How to choose career after 12th : दहावी, बारावीची परीक्षा संपते न संपते तोवर नातेवाईक, “मग आता पुढे काय करायचं ठरवलंय?” असा प्रश्न घेऊन समोर उभे राहतात. परीक्षेच्या अभ्यासाचा, त्यात चांगले गुण मिळवण्याचा ताण शेवटचा पेपर लिहून झाल्यावर संपलेला असतो. मात्र, पुढे आपण कोणत्या क्षेत्रात करियर करायचे असा मोठा गहन प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहतो. अशा वेळेस विद्यार्थ्यांना त्यांना नेमके काय करायचे आहे हे समजत नसल्याने गोंधळलेले असतात. अशात अनेक जण आपल्या मित्राने अमूक क्षेत्र निवडले म्हणून आपणही तेच करू किंवा स्वतः कोणताही विचार न करता घरचे सांगतील त्या क्षेत्राची निवड करतात.

मात्र, गोंधळून किंवा इतरांचे ऐकून घेतलेल्या निर्णयांचा त्रास भविष्यात तुम्हाला होऊ शकतो. असे होऊ नये म्हणून, तसेच तुम्हाला योग्य त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आधी स्वतःला ओळखणे गरजेचे असते. आता हे कसे करायचे? तर तुम्हाला कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे हे ठरविण्याआधी खाली दिलेल्या गोष्टींवर विचार करून पाहा. त्यानंतर तुमच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करा. फायनेन्शियल एक्स्प्रेसच्या एका लेखामधून करियर क्षेत्र निवडण्यासाठी काय करावे, यासाठी सुचवलेल्या काही टिप्स पाहा.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
judiciary curb politics Courts Marathi speaking Chief Justice
मनमानी राजकारणावर न्यायव्यवस्था अंकुश ठेवू शकेल?

हेही वाचा : बारावीनंतर काय करायचं ठरत नाही? पर्यटनाची आवड असल्यास Tourism क्षेत्रातील नोकरीचे पर्याय पाहा

तुमच्या आवडी-निवडी, छंद ओळखा

तुम्हाला ज्या गोष्टींची, विषयांची आवड आहे, त्याच्या अनुरूप असलेले क्षेत्र निवडण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे परीक्षेनंतर सर्वात पहिले तुमच्या आवडीनिवडींची, छंदांची एक यादी तयार करा. त्यानुसार करियरचे विविध पर्याय शोधून ठेवा आणि त्यानंतर इतर पर्यायांचा विचार करा. करियरचे क्षेत्र नक्की करण्यासाठी व्यक्तिमत्त्व चाचण्या, करियर असेसमेंट यांसारख्या साधनांचा वापर करूनदेखील विद्यार्थी स्वतःच्या आवडीनिवडींना प्राधान्य देऊ शकतात.

एकदा क्षेत्राची निवड झाली की त्याबद्दल अजून थोडा अभ्यास करावा. या अभ्यासात तुम्ही निवडलेल्या क्षेत्रांमधल्या नोकरीच्या संधी, पगार, शिक्षणाची अपेक्षा, तसेच जॉब मार्केटमधील त्यांची मागणी इत्यादी गोष्टींवर लक्ष द्यायला हवे.

तुमचे कौशल्य, कमतरता आणि सामर्थ्य ओळखा

कोणतेही क्षेत्र निवडण्याआधी तुमच्यातील क्षमता ओळखणे अवघड असते. मात्र, सुरुवातीपासूनच स्वतःतील सामर्थ्य आणि कौशल्य ओळखल्यास त्याचा फायदा तुम्ही निवडलेल्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला करता येऊ शकतो. तसेच, स्वतःमधील कमतरता ओळखणे हेदेखील कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी महत्त्वाचे ठरते.

हेही वाचा : कौशल्य आणि तंत्रज्ञानावर आधारित २०२४ मधील मागणी असणाऱ्या नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या…

नेटवर्क वाढवणे

नोकरीसंदर्भात माहिती देणारे, क्षेत्र निवडण्यासाठी किंवा नोकऱ्यांसंदर्भात मदत करणाऱ्या विविध साईट उपलब्ध असतात. त्यांचा उपयोग करून तुमचे नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न करावा. तसेच, बारावीनंतर विद्यार्थ्यांनी काय करावे, करियर कसे निवडावे या संदर्भातील मेळावे वगैरे होत असतात; अशा ठिकाणी जाऊनही तुम्ही माहिती मिळवून तुमचे संपर्क वाढवू शकता.

तज्ज्ञांची मदत घ्यावी

तुम्हाला जर केवळ डिजिटल माहितीवर अवलंबून राहायचे नसेल, तर क्षेत्र निवडण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्ही करिअर समुपदेशक, शैक्षणिक सल्लागार, शिक्षक सदस्य किंवा कुटुंबातील आणि मित्रांकडून मार्गदर्शन घेऊ शकता. तुम्हाला कोणतेही प्रश असतील, शंका असल्यास तज्ज्ञ त्या शंकांचे निराकरण करून तुम्हाला मार्गदर्शन आणि सल्ला देतात.

थोडक्यात सांगायचे झाले तर बारावीच्या परीक्षेनंतर सर्वात पहिले ‘आता मला पुढे काय करायचे आहे?’ असा प्रश्न स्वतःला विचारा. त्यानुसार विविध क्षेत्रांची, त्यातील नोकऱ्यांची माहिती करून घ्या. स्वतःच्या कलागुणांची, आवडीनिवडींची, स्वतःतील कमतरतेची पारख करा. अधिक आणि योग्य मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांची किंवा कुटुंबीयांची मदत घ्यावी. तसेच सतत सतर्क राहून विविध ठिकाणांहून मुबलक माहिती गोळा करा.