How to create Cover Letter For Job : जेव्हा तुम्ही नोकरीसाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला बायोडाटा किंवा सीव्ही (CV) बरोबर कव्हर लेटर सुद्धा विचारले जाते. अनेक जण अर्जाबरोबर सीव्ही जोडतात पण कव्हर लेटर जोडत नाही पण असे करू नका. कारण कव्हर लेटर तुमची ओळख, व्यावसायिक पार्श्वभूमी सांगण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कव्हर लेटर कसे तयार करायचे? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (how to create cover letter for a job know these five tips)
१.कामाविषयी उत्साह दाखवा
कव्हर लेटरमध्ये तुमचा कामाविषयीचा उत्साह दिसून आला पाहिजे. कव्हर लेटर हा एक उत्तम पर्याय आहे जिथे तुम्ही तुमचा उत्साह व्यक्त करू शकता. तुम्ही कंपनीबरोबर काम करण्यास उत्सुक आहात, त्याविषयी सांगा. कंपनीविषयी चांगल्या गोष्टी सांगा आणि तुम्ही कंपनीत का काम करू इच्छिता, त्याविषयी सांगा.
हेही वाचा : AIASLमध्ये नोकरीची संधी! कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हच्या १०४९ रिक्त जागांसाठी होणार भरती, लवकर करा अर्ज
२. ओळखीचा उल्लेख करा
जर तुम्ही अर्ज केलेल्या कंपनीतील वर्तमान कर्मचाऱ्याला ओळखत असाल, तर त्यांचा कव्हर लेटरमध्ये उल्लेख करा. यामुळे तुमच्यावर त्यांचा लगेच विश्वास ठेवू शकतील आणि तुम्ही त्यांचे लक्ष वेधून घ्याल.
३. अनुभवातून तुमच्या कौशल्याविषयी सांगा.
अनेकदा आपण थेट कौशल्ये सांगतो पण त्याचा काहीही फायदा होत नाही. तुम्ही जर तुम्हाला आलेले चांगले वाईट अनुभव त्यांना सांगावे आणि त्यातून तुम्ही काय शिकले यावर प्रकाश टाकावा. यावरून तुम्ही तुमची कौशल्येच नाही तर परिस्थितीचा सामना करण्याची तुमची क्षमता सुद्धा जाणून घेता येते.
४. कामगिरीचा उल्लेख करा
तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदाला अनुसरून तुम्ही कोणती कामगिरी केली आहे, याचा उल्लेख करा. तुम्ही केलेली कामगिरी तुमची निवड होण्यास फायदेशीर ठरू शकते.
५. उल्लेख करा की कंपनीविषयी तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला
जर तुम्ही अर्ज करत असलेल्या कंपनीविषयी आवड दाखवा. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही त्या कंपनीविषयी काय चांगले ऐकले आहेत, याविषयी लिहा. कंपनीचे कौतुक करून तुम्ही येथे काम करण्यास उत्सुक असल्याचे लिहा.