एमरजन्सीमध्ये तुम्हाला एमरजन्सी फंड कामी येऊ शकतो. त्यामुळे तुमच्याकडे एमरजन्सी फंड असणे आवश्यक आहे. थोडा पगार किंवा बोनस एकत्रित करून तुम्ही या फंडमध्ये पैसे गुंतवू शकता.

तुमचे इपीएफ अकाउंट नाही

इपीएफ ही भारतातील सर्वात उत्तम टॅक्स मुक्त योजना आहे. त्यामुळे तुमचे इपीएफ अकाउंट असणे अत्यंत आवश्यक आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)