How to Download Maharashtra HSC Hall Ticket 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) आगामी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) बोर्ड परीक्षा २०२५ साठी अधिकृतपणे हॉल तिकिटे प्रसिद्ध केली आहेत. जे विद्यार्थी या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेला बसणार आहेत, त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) १२ वीची प्रवेशपत्रे आता मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र बारावी २०२५ चे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) कसे डाऊनलोड करायचे? (Maharashtra HSC Hall Ticket 2025)
या सोप्या स्टेप्स फॉलो करून, तुम्ही महाराष्ट्र इयत्ता १२ वीचे हॉल तिकीट (Maharashtra HSC Hall Ticket 2025) सहजपणे डाउनलोड करू शकता :
१. सगळ्यात पहिल्यांदा mahahsscboard च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
२. त्यानंतर “Hall Ticket” सेक्शनमध्ये जा.
३. तुमच्या रजिस्ट्रेशन डिटेल्ससह आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा.
४. त्यानंतर एचएससी २०२५ परीक्षेसाठी परीक्षेसाठी प्रवेशपत्र (हॉल तिकीट) डाउनलोड करा.
५. हॉल तिकिटाची प्रिंट घ्या आणि त्यावर मुख्याध्यापकांची सही व शाळेचा स्टॅम्पसुद्धा मारून घ्या.
महाराष्ट्र १२ वी हॉल तिकीट २०२५ बद्दल महत्त्वाची माहिती (Maharashtra HSC Hall Tickets 2025) :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE)द्वारे जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेत असे नमूद केले आहे की, महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अंतर्गत सर्व संलग्न उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकिटे ऑनलाइन उपलब्ध आहेत. ही हॉल तिकिटे संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी किंवा शाळेच्या शिक्षकांनी मंडळाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेऊन, वितरित करावीत, असेही या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या हॉल तिकिटावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी आणि शाळेचा अधिकृत शिक्का असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. तसेच ही सेवा सर्व विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य आहे. हॉल तिकीट ऑनलाइन डाउनलोड किंवा प्रिंट करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ नये, अशा सूचना मंडळाने दिल्या आहेत.
विशेष प्रकरणासाठी Mah १२ वी प्रवेशपत्र २०२५ (HSC Admit Card 2025 for Special Cases) :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) विशेष प्रकरण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वेदेखील सांगितली गेली आहेत.
ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज ‘Paid’ म्हणून चिन्हांकित केले गेले आहेत, ते ‘पेड स्टेटस अॅडमिट कार्ड’ (Paid Status Admit Card) विभागांतर्गत त्यांच्या हॉल तिकिटांद्वारे प्रवेश करू शकतात. ज्यांचे अर्ज उशिरा आलेले आहेत किंवा ज्यांना विभागीय मंडळाने अतिरिक्त आसन क्रमांक प्रदान केले आहेत, त्यांना हॉल तिकिटे ‘अतिरिक्त सीट नो ॲडमिट कार्ड’ (Extra Seat No Admit Card) पर्यायाखाली मिळतील.
१२ वी २०२५ परीक्षेच्या तारखा आणि वेळापत्रक
महाराष्ट्र १२ वी २०२५ च्या परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरू होणार आहेत आणि ११ मार्च २०२५ रोजी संपणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक तपासण्याचा आणि त्यानुसार तयारी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अद्ययावत राहण्यासाठी, परीक्षेशी संबंधित सर्व नवीन घोषणांसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
Mah HSC ॲडमिट कार्ड २०२५ लवकर का डाऊनलोड करावे?
शेवटच्या क्षणी कोणतीही समस्या टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचे हॉल तिकीट आधीच डाऊनलोड करून घेणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव, परीक्षा केंद्र व विषय यांसह हॉल तिकिटावरील सर्व माहितीची पडताळणी करून घ्यावी. चुकीची माहिती आढळल्यास विद्यार्थ्यांनी त्यांच्या संबंधित शाळा किंवा MSBSHSE शी त्वरित संपर्क साधावा. एचएससी बोर्डाच्या परीक्षा अगदी जवळ आल्याने, महाराष्ट्रातील सर्व इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांनी शक्य तितक्या लवकर त्यांची हॉल तिकिटे (Maharashtra HSC Hall Ticket 2025) डाऊनलोड केली आहेत ना याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. तुमचा तपशील बरोबर असल्याची खात्री करून घेऊन, परीक्षेची काळजीपूर्वक तयारी करा.